Best Motivational Quotes in Marathi | 100+ मराठी मोटिवेशनल स्टेटस

Best Motivational Quotes in Marathi | 100+ मराठी मोटिवेशनल स्टेटस

Best Motivational Quotes in Marathi:- माणूस म्हटला की कधी ना कधी त्याच्या आयुष्यात असा प्रसंग येतो जेव्हा त्याला प्रोत्साहनाची आवश्यकता असते. असं बऱ्याचदा घडतं की एखादी गोष्ट करण्याची धमक असूनसुद्धा आपल्याकडून होईल की नाही असा विचार करून माणूस झेप घ्यायला कचरतो. अगदी महाबली हनुमानालासुद्धा जांबुवंताने त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली होती त्यानंतर त्यांनी एका उड्डाणात शंभर योजन समुद्र पार केला होता. Motivational quotes in marathi प्रेरक विचार वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात आनंद येऊ लागतो आणि आपण आपल्या ध्येयाजवळ देखील पोहोचतो. प्रेरणादायक विचार वाचल्यानंतर आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास सुरवात करतो. आपल्याला वाटते की आपण या जगात कोणतीही कामे करू शकतो. या विचाराने आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. Marathi Motivational Status | प्रेरणादायक सुविचार :-आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही प्रेरणादायक सुविचार. या विचारांची तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच मदत होईल.

 

आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्वाचं असतं.

 

स्वतःच्या फायद्यासाठी अनेक जण आपल्या फांद्या तोडतील.
तुटलेल्या जागेवरून नवी पालवी घेऊन पुन्हा नव्याने बहरता यायला हवं.

 

स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी.
दुसऱ्यांच्या यशाशी नाही.

 

कधीकधी एखाद्याला आपलंसं करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो.
किनाऱ्यावर उभं राहिलं की भरतीच्या लाटा स्वतःहून येतात भेटायला.

 

योग्य वेळी सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात सहसा भरकटत नाही.

माणसाला एक वाईट सवय आहे.
तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घुटमळतो.

कैचीकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे.
नात्यात असलेल्या गैरसमजाच्या कागदाला एकमेकांना जराही इजा होऊ न देता अलगत कापून बाजूला सारता यायला हवं.

आयुष्याचे महत्वाचे निर्णय हे लोकांच्या मनाचा विचार करून कधीच घेऊ नये.
कारण आपली मेहेनत कितीही असली तरीही लोकं मात्र आपल्या नशिबाचाच हेवा करतात.

इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, फक्त आपलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे.

आजकाल फक्त विचारांनी श्रीमंत असून चालत नाही, जगण्यासाठी पैसा लागतो.

आपल्या आवडत्या व्यक्तीला आपला आयुष्यातून जाऊ देण्यामागे काहीतरी मोठं कारण नक्कीच असतं. कारण आवडणारी कोणतीच गोष्ट माणूस सहजासहजी कधीच सोडत नाही.

वेळीच नाही म्हणायला शिकायला हवं. बऱ्याचदा समोरचा दुखावेल म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काहीतरी करून बसतो आणि नंतर संपूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करावा लागतो.

काही गोष्टी वेळीच सोडून दिल्याचं चांगल्या असतात. पुढे येऊ घातलेल्या सुखांना आयुष्यात जागा करून देण्यासाठी.

माणूस ओंजळभर देतोय की मुठभर याला महत्त्व नाहीये. त्याच्याजवळ त्याच्यापुरतंही नसताना तो एखादी गोष्ट देतोय याला महत्व आहे.

चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून इतर गोष्टीही करून पाहाव्यात माणसाने. थोडाफार का होईना. काहीतरी वेगळं केल्याचा आनंद नक्कीच मिळतो.

दरवेळी आपल्यातच काही कमी असेल असं नाही. कधीकधी समोरच्याच्या अपेक्षाही अवाजवी असू शकतात.

कुठे जायचंय हे माहीत नसलं तरी पुढे जायचे प्रयत्न करत राहायला हवं. कारण तळ्यात साचलेलं पाणी तसच राहतं, जारा छोटा असला तरीही स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो.

परिस्थिती वाईट असली कि माणूस नशीब दोष देऊन मोकळा होतो. पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मानत नाही.

आपण आपली तुलना कुणाशी करतोय यावर आपलं मानसिक समाधान अवलंबून असतं. चंद्राची तुलना चांदण्यांशी केली तर तो उठून दिसतो, सूर्यासमोर तो नेहमीच झाकोळलेला असतो.

गैरसमज हे बांडगुळासारखे असतात. वेळीच मुळापासून उखडले नाही तर त्या नात्याच्या वृक्षाचा सगळं जीवनरस शोषून घेतात.

कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात.

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की मग ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाचा काहीच फरक पडत नाही आपल्याला.
कारण सर्वश्रेष्ठ योद्धा असूनही श्रीकृष्ण सुद्धा रणछोडदास म्हणून प्रसिद्ध आहे.

Best Motivational Quotes in Marathi

गरज आणि चैन यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान साधंच असतं बऱ्याचदा.

Best Motivational Quotes in Marathi

एकटा आहे किंवा पुरेसं पाठबळ आहे ह्यावर माणसाचं कर्तृत्व अवलंबून नसतं.
चाफा एकटा फुलत असला तरीही पुरेसा सुगंध देतो.

Best Motivational Quotes in Marathi

गरज आणि चैन यामधला फरक कळला की मुलाचा पुरुष होतो.

Best Motivational Quotes in Marathi

वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा जी आपली वेळ बदलू शकेल.

Best Motivational Quotes in Marathi

कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही, परिस्थिती नुसार ती बदलत जाते.
माणूस तोच असतो, बदलतो तो लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन.

Best Motivational Quotes in Marathi

अमुकच एक गोष्ट हवी ह्या हट्टापायी न मागता मिळालेल्या चांगल्या गोष्टीही कस्पटासमान वाटायला लागतात आपल्याला.

Best Motivational Quotes in Marathi

प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्वाचा असतो.

Best Motivational Quotes in Marathi

व्हायचंच असेल तर एखाद्याच्या आयुष्यातलं गुलाब व्हावं. स्वतःच आयुष्य कितीही काटेरी असलं तरीही समोरच्याला आनंद देता यायला हवा.

Best Motivational Quotes in Marathi

Motivational quotes in marathi | प्रेरणादायक मराठी विचार तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्र मंडळी मध्ये share करायला विसरू नका.In this Motivation quotes in Marathi article you will find all types of quotes in marathi. you can copy and use this inspiration marathi status for your whatsapp status. Marathi Suvichar, marathi thoughts, motivation thoughts in marathi,motivational story in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi motivation status, marathi motivation status, motivational speech in marathi, marathi motivation thought, motivation marathi thought, marathi motivational video, Motivation for students, Motivation for life

Follow PRATILIKHIT

https://pratikpravinmhatre.com/

44710cookie-checkBest Motivational Quotes in Marathi | 100+ मराठी मोटिवेशनल स्टेटस

Related Posts

Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

160

160

158

158

157

157

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories