नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीच्या काळात देवीने कोणकोणत्या राक्षसांचा वध केला?

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस

पौराणिक कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. पण याच युद्धात महिषासुरासोबतच इतरही शक्तिशाली राक्षसांचा देवीने वध केला त्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. तर आज आपण या सगळ्या राक्षसांबद्दल माहिती घेणार आहोत.

नवरात्रीच्या काळात देवीने कोणकोणत्या राक्षसांचा वध केला?

शुभं आणि निशुंभ

शुभं आणि निशुंभ

या असुर भावांनी अनेक वर्षे ब्रह्मदेवाची कठोर आराधना केली. त्यांच्या तपश्‍चर्येने प्रसन्न झालेला ब्रह्मदेव हंसावर स्वार होऊन त्यांच्यापुढे प्रगट झाला. दोन्ही असुरांनी ब्रह्मदेवाकडे अमर होण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने ‘ते वरदान देणे अशक्य आहे’, असे सांगितले. त्यानंतर दोघांनी शक्ती, सैन्य आणि शस्त्रसंपन्न होऊन अजेय होण्याचा अन् त्रैलोकात विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले. यासमवेतच ‘कोणत्याही देवाकडून त्यांचा वध होऊ नये, तर अयोनिजा (मातेच्या गर्भातून जन्माला न आलेल्या) अशा दिव्य स्त्री शक्तीविषयी त्यांच्या मनात कामवासना जागृत झाल्यावर तिच्याद्वारे त्यांचा वध होऊ दे’, असे वरदान त्यांनी मागितले. ब्रह्मदेवाने ‘तथाऽस्तु’ म्हटले आणि ते अंतर्धान झाले.

अतुलित बलसंपन्न झालेल्या या दोन्ही असुरांनी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकांवर स्वत:चे अधिपत्य स्थापित केले. त्यांनी तिन्ही लोकांमध्ये हाहाःकार माजवला. मनुष्य, देवता, नाग, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध आणि विद्याधर यांचा ते छळ करू लागले. या असुरांना वाटले की, स्त्री दुर्बळ असल्यामुळे कोणतीही स्त्रीशक्ती त्यांचा वध करू शकत नाही. त्यामुळे ते अहंकारी झाले आणि उन्मत्त होऊन सर्वांवर अत्याचार करू लागले. त्यांच्या अत्याचाराने ग्रासित झालेल्या देवता आणि ऋषिमुनी यांनी ब्रह्मदेवाला या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की, केवळ स्त्रीशक्तीच सर्वांचे दु:खनिवारण करू शकते. त्यामुळे सर्वजण पार्वतीमातेला शरण गेले आणि तिला त्यांची शुंभ-निशुंभ यांच्या जाचातून मुक्तता करण्यासाठी प्रार्थना करू लागले. जगदंबेने आदीशक्तीचे रूप धारण करून ‘सर्वांच्या त्रासाचे निवारण लवकरच केले जाईल’, असा आशीर्वाद दिला.

स्वर्गावर राज्य करणार्‍या शुंभ-निशुंभ यांच्या आसुरी सैनिकांनी हिमालयाच्या पायथ्याशी रहाणार्‍या ऋषिमुनींच्या आश्रमावर आक्रमण केले. तेव्हा त्यांच्या साहाय्यासाठी मूर्तीतून प्रत्यक्ष कौशिकीदेवी प्रगट झाली आणि तिने अनेक असुरांवर शस्त्रांचा मारा करून त्यांचा नाश केला. यांतील काही असुर वाचले आणि ते शुंभ-निशुंभ यांच्याकडे धावत गेले. त्यांनी कौशिकीदेवीचे अनुपम सौंदर्य, गुणकौशल्य, शौर्य आणि पराक्रम यांचे वर्णन केल्यावर शुंभ-निशुंभ तिच्यावर मोहित झाले. त्यांनी तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी एका असुराला दूत बनवून तिच्याकडे पाठवले. तेव्हा कौशिकीदेवीने सांगितले, ‘मी प्रतिज्ञा केलेली आहे की, जो महावीर योद्धा माझ्याशी युद्ध करून मला युद्धात परास्त करेल, त्याच्याशीच मी विवाह करीन.’ असुर दुताने कौशिकीदेवीची प्रतिज्ञा शुंभ-निशुंभ यांना सांगितली.

कोमलांगी आणि सुमधुरा अशा कौशिकीशी युद्ध न करता तिचे मन विवाह करण्यासाठी वळवण्याकरता शुंभ-निशुंभ यांनी त्यांचा सेनापती धूम्रलोचन याला पाठवले. तेव्हा कौशिकीदेवीने शंखनाद करून पार्वतीमातेचे आवाहन केले. पार्वतीने कालिकादेवीचे रूप धारण केले. तिने धूम्रलोचन आणि त्याचे आसुरी सैन्य यांच्याशी युद्ध करून त्यांचा नाश केला.

त्यानंतर कौशिकीला बळाने प्राप्त करण्यासाठी शुंभ-निशुंभ यांनी पाताळातील महावीर योद्धे चंड-मुंड यांना प्रचंड सैन्यासह पाठवले. या योद्ध्यांशी युद्ध करण्यासाठी पार्वतीने चामुंडादेवीचे रूप धारण केले आणि त्यांच्याशी युद्ध करून त्यांचा संहार केला

शोणीत (रक्तबीज)

रक्तबीज नावाच्या राक्षसाला त्याच्या कठोर तपश्चर्येने शक्तिशाली वरदान मिळाले. या वरदानानुसार रक्तबीजच्या रक्ताचा एक थेंबही पृथ्वीवर पडला तर त्यातून अनेक राक्षसांचा जन्म होत असे. वरदान मिळाल्यानंतर रक्तबीजने आपल्या अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याची दहशत वाढत गेली आणि त्याने तिन्ही लोकांवर आपली शक्ती वापरण्यास सुरुवात केली. रक्तबीजच्या दहशतीने सगळेच त्रस्त झाले.

रक्तबीजचा पराभव करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले. पण रक्तबीजेचे रक्त जमिनीवर पडताच एक एक करून शेकडो राक्षसांचा जन्म झाला. त्यामुळे रक्तबीजचा पराभव करणे अशक्य झाले. यानंतर देवांनी माता कालीचा आश्रय घेतला. देवतांना मदत करण्यासाठी, कालीने एक भयानक रूप धारण केले. या रूपात मां कालीच्या हातात शस्त्रे, एका हातात खापर आणि गळ्यात कवटीची माळ होती.

अखेर महादेवाच्या सांगण्यावरून कालीमातेने रक्तबीजाचा वध केला होता. शक्तीचा अवतार असलेल्या कालीमातेने रक्तबीजाचे मस्तक छाटून त्याचे रक्त प्रश्न केले जेणेकरून त्याच्या शरीरातील रक्ताचा एक थेंब देखील धरतीला स्पर्श करू शकणार नाही.

पण या काळात कालीच्या क्रोधाने इतके भयंकर रूप धारण केले होते की तिला शांत करणे अशक्य होते. कालीचा राग कमी करण्यासाठी सर्व देवता शिवाच्या आश्रयाला पोहोचल्या आणि त्यांनी देवी कालीला शांत करण्याची विनंती केली. त्यानंतर भगवान शिव कालीच्या मार्गावर आडवे झाले. देवी कालीच्या पायांचा शिवाच्या छातीला स्पर्श होताच तिची जीभ बाहेर पडली आणि त्यानंतर देवी कालीचा राग आपोआप शांत झाला.

चंड मुंड

चंड आणि मुंड हे राक्षस राजा शुंभाचे सेनापती होते. ह्या राक्षसांचा वध केल्यानंतर देवी चामुंडा ह्या नावाने प्रसिद्ध झाली.

धुम्रलोचन

शुंभाने धुम्रलोचनाला देवीला त्याच्याजवळ आणण्यासाठी पाठवले होते.

देवीसमोर आल्यावर धुम्रलोचन शुंभविषयी विविध प्रकारे बोलू लागला. त्याला इंद्रजित आणि स्वर्गाचा अधिपती म्हणत. तो त्याला राक्षसांमध्ये सर्वात महान आणि विश्वातील सर्वात शूर योद्धा म्हणू लागला. यानंतर जेव्हा त्याने देवीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवी म्हणाली, तुझ्या स्वामीला सांगा की प्रथम मला युद्धात जिंकावे, मग ती लग्नाचा विचार करेल.

हे ऐकून धुम्रलोचन क्रोधित झाला आणि रागाने म्हणाला, अरे कन्या, माझ्यावर जबरदस्ती करू नकोस, नाहीतर मी तुला केसांनी ओढून नेईन.देवी हसली आणि म्हणाली की मी माझ्या संकल्पावर ठाम आहे.

धुम्रलोचन पुढे सरकला आणि देवीला पकडण्यासाठी हात पुढे करताच भगवतीने त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले. तिच्या डोळ्यांतून निघालेल्या क्रोधाच्या आगीत तो राक्षस जळून राख झाला.

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस

महिषासुर

राक्षसांच्या कुटुंबातील रंभ नावाच्या राक्षसाला पाण्यात राहणारी म्हैस त्रिहायणी शी प्रेम झाले, तिच्यापासून महिषासुर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती झाली.

या कारणामुळे महिषासुर जेव्हा पाहिजे तेव्हा तो मनुष्य आणि पाहिजे तेव्हा म्हशीचे रूप घ्यायचा, पुढे चालून तो राजा बनला.

त्या नंतर त्याने ब्रम्ह देवाची कठोर तपस्या केली, या तपस्सेचा कालावधी होता, दहा हजार वर्ष. इतके दिवस तपस्या केल्यानंतर ब्रम्ह देव प्रसन्न झाले आणि त्यांनी महिषासुर ला वरदान मागायला सांगितले.

त्यावर महिषासुर ने ब्रम्ह देवाला वरदान मागितले कि मला अमरत्व प्राप्त झाले पाहिजे, तेव्हा यावर ब्रम्ह देव म्हणाले, “हे सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध आहे, हे वरदान देणे अशक्य आहे, तेव्हा तू दुसरा एखादा वर माग.”

तेव्हा महिषासुर ब्रम्ह देवाला म्हणाला कि मला देव दानव, आणि मानव यांच्या पैकी कोणीच मारू शकणार नाही असा वर द्या तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले, पुन्हा एकवेळ विचार कर कि असाच वर देऊ ना तेव्हा महिषासुर म्हणाला हो आता बाकी जगात कोणच आहे जो मला मारू शकणार.

यापैकी उरल्या फक्त स्त्रिया ज्या मला कधी मारू शकणार नाहीत असे म्हणत त्याने ब्रम्ह देवाकडून वरदान प्राप्त केले, पण तेव्हा त्याला माहिती नव्हत कि पुढे काय होणार आहे.

वरदान प्राप्त केल्या नंतर तो देवांवर आक्रमण करायला निघाला, त्याने बरेचश्या देवांना टक्कर दिली युद्धामध्ये हरवून टाकले, त्यानंतर तो इंद्रावर आक्रमण करायला निघाला, त्याने इंद्राला सुद्धा हरविले, तेव्हा इंद्र त्राही त्राही करत ब्रम्ह देवाजवळ गेले आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

या नंतर ब्रम्ह देव इंद्राला आणि बाकी देवतांना घेऊन शंकर जी कडे गेले, शंकर जी सर्वांना घेऊन भगवान विष्णू कडे गेले. आणि सर्व घडलेला प्रकार सांगितला.

तेव्हा त्यांनी यावर उपाय देत सगळ्यांना सांगितले कि दुर्गा मातेला प्रसन्न करावे लागेल तेव्हाच या राक्षसाचा समूळ नायनाट करता येईल. हे ऐकल्या नंतर सर्व देवतांनी दुर्गा मातेचे आवाहन केले, त्यानंतर दुर्गा माता तेथे प्रगट झाली.

तेव्हा सर्व देव गण मिळून दुर्गामातेकडे मदत मागायला लागले. कि महिषासुर च्या त्रासापासून आम्हाला मुक्ती द्या. तेव्हा दुर्गा मातेने सर्वांना निश्चिंत राहण्यास सांगितले आणि तेथून निघून महिषासुर सोबत लढण्यासाठी गेल्या.

तेव्हा महिषासुर चा अन्याय देवतांवर भारी पडत चालला होता, एका स्त्रीला आपल्या समोर पाहून महिषासुर हसला आणि त्याने दुर्गा मातेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा दुर्गा मातेने त्याच्यावर वार  करत युद्ध सुरु केले, तेव्हा दुर्गा मातेने महिषासुर च्या अनेक सेनापतींना मृत्यू दिला.

दुर्गा मातेचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध चालले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. यानंतर बाकी उरलेली सेना पळून गेली.

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस

Also Read
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

 

48374cookie-checkनवरात्रीत देवीने मारलेले राक्षस

Related Posts

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak Chaturdashi in Marathi

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak Chaturdashi in Marathi

श्रीकृष्ण कोण होता?

श्रीकृष्ण कोण होता?

हिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

हिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

11 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 241,605 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories