गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?
दीप अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्या…हो गटारी अमावस्या.
आता काही जण म्हणतात की गटारी ह्या नावातच गलिच्छपणा आहे. काही महान पंडितांच्या मते गटारी म्हणजे भरपूर दारू पिऊन गटारात पडणे. हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये तर लोकांनी तशा कमेंट केल्या आहेत. मुळात गटार आणि गटारी या दोन शब्दांचा काडीमात्र संबंध नाही. गटार ज्याला आपण मराठीमध्ये नाला म्हणतो. गटार हा इंग्रजी शब्द जो नंतर आपल्या बोलण्यात आला आणि नाला शब्द मागे पडला. आता इंग्रजी शब्द म्हटल्यावर तो इंग्रजांच्या वेळीच आला असणार. आणि गटारी हा शब्द आमच्या निदान पाच ते सहा पिढ्यांपासून आम्ही ऐकत आहोत. म्हणजे तेव्हा त्या शब्दाचा आणि गटार ह्या शब्दाचा काहीही संबंध नाही हे निश्चित.
मग गटारी हे नाव कसं पडलं बरं?? तर मूळ शब्द गटारी असा नाहीये.
गटार नव्हे (गताहार)
गत- म्हणजे मागील, जुने, आता नाही असे
आहार – भोजन
गत + आहार = गताहार
जसे शाक + आहार = शाकाहार
तसे गत + आहारी = गताहारी
असे बरेच शब्द आहेत ज्यांचा पुढे काळानुसार अपभ्रंश झाला आहे.
यातील अनेक शब्द मराठी भाषेत इतके रूढ झालेले आहेत, की ते अन्य भाषेतून आले आहेत असं मुद्दामहून सांगितलं नाही, तर कळणारही नाही.
आता हे काही शब्द पाहा, डॅंबीस, वाघीण, फरसबी, झंपर, लालटेन, फलाट, गवन. यांचं मूळ पाहायचंय? पाहा डॅंबीस – डॅम धीस , वाघीण – वॅगन , फरसबी- फ्रेच बीन , झंपर – जंपर, लालटेन – लॅंटर्न, फलाट – प्लॅटफॉर्म, गवन – गाऊन.
तसाच गताहारीचा पुढे जाऊन गटारी असं झालं असावं. दुसऱ्या दिवसानंतर श्रावण सुरू होतो आणि श्रावणात मांस मटणाचं सेवन करायचं नाही म्हणून ह्या दिवशी मटण वगैरे खाल्लं जातं अगदी पूर्वी पासून. आता यात व्हेज नॉनव्हेज वाद मला आणायचा नाहीये आणि तो आजचा विषयसुद्धा नाहीये.
आपल्या भारत देशात भाषेची इतकी विविधता आहे सारख्याच सणाला सुद्धा प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळी नाव आहेत. ही नावे प्रत्येक प्रदेशानुसार, जातीनुसार बदलत असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर पोळा. श्रावणी अमावस्या, पोळा, पोंगल अशी विविध नावे ह्या सणाची. ही नावे पूर्वापार चालत आलेली आहेत. याच प्रमाणे कुणी त्याला दीप अमावास्या म्हणतं तर कुणी गटारी म्हणत. कोकणात तरी सगळीकडे दीप अमावस्या ही गटारी ह्याच नावाने ओळखली जाते. अर्थात त्या दिवशी सगळीकडे जंगी पार्ट्या झाडल्या जातात हे जरी मान्य असलं तर त्याचा नावाशी काही संबंध नसावा हे माझं मत. नावानुसार भेद हे आपण आपण आपल्या सोयीसाठी केले आहेत असं मला वाटत. म्हणजे दीप अमावास्या म्हटलं की खूप धार्मिक वाटतं आणि गटारी म्हटलं की दारू, मटन यांच्या पार्ट्या फक्त. तर अशांना मी सांगू इच्छितो की दीप अमावस्या असुदे किंवा गटारी असू दे प्रत्येकाच्या घरी दिव्यांची पूजा होतेच होते. कारण प्रत्येक जण हा दिवस एक सण म्हणून साजरा करतो.
पण जे गटारी म्हणतात त्यांना हिंदू सणांचा मान नाही, त्यांना सण साजरे करण्याचा अधिकार नाही असं म्हणणं म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्यांना भूतदयेबद्दल बोलण्याचा हक्क नाही असं म्हणण्यासारखं आहे.
प्रत्येक जण आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरा पाळत असतो. मागचा पुढचा संबंध लक्षात न घेता केवळ नावावरून एखाद्या गोष्टीच्या विरोधात जाणं कितपत योग्य आहे.
गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या ?
© PRATILIKHIT
Also Read
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – १
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHITweapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, trishul, sudarshan, bramhadand , हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

No Comment