श्रीकृष्ण कोण होता? | Who was Shri Krishna ?
भगवान श्रीकृष्णाला देवाचा दर्जा देऊन आपण मोकळे होतो पण देवाचा दर्जा देताना त्याला चमत्कार, असाध्य ते साध्य करण्याची शक्ती आपसूकच आत्मसात आहे असा आपण समज करून घेतो. कृष्ण ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो सर्वज्ञ आहे, तो सर्वशक्तिमान आहे, पण तो एक माणूस आहे. आणि एक माणूस म्हणून जर आपण कृष्णाकडे पाहिलं तर त्याच्या जीवनाचे असंख्य पैलू आपल्याला दिसून येतात. श्रीकृष्णाने जो धर्म सांगितला त्याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला समजतं की तो फक्त धर्म नाहीये तर ते आपल्या जीवनाचं सार आहे. कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगून त्याने येणाऱ्या समस्त मानवजातीला मार्गदर्शन केले. जीवन कसे जगावे, स्वार्थाचा त्याग कसा करावा, लोभ कसा सोडावा, क्रोधावर नियंत्रण कसे आणावे अशा मानवी जीवनातील असंख्य समस्यांचं समाधान भगवद्गीता आहे.
जरासंधापासून प्रजेचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने समुद्रात द्वारकानगरी वसवली. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाही जे जमत नाही ते द्वापारयुगामध्ये करून दाखवणाऱ्या श्रीकृष्णापेक्षा मोठा वास्तुशास्त्रज्ञ दुसरा कोण आहे.
न बोलता फक्त आपल्या कमल नयनांनी मनातलं समजावून देणारा आणि दुसऱ्यांच्या मनातलं समजून घेणारा त्याच्यापेक्षा मोठा मानसशास्त्रज्ञ दुसरा कोण आहे.
फक्त आपल्या बासरीच्या स्वरांवर गोकुळाला आणि प्राणीमात्रांना मंत्रमुग्ध करून ठेवणाऱ्या श्रीकृष्णापेक्षा मोठा संगीतकार कोण आहे.
सुदृढ शरिराची शिकवण देणाऱ्या, आयुर्वेदाचं सर्वोत्तम ज्ञान असणाऱ्या त्याच्यापेक्षा मोठा डॉक्टर कोण आहे.
धर्मासाठी युद्ध करा सांगणारा, स्त्रीच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या त्याच्यापेक्षा मोठा वीर कोण आहे.
प्रजेला सुखी करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या, त्यांचं पालन करणाऱ्या श्रीकृष्णापेक्षा दुसरा मोठा आदर्श राजा कोण आहे.
यज्ञ करुन पाऊस पडणाऱ्या, ग्रहणांची वेळ जाणून जयद्रदाचा वध करवून घेणाऱ्या त्याच्यापेक्षा मोठा हवामानशास्त्रज्ञ दुसरा कोण आहे.
अनियंत्रित RPM ने फिरणाऱ्या, सर्वश्रेष्ठ शस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदर्शन चक्राला नियांत्रित करून त्याचा वापर करणाऱ्या श्रीकृष्णापेक्षा सर्वश्रेष्ठ इंजिनिअर कोण आहे?
श्रीकृष्ण म्हणजे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे. श्रीकृष्ण म्हणजे मानवाच्या जीवनाचं सार आहे.
भगवान श्रीकृष्णांचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला त्याच्याशी निगडित काही महत्वाच्या तारखा आणि दिवस :
जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व
महिना: श्रावण
दिवस: अष्टमी
नक्षत्र: रोहिणी
दिवस: बुधवार
वेळ: १२:०० रात्री
आयुष्य – श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस.
अवतार समाप्तीची तारीख – १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व. महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला
जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र) झाले. कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते. २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.) भीष्म २ फेब्रुवारी रोजी आपला देहत्याग केला. (उत्तरायणाची पहिली एकादशी).
श्रीकृष्णाच्या कुटुंबाची थोडक्यात माहिती :
जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव
संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद
बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)
गुरु, शिक्षक:- ऋषी संदिपनी
जिवलग मित्र:- सुदामा
धर्मपत्नी ८:- रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)
कृष्णाची मुले:- एकूण ८०
श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.
श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.
श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.
श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.
श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.
श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.
श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.
श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.
श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु:
आवडते फुल:- फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)
आवडता प्राणी :- प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.
शंख:- शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.
आयुधं:- त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.
बासरी:- कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .
मोरपंख:- रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.
शिक्षण:- श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.
कार्य:- कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।
अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।
परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।।।।
Also Read
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – १
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
weapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, trishul, sudarshan, bramhadand , हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे
646420cookie-checkश्रीकृष्ण कोण होता?yes Like this:
Like Loading...
No Comment