Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

Best Life Quotes in Marathi:- आपल्या आयुष्याशी निगडित एखादी गोष्ट असली की माणूस नकळतपणे त्या गोष्टीशी रिलेट करू लागतो. असे विचार आपल्या आयुष्यात नक्कीच एखाद्या दीपस्तंभाची भूमिका बजावतात.

विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने Life Status in Marathi हा संग्रह वाचायला हवा.

आपल्या विचारांशी आणि निर्णयांशी पक्की असणारी माणसं आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगात खंबीरपणे उभी राहू शकतात. म्हणूनच आयुष्यात यश संपादन करण्यासाठी, नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने Life Status in Marathi मधील विचार वाचायलाच हवेत.

Marathi Life Status | आयुष्याचे विचार

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही आयुष्याशी निगडित सुविचार. हे विचार वाचून तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल.

फोकस क्लीअर नसला की सगळं अंधुकच होऊन बसतं.
मग तो फोटो असू दे किंवा आयुष्य.

मैत्री टिकण्यासाठी रोज बोलणं, भेटणं गरजेचं नसतं.
एकदाही भेट न झालेल्या माणसांमध्येही घट्ट मैत्री असू शकते.

फोनमध्ये चॅटचे स्क्रीनशॉट वाढत गेले की वास्तवातला विश्वास कमी होत जातो.

अवाजवी अपेक्षांच्या वादळात नात्याचं जहाज भरकटू द्यायचं नसेल तर खंबीरतेचा नांगर टाकवाच लागतो.

संसारात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी.

तिने समजून घ्यावं आणि त्याने सांभाळून.

आयुष्य समजण्यात भल्याभल्यांची हयात गेली. त्यामुळे आयुष्य समजण्यात नाही आयुष्य जगण्यात वेळ घालवायला हवा.

स्वाभिमान बाळगण्यात काहीच चुकीचं नाही.
पण आपण कधीकधी अहंकारालाच स्वाभिमान समजून बसतो.

आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव तेव्हाच होते जेव्हा त्या गोष्टीची उणीव भासते.

माणसाकडे काही न काहीतरी कमी असतंच.
कुणाकडे पैसा तर कुणाकडे आयुष्य.

आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्वाचं असतं.

प्रेम व्यक्त करायचं असतं आणि राग लपवायचा असतो.
पण आपण नेहमी उलटंच करतो.

आवडत असलेल्या गोष्टी प्रत्येक वेळी करता येतीलच असं नाही.
कधी परिस्थिती अडवते तर कधी जबाबदारी.

स्वतःच्या फायद्यासाठी अनेक जण आपल्या फांद्या तोडतील.
तुटलेल्या जागेवरून नवी पालवी घेऊन पुन्हा नव्याने बहरता यायला हवं.

जोवर अनुभव येत नाही तोवर नवीन गोष्टींचं आकर्षण असतं आपल्याला.
लहानपणी पटकन मोठं व्हायचं असतं आणि मोठं झाल्यावर पुन्हा लहान व्हायची इच्छा होते.

बऱ्याचदा गोष्टी छोट्या असतात पण त्या वेळीच स्पष्ट न झाल्याने गैरसमज मोठे होतात.

आपलं कोण, परकं कोण हवं संकटाच्या काळात समजतं.
नाहीतर भरतीच्या पाण्यात किनाऱ्यावर उभं राहून पाय भिजवणारे अनेक असतात.

स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी.
दुसऱ्यांच्या यशाशी नाही.

एखाद्याच्या आयुष्यात फक्त असून चालत नाही, आपली उपस्थिती वेळोवेळी दाखवून द्यावी लागते.

केलेल्या मदतीची सतत कुणी जाणीव करून दिली की ती मदत आधार नाही उपकार वाटू लागते.

कधीकधी एखाद्याला आपलंसं करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो.
किनाऱ्यावर उभं राहिलं की भरतीच्या लाटा स्वतःहून येतात भेटायला.

सोबत कुणी असो वा नसो, आपला आनंद कशात आहे हे समजलं पाहिजे.
नाहीतर आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांना दाखवायलाच जास्त जगतो.

बऱ्याचदा मनातले नकारात्मक विचार काढून टाकल्याचा फक्त आव आणतो आपण.
आतल्या आत मात्र चलबिचल नेहमी सुरूच असते आपली.

गोष्ट जर स्वतःच्या स्वार्थासाठी असेल तर कितीही वेळ वाट पाहण्याची तयारी असते आपली.

बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी फक्त पोहोचण्याच्या विचारात प्रवासाचा आनंद घ्यायचं राहूनच जातं आपलं.

योग्य वेळी सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात सहसा भरकटत नाही.

Marathi life quotes

माणसाला एक वाईट सवय आहे.
तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घुटमळतो.

कैचीकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे.
नात्यात असलेल्या गैरसमजाच्या कागदाला एकमेकांना जराही इजा होऊ न देता अलगत कापून बाजूला सारता यायला हवं.

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यातले आपल्या वाट्याला येणारे क्षण जेव्हा तिला नव्याने आवडणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला जातात.
तेव्हा तिला आनंदात पाहण्याचं सुखही असतं आणि ती आपल्यापासून दुरावल्याचं दुःखही.

माणसाचं मन पाहावं चेहरा नाही असं अगदी सहज म्हणतो आपण.
पण पुस्तक पसंत करताना आधी मुखपृष्ठ पाहिलं जातं मग मजकूर.

इतरांना समजावणं सोपं असतं.
खरा कस स्वतःची समजूत काढताना लागतो.

माणसाला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही की त्याला त्रास होती, पण तीच गोष्ट दुसऱ्याला मिळाली तर त्याला जास्त त्रास होतो.

आईच्या मायेच्या वटवृक्षाच्या सावलीत वाढताना त्या वटवृक्षाला आधार देणाऱ्या बापाच्या पारंब्या दुर्लक्षितच राहतात बऱ्याचदा.

माणूस नातं टिकवण्यासाठीची जबाबदारी घ्यायला कचरतो पण जेव्हा हक्क गाजवायची वेळ येते तेव्हा तो सगळ्यात पुढे असतो.

नातं म्हटलं की समजून घेणं आलंच.
पण समजूतदारपणा केवळ एकाच बाजूने दाखवला जात असेल तर दुसरा बऱ्याचदा त्याचा गैरफायदाच घेतो.

माणूस होकार पटकन देतो.
पण नकार देण्याआधी सबबी जास्त देतो.

दुसऱ्याचं मन राखण्यासाठी बऱ्याचदा स्वतःचं मन मारावं लागतं.

आयुष्याचे महत्वाचे निर्णय हे लोकांच्या मनाचा विचार करून कधीच घेऊ नये.
कारण आपली मेहेनत कितीही असली तरीही लोकं मात्र आपल्या नशिबाचाच हेवा करतात.

झालेल्या विश्वासघातासाठी इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
कारण पहिली चूक ही आपल्याकडूनच झालेली असते.
विश्वास ठेवण्याची.

देणं सोपं असतं.
पण आपण दिलेली आपलीच वस्तू परत मागताना प्रचंड दडपण येतं आपल्याला.

Best Life Quotes in Marathi

प्रेमामध्ये पुरावे द्यायची वेळ आली की नातं
आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहतं.

काही निर्णय आपण परिस्थितीसमोर हार मानून घेतो खरे, पण त्याची सल आयुष्यभर राहते.

तारुण्यात अल्लड असणारी मुलं वयात आल्यावर मात्र खूप समंजसपणे वागतात. कारण खांद्यावर पडणारी जबाबदारी आपोआप सगळे शिकवून जाते.

माणूस ओंजळभर देतोय की मुठभर याला महत्त्व नाहीये. त्याच्याजवळ त्याच्यापुरतंही नसताना तो एखादी गोष्ट देतोय याला महत्व आहे.

केलेल्या मदतीची सारखी कुणी जाणीव करून दिली की ती मदत आधार नाही उपकार वाटू लागते.

इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, फक्त आपलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे.

आयुष्यातली सर्वात सोपी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला सल्ला देणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तोच सल्ला स्वतः अमलात आणणे.

आजकाल फक्त विचारांनी श्रीमंत असून चालत नाही, जगण्यासाठी पैसा लागतो.

आपली ओळख सांगून लोकं अनेकदा त्यांचं काम करून घेतात पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ते साधी ओळखही दाखवत नाही.

समोरची व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे त्या व्यक्तीला गमावल्याशिवाय कळतच नाही आपल्याला.

आपली जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यावरच कळतं, की आयुष्यात चंद्र होता आपल्या. पण आपण त्याच्या चांदण्यात न्हाहून जायचं सोडून त्याच्या अमावास्येला आपल्यासोबत नसण्यालाच दोष देत बसलो.

आपल्या आवडत्या व्यक्तीला आपला आयुष्यातून जाऊ देण्यामागे काहीतरी मोठं कारण नक्कीच असतं. कारण आवडणारी कोणतीच गोष्ट माणूस सहजासहजी कधीच सोडत नाही.

वेळीच नाही म्हणायला शिकायला हवं. बऱ्याचदा समोरचा दुखावेल म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काहीतरी करून बसतो आणि नंतर संपूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करावा लागतो.

काही गोष्टी वेळीच सोडून दिल्याचं चांगल्या असतात. पुढे येऊ घातलेल्या सुखांना आयुष्यात जागा करून देण्यासाठी.

चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून इतर गोष्टीही करून पाहाव्यात माणसाने. थोडाफार का होईना. काहीतरी वेगळं केल्याचा आनंद नक्कीच मिळतो.

‘मॅच्युरिटी’ म्हणजे काय? आपण मॅच्युअर आहोत असं अजिबात न समजता समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं.

बालपण जितकं उपभोगता येईल तितकं उपभोगून घ्यावं. कारण जबाबदाऱ्यांचं ओझं अंगावर पडलं की आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो.

कुठे जायचंय हे माहीत नसलं तरी पुढे जायचे प्रयत्न करत राहायला हवं. कारण तळ्यात साचलेलं पाणी तसच राहतं, जारा छोटा असला तरीही स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो.

दरवेळी आपल्यातच काही कमी असेल असं नाही. कधीकधी समोरच्याच्या अपेक्षाही अवाजवी असू शकतात.

परिस्थिती वाईट असली कि माणूस नशीब दोष देऊन मोकळा होतो. पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मानत नाही.

आपण आपली तुलना कुणाशी करतोय यावर आपलं मानसिक समाधान अवलंबून असतं. चंद्राची तुलना चांदण्यांशी केली तर तो उठून दिसतो, सूर्यासमोर तो नेहमीच झाकोळलेला असतो.

क्षण जगता यायला हवेत. आयुष्याचा भरवसा कुणी द्यावा.

एखाद्याशी झालेला वाद त्याचक्षणी मिटवायला हवा. न जाणो उद्या कदाचित आपण माफी मागू पण माफ करण्यासाठी ती व्यक्तीच या जगात नसेल.

समोरच्याच्या आयुष्यातलं आपलं स्थान ओळखता आलं की मग अपेक्षाभंगाचं दुःख सहसा होत नाही. कारण बऱ्याचदा स्वार्थ साधून झाल्यावर गरज संपते माणसाची.

गैरसमज हे बांडगुळासारखे असतात. वेळीच मुळापासून उखडले नाही तर त्या नात्याच्या वृक्षाचा सगळं जीवनरस शोषून घेतात.

कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात.

एखाद्या व्यक्तीची आपल्या आयुष्यातली किंमत कळण्यासाठी त्या व्यक्तीला गमावण्याची भीती एकदातरी मनात निर्माण व्हावी लागते.

एखादी गोष्ट मिळवणं हे ध्येय असावं माणसाचं, कारण विचारानुसार स्वप्न बदलत जातात.

बरं चाललंय सांगायला अनेक जण असतात पण खरं कसं चाललंय हे सांगता येणारी एकतरी व्यक्ती असावी आयुष्यात.

नात्यामध्ये विश्वास ठेवणं महत्वाचं असतं, पण त्याहून जास्त महत्वाचं असतं ते समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास जपणं.

गरज आणि चैन यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान साधंच असतं बऱ्याचदा.

विश्वास कमवायला अख्ख आयुष्य जातं आणि गमवायला फक्त एक क्षण.

गरज आणि चैन यामधला फरक कळला की मुलाचा पुरुष होतो.

लग्न म्हणजे पुनर्जन्म असतो स्त्री आणि पुरुषाचा.
स्त्रीचं घर बदलतं आणि पुरुषाच्या जबाबदाऱ्या.

कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्तं मिळाली की त्या गोष्टींचं ओझं होऊन जातं आपल्याला.
मग तो पाऊस असो किंवा सुख.

Life quotes in marathi for instagram

नात्यात एकमेकांना समजून घ्यायचं असतं.
ऐकून तर आपण अनोळखी लोकांचंसुद्धा घेतो.

सारखं नकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देत राहिलं की मग सकारात्मक गोष्टी दिसेनाशा होतात.

वरवर कितीही शांत भासत असला तरीही मनामध्ये काय वादळ उठतंय हे कधीच कळत नाही आपल्याला.
मग तो माणूस असो किंवा समुद्र.

पुरुषाला जेव्हा त्याच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव होते तेव्हा स्पीडमीटरचा काटा आपोआप खाली येतो.

माणूस आणि पुस्तक यांच्यात एक गोष्ट सारखी आहे.
जोपर्यंत पूर्ण वाचत नाही तोपर्यंत मर्म कळत नाही.

कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही, परिस्थिती नुसार ती बदलत जाते.
माणूस तोच असतो, बदलतो तो लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन.

Life Quotes in Marathi

आयुष्य हे रंगभूमीसारखं असतं. एखादं पाऊल चुकलं तर तिथे रिटेकचा पर्याय नसतो.
झालेली चूक सावरून आयुष्याचं पुढचं नाटक सुरू ठेवावं लागतं.

नेहमी इतरांना समजून घेणाऱ्यालासुद्धा कधीतरी त्याला समजून घेणारं कुणीतरी लागतं.
स्वतःचीच समजूत नाही ना घालता येत कधी.

कमीपणा घ्यायला काही हरकत नाही.
फक्त समोरच्याकडे समजून घेण्याचा मोठेपणा असावा.

अमुकच एक गोष्ट हवी ह्या हट्टापायी न मागता मिळालेल्या चांगल्या गोष्टीही कस्पटासमान वाटायला लागतात आपल्याला.

जगातली सगळी सुखं एका पारड्यात आणि घरी गणपती बाप्पा येण्याचं सुख दुसऱ्या पारड्यात मापलं तरीही दुसरं पारडं थोडंसं जडचं राहील.

Motivational quotes in marathi for students

ज्याला कृष्ण समजला त्याला आयुष्याचं सार समजलं , कारण त्याच्यासारखा मनुष्य जीवनाचा मार्गदर्शक दुसरा कुणी नाही.

Popular Life quotes in marathi | आयुष्याशी निगडित मराठी विचार तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्र मंडळी मध्ये share करायला विसरू नका.

In this in Marathi article you will find all types of quotes in marathi. you can copy and use this inspiration marathi status for your whatsapp status. Marathi Suvichar, marathi thoughts, motivation thoughts in marathi, Life story in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi motivation status, marathi motivation status, motivational speech in marathi, marathi life thought, motivation life thought, marathi life video, motivational quotes, marathi kavita

Follow PRATILIKHIT

https://pratikpravinmhatre.com/

44830cookie-checkBest Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

Related Posts

का झालं इस्रायलचं आर्यन डोम फेल??

का झालं इस्रायलचं आर्यन डोम फेल??

Best Motivational Quotes in Marathi | 100+ मराठी मोटिवेशनल स्टेटस

Best Motivational Quotes in Marathi | 100+ मराठी मोटिवेशनल स्टेटस

का करावी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती ?

का करावी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती ?

लालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

लालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,666 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories