Uncategorized
निसर्ग आणि मानव….
निसर्ग आणि मानव….
तसं दोघांचंही सख्य
पण यातला एक अगदीच हावरट
ओरबडतोय नुसता निसर्गाला
कधी सुधारणार हा बावळट
उत्क्रांतीच्या नावाखाली
माकडाचा माणूस झाला
अनेक संस्कृती पाहिल्यानंतर
यांच्यातला हैवान जागा झाला
स्वतःला सर्वात बुद्धिमान मानून
याने प्राण्यांना नोकर बनवलं
वणव्यातून कोळसा मिळतोय पाहून
याने संपूर्ण जंगलच पेटवलं
जीवन सुकर बनवण्यासाठी
उभं राहिलं कारखान्यांचं प्रस्थ
पर्यावरण प्रदूषित होतेय पाहून
विचारवंत झाले अस्वस्थ
जशी प्रगती होत गेली
तशी वाढीस लागली याची हाव
पृथ्वीवर जागा कमी पडतेय पाहून
चंद्राचाही ठरवला भाव
कधी आली त्सुनामी
कधी भूकंपाने थरथरली धरणी
दाखवण्या मनुष्यास त्याची मर्यादा
हीच कदाचित निसर्गाची अद्भुत करणी
© PRATILIKHIT
No Comment