
का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?
कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्व ( Importance of Kojagiri Pornima)
आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते. कोजागिरी ही शरद ऋतुतील आश्विन महिन्यात येते. या दिवसाला कृषी क्षेत्रात विशेष महत्व दिले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सहाने साजार करतात. ही पौर्णिमा पावसानंतरची पहिली पौर्णिमा असते.
कोजागिरीला ज्याप्रमाणे खगोलशास्त्रीय कारण आहे. त्याप्रमाणेच या दिवसाला धार्मिक महत्वही आहे. यादिवशी रात्री देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. उपवास,पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या रात्री मंदिरे, घरे, उद्याने, रस्ते इ. सर्व ठिकाणी दिवे लावले जातात. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात. त्यानंतर या दोन्हीही देवतांना पुष्पांजली समर्पित करतात. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.
प्रत्येक प्रांतानुसार कोजागिरी पौर्णिमा साजरे करण्याचे स्वरूप बदलते. गुजरातमध्ये रास व गरबा खेळून ‘शरद पुनम’ नावाने ही पौर्णिमा साजरी केली जाते. तर बंगाली लोक याला ‘लोख्खी पुजो’ म्हणतात आणि या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. बिहार-झारखंडमधील मिथिलेमध्ये या रात्री ‘कोजागरहा’ नावाने ही पौर्णिमा ओळखली जाते. राजस्थानी स्त्रिया कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर हे पदार्थ घालून देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राचे चांदणे पडतात. त्यानंतर ते दूध प्राशन केले जाते. पावसात आकाश निरभ्र नसते. परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वच्छ, निरभ्र आणि सुंदर दिसते. या निरभ्र आकाशाचा आनंद घेता यावा व त्याचे स्वागत करावे म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी पोहे व शहाळ्याचे पाणी प्रसाद म्हणून दिले जाते.
कोजागिरी व्रत कथा
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती.
एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.
Also Read
नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
No Comment