नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे  (Nine forms of Devi – Nav durga)

नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)

नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे

नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे

नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे

 

नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे “नव दुर्गा ” म्हणून संबोधले जाते. शक्ती विना विश्व हे शवासमान आहे असे म्हटले जाते. शक्तिमुळेच तर संपुर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. शक्ति आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र अत्यंत मह्त्वपुर्ण आहे. नवरात्रात ब्रह्मांडातील सर्व शक्ति जागृत होतात. याच शक्तिने दैत्यांचा संहार केला आहे. याच देवीच्या नऊ रूपांची थोडक्यात माहिती घेऊया.

 

१. शैलपुत्री

शैलपुत्री

नवरात्रीचा पहिल्या दिवस शैलीपुत्री देवीचा मानण्यात येतो. तिला पर्वत राज हिमालय व महाराणी मैनावती यांची कन्या आणि पूर्वजन्मीची दक्षपुत्री-सती म्हटले जाते. शैलीपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. जास्वंदाचे फूल तिला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्रे परिधान करण्याचा प्रघात आहे. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या किंवा मुलगी. देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यात पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणमात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते असे मानले जाते.

 

२. ब्रह्मचारिणी

ब्रह्मचारिणी

नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी अशी ही देवी. या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तप, संयम आणि त्यागासाठी ही देवी प्रसिद्ध आहे.

ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे तो म्हणजे, ‘आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे, आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे’ या सजगतेसह जीवन जगत असाल तेंव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता. जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रम्हचर्य होय.

आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेव्हा आपल्या मध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळ स्वभाव आहे. जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनू शकतो.

 

३. चन्द्रघंटा

चन्द्रघंटा

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चन्द्रघंटा या रुपाची आराधना केली जाते. या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त असे दागिने परिधान केले जातात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चारमात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते असे मानले गेले आहे.

जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. देवी चन्द्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.

 

४. कुष्माण्डा

कुष्माण्डा

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्माण्डा देवीची आराधना केली जाते. आपल्या मंद हास्यातून विश्वाची निर्मिती करणारी देवी म्हणजे देवी कुष्माण्डा. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीने ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहे.
कुष्माण्ड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणून हे कुष्माण्ड पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच जणू कोहळ्याप्रमाणे आहे. या कुष्माण्डाप्रमाणेच देवी कुष्माण्डामध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.

 

५. स्कंदमाता

स्कंदमाता

 

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. स्कंदमाता ही भगवान कार्तिकेय म्हणजेच स्कंदाची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे रूप शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. या रूपातील सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.

स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज्ञ आणि प्रविण असतात ते उद्धट असतात पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे.

देवीच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.

 

६. कात्यायनी

कात्यायनी

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. असुरांच्या वधासाठी हाती चंद्रहास खड्ग धारण करणारी काव्ययन ऋषींची पुत्री म्हणजेच देवी कात्यायनी. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. अविवाहित मुलींसाठी या देवीचे पूजन वरदान स्वरुप आहे.

हे देवीच्या मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे एक असे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. या देवीचे पूजन केल्याने भावी वैवाहिक नातेसंबंधामध्ये गरजेच्या सर्व गोष्टींची अनुकूल पूर्तता होते असे मानले गेले आहे.

 

७. कालरात्री

कालरात्री

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. रौद्र स्वरूप आणि उग्र, संहारक अशी तामसी शक्ती असलेली ही देवी आहे. ही देवी दिसायला भयानक असली तरी तिला नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते.

काल म्हणजे वेळ. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि हाच काळ सर्वाचा साक्षी देखील आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती. शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने मुळीच होऊ शकत नाही. म्हणूनच कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती असेही मानले जाते.

 

८. महागौरी

महागौरी

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते.

आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावे म्हणून अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते. गौर म्हणजे गोरा, शुभ्र. शुभ्र रंग शुद्धतेचे प्रतिक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.

 

९. सिद्धिदात्री

सिद्धिदात्री

नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. आपल्या भक्तांना सिद्धी प्राप्त करून देणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री. जे हवे आहे, जे गरजेचे आहे त्याची इच्छा आपण निद्रिस्त अवस्थेतून उठण्यापूर्वी, काही मागण्यापूर्वी आणि आपल्या अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा ज्यादा लवकर पूर्ण होणे म्हणजेच म्हणजे ‘सिद्धी प्राप्त होणे’. साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावलो तर त्या नाहीशा देखील होतात.

आपण स्व मध्ये स्थिर असल्यावरच आपल्याला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होते कारण तेव्हाच आपला समतोल न ढळण्याची खात्री देता येते. गुरुपरंपरेला येथे खूप महत्व आहे म्हणूनच साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच कायम वाटचाल करावी. सिद्धीधात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते. ‘प्राविण्य आणि मुक्ती’, या देवी सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत ज्या आपण गुरुकृपेने प्राप्त करून घेऊ शकतो.

 

हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती

Follow PRATILIKHIT

 

नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे,  नवरात्री, नवदुर्गा, nine forms of durga, ashtami, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री

 

47840cookie-checkनवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)

Related Posts

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

4 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories