
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?

दरवर्षी हस्त नक्षत्र आल्यावर पावसाच्या पाण्यापासून दही लावल्याची एखादी तरी पोस्ट व्हॅटप्अँप किंवा फेसबुकवर व्हायरल होतेच. पण नक्की हा प्रकार काय आहे?? खरंच हस्त नक्षत्रातलं पाणी विरजणाचे कार्य करते का??
याबाबत अधिक वाचले असता, असे कळते की गरुड पुराणात असा उल्लेख आहे की, “जेव्हा हस्त नक्षत्र लागतं, त्यावेळेला हस्ताचा जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी वापरून आपण उत्तम विरजण लावू शकतो.”
म्हणजे विरजण लावताना दुधामध्ये ताक किंवा दही न घालता त्याऐवजी हे हस्त नक्षत्राचे पाणी घालायचं, अतिशय उत्तम, घट्ट असं दही लागतं.
बऱ्याच जणांनी हा प्रयोग केला असून तो यशस्वीही झालेला आहे. हे का होतं ह्याचं उत्तर अजून मिळालेलं नसलं तरीही कदाचित अल्कलीच्या कमी अधिक प्रमाणामुळे दही लागत असल्याची शक्यता आहे.
हा प्रयोग कसा करावा?
जेव्हा हस्त नक्षत्राचा पाऊस पडतो तेव्हा भांड्यात हस्ताच पाणी भरुन घ्यायचं. रात्री नेहमी ज्या भांड्यात विरजण लावता, त्या भांड्यात दुधामध्ये या हस्ताच्या पावसाचं पाणी घालायचं. सकाळी उठून पाहिलं तर खरवसासारखं मस्त घट्ट दही लागलेलं दिसेल. हा प्रयोग नक्की करून पाहा.
हस्त नक्षत्र म्हणजे नक्की काय?
उत्तरा फाल्गुनीच्या दक्षिणेला हस्त नक्षत्र आहे. हे नक्षत्र देखील ओळखण्यास सोपे आहे कारण या नक्षत्रातील पाच चांदण्या आपल्या डाव्या हाताच्या पंज्याप्रमाणे आकाशात मांडलेल्या आढळतात.
हस्त पावसाचे नक्षत्र नाही. मोसमी पावसाचा जुगार म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय शेतीत मुख्य पीक म्हणजे खरीप. या खरिपाचाच जिथे शंभर टक्के विश्वास नाही तेथे रब्बी हंगाम मनासारखा होणे केवळ नशिबाचाच खेळ. हस्त नक्षत्र ऑक्टोबर महिन्याच्या आसपास लागते. या नक्षत्रास पाऊस पडलाच तर तो शेतकर्यांना हस्ताने दिलेला आशीर्वाद वाटतो. या पावसामुळे शेतकर्यांच्या अपेक्षा उंचावतात. तशी एक म्हण देखील प्रसिद्ध आहे. ‘पडला हस्त तर शेतकरी मगरमस्त’.
हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. हस्त नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मचिन्ह कन्या आहे आणि राशीचा स्वामी बुध, वर्ण वैश्य, योनी महिष, महावैर योनी घोडा, गण देव आणि नाडी इ. आहेत.
वृक्ष: रीठा वृक्ष
सकारात्मक बाजू: नक्षत्राचा स्वामी चंद्र आणि राशी व कन्या स्वामी बुध आहे. चंद्राच्या वर्चस्वाच्या नक्षत्रात जन्म घेतल्यामुळे, व्यक्ती शांत, भावनिक, इतरांना उपयुक्त आणि आकर्षक व्यक्तिमत्व असते. असे लोक संशोधक, सल्लागार किंवा चिकित्सक बनू शकतात. हस्त नक्षत्रात जन्माला आलेली, व्यक्ती उद्योजक, काम करणारी, कुशल कामगार, व्यापारी, तत्त्वे आणि वेदांची जाणकार आहे, मूळ काम करत आहे आणि मेहनतीने प्रगती करत आहे.
नकारात्मक बाजू: बुध हा चंद्राचा शत्रू आहे. जर कुंडलीत चंद्र आणि बुधची स्थिती वाईट असेल तर ती व्यक्ती दैनंदिन कामात व्यस्त असेल आणि ती नेतृत्व करण्यापेक्षा अनुयायी होण्यास प्राधान्य देतील. त्यांच्यामध्ये चोरीची भावना देखील असू शकते. ही भावना जीवनात दुःख निर्माण करेल. इतरांची खिल्ली उडवणे, उग्रपणा किंवा निर्दयीपणाचे गुण असतील. खोटे बोलण्याच्या सवयीमुळे प्रतिष्ठा नष्ट होत राहील. दारूचे व्यसन असू शकते. तसे असल्यास, नंतर सर्वात वाईट पहावे लागेल.
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
6 Comments