
Friendship…..
ऑगस्ट महिना आला कि सगळ्यांना उत्सुकता असते ती friendship day ची. नवीन,जुन्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी असणारा हा दिवस.या दिवसाला मोठा इतिहास आहे पण तो जास्ती कोणाला माहित नाही आणि तो जाणून घेण्यात कोणाला स्वरस्यही नाही.
मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेला हा दिवस. पण आजच्या social networking च्या जमान्यात मैत्रीची व्याख्याच पूर्ण पणे बदलून गेली आहे. मैत्रीची सुरवात प्रत्यक्षात भेटून होण्याआधी facebook, instagrm या सारख्या social sites वर होते.
बऱ्याचदा असंही होतं कि प्रत्यक्षात कधी भेटलेही नसतील तरीही रोजच्या मित्रांशी आपण ज्या गोष्टी आपण share करत नाही त्या कधीही न भेटलेल्या अनोळखी व्यक्तीशी करतो.
आपल्या आयुष्यात आपले अनेक मित्र होतात. त्यातले कित्येक जण best friends होतात. जर त्या व्यक्तीने आपल्यासाठी इतरांपेक्षा काही जास्ती केलं तर आपण त्याला best friend समजू लागतो. पण शेवटी मैत्रीचं नात मात्र सर्वांसाठी सारखंच असतं ना? मग सर्वच मित्रमैत्रीणींना आपण best friends का म्हणू शकत नाही.
अनेक वेळा असंही होतं कि आपण नवीन निर्माण झालेल्या मैत्रीच्या नात्याला जास्त महत्व द्यायला लागतो. याचा अर्थ असा नाही कि आपण आपल्या जुन्या मित्र मैत्रीणींना विसरतो पण काही अंशी आपली जवळीक त्या नविन व्यक्तीशी वाढलेली असते.जर आपण दोन्ही जणांशी तेवढ्याच आपुलकीने वागलो तर मग नंतर रुसवे फुगवे सांभाळत बसण्याची गरजच पडणार नाही.
जर मैत्रीचं नातं आपण सगळ्यांसाठी सारखंच ठेवलं तर सगळेच आपले best friends होऊ शकतात.त्या साठी आपल्याला पाहिजे तोच /तीच मित्रमैत्रिण ठरवून त्यांनाच best friend का बनवायचं ?
खाली लिहिलेल्या कवितेच्या चार ओळी तुम्हाला नक्कीच आवडतील
मैत्री…..
मैत्री असावी आपल्या मनात जपणारी
मनातली गोष्ट प्रत्यक्षात उतरवणारी
सहवासा सोबत रंगत जाणारी
असावी आपली मैत्री दुसऱ्याला विश्वास देणारी
हवेतला गारवा आणि अडचणींमध्ये विश्वास वाटणारी
बिकट प्रसंगात न विसरता येणारी
सुखामध्ये समोरच्याला हात देणारी
पण दुःखामध्ये समोरच्याचा हात होणारी
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी
एकदाच बरसून थांबणारी
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी
मनाला सुखद गारवा देणारी
आयुष्याच्या नावेमध्ये नावाडी बनणारी
कठीण प्रसंगात सोबत असणारी
फक्त friendshup day पुरता मर्यादित नसणारी
मैत्री असावी दोन जीवांचं नात जपणारी
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
HAPPY FRIENDSHIP DAY
अप्रतिम👌👌👌मैत्रीची व्याख्याच खूप सुंदर केलीस…👍
Tysm apurva 😘
Mast re..pratik jabardast …
Tysm bboy 🙂
👌
Tysm sarvesh
mast bro!!
tysm jammu
अप्रतिम..👌👌
thank you
अफलातून