देवतांनी दुर्गा मातेला दिलेली अस्त्रे

देवतांनी दुर्गा मातेला दिलेली अस्त्रे

 

महिषासुर नामक राक्षसाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी सर्व देवी देवतांनी आदिशक्तीचा धावा केला. सर्व भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि महिषासुराचा वध करण्यासाठी आदिशक्तीचे दुर्गा देवीच्या रुपात अवतार घेतला. महिषासुराच्या वधास साहाय्य म्हणून अनेक देवतांनी आपली अस्त्र शस्त्र देवीला अर्पण केली होती. आज आपण त्या अस्त्रांबद्दल थोडी माहिती घेणार आहोत.

 

देवतांनी दुर्गा मातेला दिलेली अस्त्रे

 

महादेवाचे त्रिशूळ

देवी दुर्गा प्रकट झाली तेव्हा भगवान शंकराने महिषासुराचा वध करण्यासाठी तिला आपला त्रिशूळ दिला. महादेवाच्या त्रिशूळाचे तीन अंग म्हणजे स्वभाव, ध्यान आणि वेटाग्य. जर व्यक्ती आपल्या स्वभावात राहिला, ध्यानधारणा केली आणि वस्तूंबद्दल मोह ठेवला नाही तर मनावर सहज नियंत्रण मिळवता येते. केवळ हा त्रिशूळच अनियंत्रित मन शांत करु शकतो. त्रिशूळ हे शक्तीचे सर्वात मोठे शस्त्र बनले ज्याने महिषासुराचा वध केला.

ब्रह्मदेवाचे कमंडलू

ब्रह्मदेवाने देवीला एक दिव्य कमंडलू दिले. ज्यातील जल कधीच संपत नाही आणि कितीही जल भरले तरी ते पूर्ण भरत नाही. आपलं मनही असंच असतं, कितीही गोष्टी काढल्या तरी ते कधीच रिकामे होत नाही. कितीही ज्ञान भरत राहिलो तरी ते पूर्ण भरत नाही. मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर कमंडलूप्रमाणे ते ज्ञानाने भरत राहा. जर तुम्ही ज्ञानाकडे गेलात तर तुमचे मन कधीही इकडे-तिकडे जाणार नाही.

अग्निदेवाचे शक्ती दिव्यास्त्र

अग्निदेवाने देवी दुर्गाला शक्ती नावाचे दिव्यास्त्र दिले. अग्निदेवाचे दिव्यास्त्र नेमकं काय आहे? उत्तर प्रकाश आहे. राक्षस असो किंवा वाईट सवयी, या सर्व गोष्टी आपल्याला अंधाराकडे घेऊन जातात. हा अंधार घालवण्यासाठी प्रकाशाची गरज आहे. अग्नी यज्ञाचे प्रतीक आहे, यज्ञ वेदांचे आणि वेद ज्ञानाचे प्रतीक आहेत. अग्नीने दिलेले दिव्यास्त्र हे ज्ञान आहे, जे अंधकार दूर करते.

भगवान विष्णूचे चक्र

भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र देवीला दिले. या चक्राने मातेने रक्तबीजसारख्या राक्षसाचाही वध केला होता. सुदर्शन चक्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी फिरत असते. थांबत नाही. हे शिकवते की, तुम्ही नेहमी सक्रिय असाल तर शरीरात शक्ती येईल. मन नेहमी नियंत्रणात राहील कारण शरीर आळशी झाल्यावर मन भरकटते.

वरुण देवाचा शंख

जल देवता वरुण देवाने देवी दुर्गाला शंख दिला. शंख शुभ सुरुवातीचा प्रतीक आहे. मंदिरातील पूजा असो किंवा रणांगणातील युद्ध असो, सर्वांची सुरुवात शंख वाजवून केली जाते. देवीचा हा शंख सांगतो की, जेव्हा मन भरकटू लागते, अनियंत्रित होते, तेव्हा ते हाताळण्यासाठी काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. यामुळे मन एका ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकते.

जलदेवतेने दिलेली कमळाच्या फुलांची माळ

जलदेवतेने देवीला कधीही न कोमेजणाऱ्या कमळाच्या फुलांची माळ दिली. जेव्हा आपण उदास किंवा दुःखी असतो तेव्हा मन आपल्यावट हावी होते. मनमोकळ्या हसतमुख माणसांवर मन कधीच वर्चस्व गाजवत नाही, भरकटत नाही. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नेहमी हसून-खेळून राहणे. देवीच्या गळ्यात कधीही न कोमेजलेल्या कमळाच्या फुलांची माळ हेच शिकवते.

इंद्राचे वज्र आणि घंटा

देवराज इंद्राने आपले वज्र आणि ऐरावत हत्तीच्या गळ्यातील घंटा काढून देवीला दिली. वज्र हाडांपासून बनलेले आहे. जे दधिची ऋषींनी आपला देह जाळून देवतांना दिले होते. वज्र हे त्यागाचे प्रतीक आहे. हे सांसारिक गोष्टींपासून मोह सोडण्याचे प्रतीक आहे.

काळाची तलवार आणि परशू

मृत्यूचे देवता काळ यांनी आपली तलवार आणि परशु अस्त्र देवीला अर्पण केली. देवीने या तलवार आणि परशुने अनेक असुटांचा नाश केला. तलवार आणि परशु या दोघांचीही एक खास गोष्ट आहे, हे दोन्ही अस्त्र सर्व गोष्टी कापतात. मनाने निर्माण केले बंध आपण कापू शकलो तर आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. जे मनाच्या बंधनात जखडलेले असतात ते कधीच मनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

पवन देवाचा धनुष्यबाण

पवनदेव ज्यांना वायूदेव म्हणूनही ओळखलं जातं त्यांनी देवीला अक्षय बाणांचा भाता आणि धनुष्यबाण दिला होता

हिमालयाने दिलेला सिंह

पर्वतराज हिमालयाने देवीला वाहन म्हणून एक सिंह अर्पण केला होता. त्या सिंहावर आरूढ होऊनच देवीने महिषासुर आणि इतर राक्षसांचा वध केला.

 

Also Read

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

देवतांनी दुर्गा मातेला दिलेली अस्त्रे, durga weapons, mata durga weapons marathi

48564cookie-checkदेवतांनी दुर्गा मातेला दिलेली अस्त्रे

Related Posts

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

1 Comment

  1. खुप चांगली, महत्वपूर्ण आणि कधीही माहीत नसलेली माहिती ह्या पोस्ट मुळे मिळाली. खूप धन्यवाद.
    अशीच नवीन नवीन माहिती तुझाकडून आम्हा वाचकांना उपलब्ध होत राहूदे.
    पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories