Uncategorized
सण आणि सुट्टी….

कोणताही सण असू दे
रजेची रडारड ठरलेली
ऑफिसला जरी जावं लागलं
तरी भक्ती मनामध्ये भरलेली
शाळेत कॉलेजमध्ये असताना मात्र
माझी आणि देवांची जमायची गट्टी
कारण कितीही काहीही झालं तरीही
सणांना मात्र असायचीच सुट्टी
सण कुटुंबासोबत साजरे करण्याची
मजाच काही वेगळी असते
लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याचे
समाधानच काही और असते
ह्याच साठी तर करत असतो
आपण दररोज मर मर काम
कुटुंबाच्या आनंदासाठीच तर
कामाच्या ठिकाणी गाळत असतो घाम
म्हणून असलो व्यस्त कितीही कामात
तरी सणांच्या दिवशी तरी काढावी सुट्टी
एक दिवस का होईना पण
टेन्शन, काम, ऑफिसला मारावी बुट्टी

No Comment