नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती
नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती

नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती
नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती
इसवीसन 427 दरम्यान या विद्यापीठाची स्थापना झाली होती. हे जगातील पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं. नालंदा विद्यापीठात पूर्व आणि मध्य आशियातून आलेले जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर या विद्यापठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते. नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, सांख्यदर्शन, तर्कशास्त्र, बौद्ध पंथाचे तत्त्वज्ञान असे अनेक विषय प्रतिष्ठित विद्वानांकडून शिकवले जात. सात शतकांहून अधिक काळ नालंदा विद्यापीठाची भरभराट होत राहिली. जगप्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठाप्रमाणे जगात इतर कोणतंही विद्यापीठ नव्हतं.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुने विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बोलोग्ना विद्यापीठाच्याही आधी जवळपास 500 वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होतं. नालंदामध्ये शिकवलं जाणारं तत्त्वज्ञान आणि धर्माविषयीचा दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला.
गुप्त सम्राटांच्या काळात नालंदा हे एक विश्वविद्यालय म्हणून समोर आलं. हे गुप्त राजे धर्माभिमानी हिंदू होते पण त्यांनी बौद्ध विद्यापीठाची स्थापना केली, कारण त्यांना त्यावेळच्या बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल आणि तात्विक लेखनाबद्दल सहानुभूती होती.
त्यांच्या कारकिर्दीत विकसित झालेल्या उदारमतवादी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमुळे नालंदाच्या बहुविद्याशाखीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विकास झाला.
निसर्गावर आधारलेली आयुर्वेदातील उपचार पद्धती नालंदा विदयापीठात शिकवली जायची. आणि येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही उपचार पद्धती भारतभर पोहोचली. विद्यापीठाच्या परिसरातील भव्य इमारती, सभागृह, अध्यापनाचे कक्ष यातून इतर बौद्ध विद्यापीठांनी प्रेरणा घेतली.
नालंदा विद्यापीठाच्या भित्तिकामाने थायलंडमधील कलेवर प्रभाव टाकला. विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या धातूकामाचा प्रभाव तिबेट आणि मलायन द्वीपकल्पातील धातूकामात दिसून येतो.
प्राचीन भारतातील खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि भारतीय गणिताचे जनक म्हणून आर्यभट्ट यांची ओळख आहे. इसवीसन 6व्या शतकात ते नालंदा विद्यापीठाचे प्रमुख असल्याची शक्यता सांगितली जाते. शून्याला अंक म्हणून मान्यता देणारे आर्यभट्ट पहिले गणितज्ञ होते. खरं तर ही क्रांतिकारी संकल्पना होती. यामुळे गणितीय संकल्पना सोप्या झाल्या. शिवाय त्यांनी बीजगणित आणि कॅल्क्युलस सारख्या क्लिष्ट विषयांतील संकल्पनांही सोप्या करून सांगितल्या.जर शून्याचा शोध लागला नसता तर कम्प्युटर अस्तित्वात आले नसते. त्यांनी चौरस आणि घनमूळ, त्रिकोणमिती, भूमिती विषयांचे नियम तयार केले. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो हे सांगणारे ते पहिले व्यक्ती होते.
या कामामुळे दक्षिण भारतातील आणि अरबी द्वीपकल्पातील गणित आणि खगोलशास्त्राच्या विकासावर परिणाम झाला.
बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी नालंदा विद्यापीठातून चीन, कोरिया, जपान, इंडोनेशिया आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये मोठमोठे विद्वान पाठवण्यात आले. या प्राचीन सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व्हायला मदत झाली.
नालंदा विद्यापीठाची जागा प्रशस्त व निसर्गरम्य होती. एका विस्तृत परकोटात विद्यपीठाच्या इमारती होत्या. या इमारतीपैकी काही महाविद्यालयाच्या काही ग्रंथालयाच्या तर काही आचार्याच्या व विद्यार्थ्यांच्या निवासासाठी इमारती होत्या. काही इमारती दोन मजली, काही चार मजली तर काही नऊ मजली होत्या. इमारतीच्या भिंती व स्तंभ अलंकृत होते. विद्यापीठाच्या भोवताली अत्यंत रमणीय बाग होती. ठिकठिकाणी कमळांची सरोवरे होती. निवास स्थानात विपूल प्रमाणात स्नानगृहे व इतर आवश्यक सोयी होत्या. तसेच विद्यापीठाच्या प्रांगणात क्रिडांगणे होती. या विद्यापीठात जवळपास १५१० अध्यापक आणि १०,५०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. नालंदा विद्यापीठातील धर्मगंज या विभागात जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचे विशाल ग्रंथसंग्रहालय होते. ग्रंथसग्रलयाच्या तीन इमारती होत्या, त्यांची नोंद ‘धर्मगंज’ मध्ये रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नरंजन नावाच्या तीन इमारतीत नालंदा विद्यापीठाचा ग्रंथसंग्रह सामावलेला होता. यापैकी रत्नोदधी ही इमारत नऊ मजली होती आणि प्रामुख्याने या इमारतीत तांत्रिक पंथासंबंधीचे वाड्मय होते. रत्नसागर आणि रत्नरंजन ह्या दोन इमारती सहा मजली होत्या. या तीन इमारतीमध्ये नालंदा विद्यापीठाचे लक्षावधी ग्रंथ ठेवण्यात आले होते. एवढा प्रचंड ग्रंथ संग्रह त्या काळात जगाच्या पाठीवर कुठेही नव्हता. येथील ग्रंथांना रत्न समजून ग्रंथालय भवनांना इतकी यथार्थ नावे दिलेली होती की ती अन्यत्र कुठेही आढळत नाही.

नालंदा विद्यापीठातील अभ्यासक्रम उच्च कोटीचा होता. तसेच या विद्यापीठात उच्च शिक्षणाचीच सोय होती. त्यात व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, योग्यविद्या व अठरा संप्रदाय या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश होता. बौद्ध धर्माशिवाय जैन धर्माचेही तत्वज्ञान नालंदा विद्यापीठात शिकविले जात होते. धर्मग्रंथाबरोबरच व्यवहारिक विषयांचे ज्ञानही येथे दिले जात. चित्रकला, शिल्पकला, मंत्रविद्या, गणितशास्त्र, स्थापत्यकला अशा विविध विषयांचे अध्ययन नालंदा विद्यापीठात त्यावेळी होत होते. त्याच प्रकारे विविध भाषांचेही अध्यापन येथे चालत होते.
परदेशातूनही विद्यार्जनाच्या ओढीने विद्यार्थी नालंदा विद्यापीठात येऊन नालंदा विद्यापीठाची ख्याती लवकरच सर्वत्र पसरली होती. विद्यापीठात प्रवेश दुर्मिळ होता. नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षा होत असे. प्रवेश परिक्षेत अत्यंत कठीन प्रश्न विचारले जात असत. प्रवेश परिक्षा खुप कठीन होत असे. प्रवेश परिक्षेत केवळ २०% ते ३०% विद्यार्थी उत्तीर्ण होत असत आणि तेवढ्यानांच विद्यापीठात प्रवेश मिळत असे विद्यार्जन निःशुल्क होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठातील आचार्यासाठी ज्याप्रकारे भोजन-निवासाची व्यवस्था होती. त्याच प्रकारे विद्यार्थ्यासाठी ही निवासाची व्यवस्था केलेली होती.
नालंदा विद्यापीठात ऋषीतुल्य आचार्याची फार मोठी परपंरा निर्माण झाली. धर्मपाल, चंद्रपाल, गुणमती, स्थिरमती, प्रभामित्र, ध्यानचंद्र, शीलचंद्र यासारखे श्रेष्ठ कुलपती नालंदा विद्यापीठात होऊन गेले. नालंदा विद्यापीठाच्या प्रदीर्घ पंरपरेत नागार्जुन, आर्यदेव, वसुबंधू , अंग, शीलभद्र, शांतरक्षित, जिनमित्र व ज्ञानचंद्र यासारखे थोर विद्वान आचार्य नालंदा विद्यापीठातून होऊन गेले. येथील आचार्य सर्व प्रकारच्या विद्यामध्ये पारंगत होते. त्याही पलीकडे त्यांनी तत्वज्ञान, न्यायशास्त्र व तंत्रज्ञान यासारख्या विषयावर महत्वपूर्ण ग्रंथही लिहलेत. विशुद्ध चारित्र्य आणि अजोड विद्वता याबद्दल या सर्व ऋषीतुल्य आचार्याची सर्वत्र ख्याती होती.
नालंदा विद्यापीठामध्ये चीन, मंगोलिया, थाईलंड, श्रीलंका, बर्मा, कोरिया इत्यादी देशातून विद्यार्थी विद्यार्जनाकरिता येत होते. विद्यार्थाकडून कोणत्याच प्रकारची शुल्क घेत नव्हते. विद्यार्थासाठी भोजनाची व्यवस्था व वस्त्र मोफत दिले जात होते. या विद्यापीठाकरिता धन (संपत्ती) गावा – गावातून येत होते. यांच्या नावाकरिता २०० समृद्ध गांव लागलेले होते. ज्यांच्या मधून ५०% धन एकट्या सम्राट हर्षवर्धनांनी दिलेले होते ही गोष्ट बौद्ध जगतात गौरवाचा विषय आहे. तथागत बुद्धाच्या काळात नालंदा एक समृद्ध गाव होता (कस्बा) या विद्यापीठात बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या जास्त होती. येथे प्रावारिक नावाच्या एक श्रीमंताने तथागत प्रावारिक भवन आणि आम्रवन दान दिलेले होते. या ठिकानी कधी-कधी तथागत बुद्ध निवास करीत होते. एक वेळा तर महावीर जैन आणि तथागत बुद्ध एकाच वेळी नालंदा मध्ये थांबले होते.

नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती
नालंदा विद्यापीठ कुणी आणि का जाळले?
६ व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ हे जगातील ज्ञानाचे केंद्र होते. जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठामध्ये येऊन शिक्षण घेत होते. कोरिया, जपान, चीन, तिबेट, तुर्कीस्तान मधील ज्ञानवंत शिक्षक देखील या विद्यापीठाला लाभले होते.
संपूर्ण जगभरात केवळ नालंदा विद्यापीठाचा डंका होता. परंतु बख्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या सुलतानाने ज्ञानाची ही नगरी जाळून उध्वस्त केली. यामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे भयंकर नुकसान झाले सोबतच अतिशय मौल्यवान, दुर्मिळ ग्रंथ संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि येणाऱ्या पिढ्या त्या पुस्तकातील ज्ञानापासून वंचित राहिल्या.
नालंदा विद्यापीठ केवळ खिलजी ने उध्वस्त केले असे नाही. त्या अगोदर दोन वेळा हे कृत्य झाले होते. स्कंदगुप्ताच्या काळात मिहीरकुलाने नालंदा विद्यापीठावर हल्ला चढवून ते उध्वस्त केले होते.
पण त्या नंतर स्कंदगुप्ताच्या वंशजांनी पुन्हा एकदा उभारले, ते देखील पूर्वी पेक्षा अधिक विशाल. पण त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गौडा राज्यकर्त्यांनी नालंदा विद्यापीठाची वाताहत केली, यावेळी बौद्ध राजा हर्षवर्धन याने विद्यापीठाचे पुन्हा एकदा निर्माण केले आणि तिसऱ्यांदा तुर्की सुलतान बख्तियार खिलजीने ११९३ साली नालंदा विद्यापीठाची राख केली ती कायमची, त्या नंतर नालंदा विद्यापीठ आजतागायत पुन्हा कधीही उभे राहू शकले नाही. चला जाऊन घेऊया या अग्नीकृत्यामागचा बख्तियार खिलजीचा हेतू!
पूर्वी भारत म्हणजे सोन्याने-संपत्तीने मढलेला देश म्हणून सर्वदूर प्रचलित होता. त्यामुळे परकीय नेहमीच आपल्या देशावर आक्रमण करून लुटी करायचे. तसेच आपला प्रदेश देखील बळकवायचे. याच परकीय शत्रुंपैकी एक होता इख्तियारुद्दीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी!
त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये त्याचा दबदबा होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. या कालखंडात नालंदा विद्यापीठ राजगिर चे उपनगर होते. या विद्यापीठामध्ये जगभरातून आलेले १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्यांना देशोविदोशीचे २००० शिक्षक शिकवीत होते.
एकदा बख्तियार खिलजी खूप आजारी पडला. कोणत्याच औषधाने त्याला गुण येईना. तेव्हा कोणीतरी त्याला नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे प्रमुख राहुल श्रीभद्र यांच्याकडून इलाज करवून घेण्याचा सल्ला दिला पण खिलजीला एखाद्या हिंदू वैद्यांपेक्षा आपल्या हकीमांवर जास्त विश्वास होता. एखाद्या हिंदू वैद्याकडून इलाज करवून घेणे त्याला अपमानकारक वाटत होते. पण हकीमांना काही त्याची तब्येत सुधारण्यात यश मिळत नव्हते, शेवटी नाईलाजाने खिलजीने राहुल श्रीभद्र यांना आपल्या उपचारासाठी बोलावून घेतले.
पण त्यान राहुल श्रीभद्र यांच्यापुढे एक अट ठेवली ती म्हणजे, मी कोणतेही भारतीय बनावटीचे औषध घेणार नाही आणि जर मी बरा झालो नाही तर तुम्हाला मृत्युदंड देण्यात येईल.
ही अट ऐकून राहुल श्रीभद्र विचारात पडले, पण त्यांनी खिलजीचे म्हणणे मान्य केलं. काही दिवसांनी ते खिलजी जवळ आले, त्यांनी त्याच्या हातात कुरण दिले आणि सांगितले की, यातील ठराविक पाने वाचली की त्याच्या प्रकृतीमध्ये फरक पडेल. आणि आश्चर्य!
खिलजीच्या प्रकृतीमध्ये फरक पडू लागला. खरंतर हा कोणताही चमत्कार नव्हता. जी जी पाने राहुल श्रीभद्र यांनी खिलजीला वाचायला सांगितली होती, त्या पानांवर त्यांनी औषधाचा लेप लावला होता, ज्यामुळे बोटाला थुकी लावून खिलजी जेव्हा पान उलटायचा, तेव्हा ते औषध मुखावाटे त्याच्या पोटात जायचं.
खिलजी हळूहळू पूर्ण बरा झाला, पण राहुल श्रीभद्र यांचे उपकार मात्र तो साफ विसरला. एखाद्या भारतीय वैद्याने मला बरे करावे ही भावना त्याच्या अंगाचा तिळपापड करू लागली. आपले हकीम हिंदू वैद्यांपेक्षा श्रेष्ठ ठरले नाहीत हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना, म्हणून त्याने रागाने संपूर्ण नालंदा विद्यापीठच उध्वस्त करून टाकण्याचे ठरवले.
असं म्हणतात की विद्यापीठामध्ये इतकी पुस्तके होती की आग जवळपास ३ महिने सतत धुमसत होती. एवढं करूनही खिलजीचं मन शांत झालं नाही. ह्या क्रूरकर्म्याने नालंदा विद्यापीठातील हजारो धार्मिक नेत्यांची आणि बौद्ध भिक्षूंची हत्या केली.

नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती
बख्तियार खिलजी कोण होता?
बख्तियार खिलजी १२व्या शतकाच्या उत्तरार्धात गर्मसिर, हेलमांड, अफगाणिस्तान येथे जन्मला. तुर्कस्तानच्या खलज जमातीतील एक, खलज भाषा बोलणारा म्हणून खिलजी. याच्यानंतर १०० वर्षांनी आलेल्या अल्लादिन खिलजी आणि याचा काही संबंध नाही.
याची उंची कमी होती आणि हात लांब होते त्यामुळे त्याला सैन्यात घेत नव्हते. त्याने गझनीकडे काम मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. पुढे तो दिल्लीच्या मोहम्मद घोरीकडे आला पण इथेही त्याच्या पदरी निराशा आली. पुढे तो बदायून येथे गेला. तिथल्या एका तुर्की सरदाराकडे त्याला सैन्यात नोकरी मिळाली. पुढे त्याला मिर्झापूरची जहागीरी मिळाली.
बख्तियार खिलजी बुटका असला तरी अतिशय महत्वाकांक्षी,चपळ, शूर, जाणता आणि हुशार होता. अफगाणिस्तानातून येणार्या अशाच महत्वाकांक्षी लोकांना बरोबर घेऊन त्याने मिर्झापूरमध्ये आपले बस्तान बसवले आणि सैन्य बळकट केले. पूर्वेकडील बिहार आणि बंगाल या सुपिक भागाकडे त्याची नजर गेली.
खिलजी या भागात शिरण्याचा बेत करत असतांना बिहार आणि बंगालचा राजा लक्ष्मण सेन (वय ८०) आपली राजधानी नादिया (बंगाल) इथे होता. सेन साम्राज्य खिळखिळं झालं होतं, त्यातील सरदार आपापले सुभे सांभाळण्यात मग्न होते. या संधीचा फायदा घेत बख्तियार खिलजीने सेन साम्राज्यावर एकापाठोपाठ एक अशी अनेक आक्रमणं केली. ११९३ मध्ये त्याने ओदांतपूरी विश्वविद्यालय नष्ट केले आणि त्या जागी किल्ला बांधला. १२००मध्ये त्याने नालंदा आणि विक्रमशीला ही विश्वविद्यालये नष्ट केली. अशातर्हेने तो बिहारचा राज्यकर्ता बनला. १२०४ मध्ये त्याने नादियावर अचानक आक्रमण केले. लक्ष्मण सेन पळून गेला आणि बख्तियार खिलजी बिहारपाठोपाठ बंगालचा राजा बनला.
पण त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचे लक्ष तिबेटकडे गेले. बंगालचे तिबेटबरोबर व्यापारी संबंध होते. चहा आणि घोडे (आसाम, सिक्किम, भूतान, तिबेट) असा हा व्यापार मार्ग होता. त्याकाळी सैन्यासाठी लागणारे अतिशय मौल्यवान असे घोडे तिबेटमध्ये होते. खिलजीला तिबेट ताब्यात घेऊन हा व्यापारी मार्ग आणि सिल्क रुटचा काही भाग यावर वर्चस्व ठेवायचे होते.
पण हा सगळा बेत खडतर होता. १२०६ मध्ये त्याने तिबेटवर आक्रमण केले.१५ दिवस उत्तर बंगाल आणि सिक्कीम पार करत तो तिबेटमधील चूंबी येथे पोहोचला. त्याला फारसा प्रतिकार झाला नाही पण तिबेटी लोकांनी रचलेला तो एक सापळा होता. हिमालयाच्या पर्वतराजी, थंड हवामान यात बंगालमधून गेलेल्या खिलजी आणि त्याचा सैन्याचा निभाव लागला नाही. गनिमी काव्याने लढत तिबेटी लोकांनी खिलजीचे अनेक सैनिक मारले. पराभव दिसू लागताच खिलजी परतू लागला पण परतीच्या वाटेवर तिबेटी लोकांनी गनिमी कावा वापरुन खिलजीचे अनेक सैनिक मारले.
शिल्लक राहिलेल्या भूकेल्या आणि पराभूत सैन्यानिशी खिलजी कसाबसा उत्तर बंगालमध्ये परतला. ब्रह्मपूत्रा नदी पार करतांना त्याच्यावर कामरुप देशाने (आसाम) आक्रमण केले. असं म्हणतात १०,००० सैन्यानिशी गेलेला खिलजी फक्त १०० सैन्यानिशी परतला.
तिबेटचा दारुण पराभव खिलजीच्या मनाला लागला आणि त्याने अंथरुण धरले. त्याच्याच एका सरदाराने सूरा भोसकून त्याचा १२०६ मध्ये खून केला.
नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती
Also Read
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – १
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
weapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, trishul, sudarshan, bramhadand , हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

No Comment