स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यासाठी योगदान

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यासाठी योगदान
सावरकरांवर टीका करणाऱ्या कमेंट्स पाहिल्या की खरंच त्यांची कीव करावीशी वाटते… बऱ्याच दीडशहाण्या मंडळींनी सादर केलेली कागदपत्रे, त्याचे खंडन करण्यासाठी इतरांनी दिलेले पुरावे हे सगळं फेसबुकवर उपलब्ध असल्याने मला त्यामध्ये पडायचं नाही.
सर्वात महत्वाचं म्हणजे कुणी कुणाला आदर्श मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाही म्हणजे जर गांधींचे, नेहरूंचे समर्थक असू शकतात तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थक असण्यात काहीच गैर नाही. ज्या व्यक्तीने स्वतःच घरदार सोडून आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केलं त्या व्यक्तीचे समर्थक म्हणवून घेण्यात कसलाही कमीपणा नाही आणि त्याबद्दल कुणाला काही स्पष्टीकरण देण्याचीही गरज नाही.
हिंदू म्हणजे नक्की कोण?
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू ह्या शब्दाची मांडलेली संकल्पना आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायलाच हवी. हिंदू म्हणजे केवळ ब्राम्हण नाही, सनातनी नाही,क्षत्रिय नाही, मराठा नाही किंवा आगरी कोळी नाही. ह्या हिंद प्रांतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. मग ते शीख असो, जैन असो, पारशी असो किंवा इतर कुणीही. पण गोष्ट अशी आहे की हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांव्यतिरिक्त इतरांना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास लाज वाटते.
संपूर्ण चित्रपट पाहताना सर्वात जास्त कुणाची चीड आली असेल तर ती आपल्याच लोकांची. कारण ब्रिटीश तर मूठभर होते पण आता जसं होतंय तसच तेव्हाही काही लाळघोटे लोग स्वतःच्या स्वार्थासाठी भारतमातेच्या विरोधात इंग्रजांचे पाय चाटत होते. ब्रिटिश पोलीस ताफ्यामध्ये जवळपास ९०% पोलीस हे भारतीय होते. अर्थात ते त्यांची नोकरी करत होते ह्यात वाद नाही पण ब्रिटिश अधिकारी सामान्य जनतेवर करत असलेले जुलूम, स्त्रियांवर करत असलेले बलात्कार ते काहीही न करता उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि हा त्यांचा गुन्हा होता. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळीही भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की एका स्त्रीचं वस्त्रहरण होताना संपूर्ण सभा गप्प होती त्यामुळे वस्त्रहरण जरी दुशा:सनाने होतं तरीही त्या सभेमध्ये उपस्थित प्रत्येक रथी, महारथी ह्या पापात सहभागी होता.
राहिला प्रश्न अहिंसा वगैरेचा तर स्वतःच्या मनाला एकच प्रश्न विचारावा की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर अहिंसेचा मार्ग अवलंबला असता तर भारत देश मुघलांच्या तावडीतून मुक्त झाला असता का?? मुघलांपासून मुक्त होऊन ब्रिटिशांच्या तावडीत जाण्याआधी जी काही सुखाची वर्षे ह्या भारत देशाने पहिली ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या सशस्त्र लढ्यामुळे.
सावरकर खरंच माफीवीर होते का???
सावरकरांनी माफीनामा लिहून दिला होता म्हणून काहीजण तोंड वर करून त्यांना माफीवीर म्हणून मोकळे होतात. ह्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामधून आपण ग सुद्धा शिकलेलो नाही. दोन पावलं मागे गेल्याने शत्रू गाफिल राहून आपल्याला आपला लढा पुढे नेण्यास वेळ मिळतो ही शिकवण आपल्याला गनिमी काव्यातून मिळते. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा आदिलशाह, अफजलखान, मिर्झाराजे, औरंगजेब यांची माफी मागितल्याचं नाटक करून वेळ मारून नेत आपला कार्यभाग साधून हे हिंदवी स्वराज्य उभं केलंय.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यासाठी योगदान
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल||
ह्या वरच्या ओळी खरडणाऱ्या कवीला सलाम. म्हणजे कसं कोण दोन ओळींमध्ये खुदिराम, चापेकर, आझाद, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानाला क्षणात मातीमोल ठरवू शकतं. गांधींचं स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे यात काही शंकाच नाही पण फक्त गांधींचंच योगदान आहे हा मात्र अतिरेक झाला. स्वातंत्र्य मागून मिळालेलं नाहीये तर ते लढून मिळवलंय. मागून मिळते ती भीक असते आणि लढून मिळतो तो हक्क.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं,त्यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संघटनेचं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान अमूल्य आहे आणि हेच सत्य आहे, तुम्ही माना अथवा नका मानू.
Also Read
नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

No Comment