अंकोरवाट मंदिर (Angkor wat information in Marathi)

अंकोरवाट मंदिर (Angkor wat information in Marathi)

अंकोरवाट मंदिर ,जगातील सर्वात मोठं विष्णुमंदिर (Angkor wat information in Marathi)

अंकोरवाट मंदिर

दक्षिण-पूर्व आशियामधील कंपूचिया, पौराणिक वेळचा कंबोदेश म्हणजेच आताच्या कंबोडियामध्ये स्थापित असलेलं अंकोरवाट हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. अंकोरवाट हे केवळ हिंदूंचं सर्वात मोठं मंदिर नाहीये तर ते संपूर्ण जगातलं सर्वात मोठं धार्मिक स्मारक आहे. जवळजवळ ४०२ एकर परिसरात पसरलेलं अंकोरवाट मंदिर हे जगातील सर्वात मोठं विष्णुमंदिर देखील आहे.

असं म्हणतात की अमर होण्याच्या लालसेपोटी तत्कालीन खमेर राज्यकर्ता राजा सूर्यवर्मन द्वितीय याने बाराव्या शतकात (१११२-५३) ह्या मंदिराची निर्मिती केली. ह्या मंदिराबद्दल एक आख्यायिका अशीही आहे कि देवराज इंद्र यांनी आपल्या मुलाला राहण्यासाठी महाल म्हणून या मंदिराची निर्मिती केली होती. एका चिनी यात्रेकरूच्या म्हणण्यानुसार या मंदिराची निर्मिती एकाच रात्रीत एका अलौकिक शक्तीकडून झाली आहे. शक्तिशाली खमेर साम्राज्याच्या अस्तानंतर अनेक शतके हे मंदिरे आजूबाजूच्या जंगलामध्ये हरवून गेले होते.

अंकोरवाट मंदिर

मीकांग नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर फ्रेंच निसर्ग अन्वेषक हेनरी महोत यांनी सन १८६० मध्ये पुन्हा शोधून पुन्हा जगासमोर आणले. अंकोरवाट मंदिरात सुरुवातीला भगवान शंकरांची पूजा केली जायची पण नंतर हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित करण्यात आले. येथे असलेलं विष्णू मंदिर हे मेरू पर्वताचे प्रतीक मानले जाते.

अंकोरवाट मंदिर

अंकोरवाट मंदिराला स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना म्हटले जाते. खमेर शास्त्रीय शैलीने प्रभावित स्थापत्य असलेल्या या मंदिराचे मुख्य शिखर जवळजवळ ६४ मीटर उंच आहे, याव्यतिरीक्त अजून आठ शिखरे आहेत ज्यांची उंची ५४ मीटर आहे. मंदिराच्या चारही बाजूला साडेतीन किलोमीटर लांब दगडाची भिंत आहे. त्यापलीकडे ३० मीटर रिकामी जमीन आणि त्यानंतर जवळजवळ १९० मीटर रुंद पाण्याने भरलेली दरी आहे. असे म्हणतात कि या मंदिराच्या निर्मितीसाठी जवळजवळ पाचशे करोड रेतीच्या दगडांचा वापर केलेला आहे. प्रत्येक दगडाचे वजन दीड टन इतके आहे.

अंकोरवाट मंदिर

मंदिराच्या गॅलरीमध्ये तसेच भिंतींवर बळी-वामन, स्वर्ग-नरक, समुद्र मंथन, देव-दानव युद्ध, महाभारत तसेच रामायण आदी पुराणांशी संबंधित अनेक चित्र कोरली गेलेली आहेत. या चित्रांमध्ये रामायणाची संक्षिप्त कथा कोरलेली आहे.

सन १९८६ पासून सन १९९३ पर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने अंगकोरवाट मंदिराच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलली होती. बाराव्या शतकात निर्माण झालेल्या ह्या मंदिराला १९९२ साली युनेस्को मार्फत जागतिक वारसास्थळांमध्ये सामील करण्यात आलेलं आहे.

Also Read

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

अंकोरवाट मंदिर, Angkor wat information in Marathi, Hindu Temples, Ancient Hindu Temples, Ancient India

48850cookie-checkअंकोरवाट मंदिर (Angkor wat information in Marathi)

Related Posts

नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती

नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि माहिती

वीरभद्र मंदिर, लेपाक्षी | Veerbhadra Temple

वीरभद्र मंदिर, लेपाक्षी | Veerbhadra Temple

विरुपाक्ष मंदिर

विरुपाक्ष मंदिर

कैलाश मंदिर | Kailash Temple

कैलाश मंदिर | Kailash Temple

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 238,892 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories