हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

 

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे ( पाशुपतास्त्र, नारायणास्त्र, ब्रम्हास्त्र )

 

आपल्या हिंदू पुराणग्रंथांमध्ये म्हणजेच रामायण, महाभारत, विष्णुपुराण , गरुडपुराण यांत असंख्य दिव्य शस्त्रांस्त्रांचा उल्लेख आढळतो. तेव्हाची ही हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे आताच्या अणुबॉम्बपेक्षाही प्रचंड विनाशकारी होती. एका शस्त्राच्या उपयोगाने असंख्य सैनिकांचा संहार होत असे. ही सर्व शस्त्रांस्त्रे मिळवण्यासाठी त्या इष्ट देवतेची आराधना करावी लागत असे. भक्ताच्या तपश्चर्येने प्रसन्न झाल्यावर देवता आपले शस्त्र त्या भक्ताला प्रदान करत असे. अशाच काही दिव्य शश्त्रात्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

ब्रम्हास्त्र

ब्रम्हास्त्र

ब्रम्हास्त्र सुरवातीला सत्ययुगात निव्वळ देवी देवतांकडेच असे. त्यानंतर हे ब्रम्हास्त्र गंधर्वांना प्राप्त झाले. कालांतराने त्रेता आणि द्वापार युगात सर्वसामान्य मानव आणि राजे यांच्याकडे ब्रम्हास्त्र येऊ लागले. श्री राम यांनी लक्ष्मणाला मेघनादावर हे अस्त्र चालवण्यापासून थांबवले होते. भगवान परशुराम आणि देवव्रत भीष्म यांच्यात अंबा प्रकरणावरुन झालेल्या युद्धात भीष्मांचे ब्रम्हास्त्र आणि परशुराम यांचा परशु एकमेकांवर आदळून होणारा विध्वंस टाळण्यासाठी महादेवांना मध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. एकदा प्रक्षेपित केलेले ब्रम्हास्त्र पुन्हा नक्कीच मागे घेता येत असे पण त्यासाठी काही विशिष्ट मंत्रोच्चारण आणि पद्धती अस्तित्वात होती ती येत नसल्यास त्या व्यक्तीने ब्रम्हास्त्र चालवणे निषिद्ध मानले जाई.

 

पाशुपतास्त्र

पाशुपतास्त्र

पाशुपतास्त्र नावातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. सजीव म्हणून जन्म घेतलेल्या कोणत्याही प्राण्याचे आचरण पशू सारखे उद्दाम झाले तर त्यांचा अधःपात करण्यासाठी तयार केलेले अस्त्र म्हणजेच पाशुपतास्त्र. भगवान महादेव या अमोघ अस्त्राचे स्वामी असल्यामुळे त्यांना पशुपतिनाथ असेही म्हटले जाते. ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती, विष्णु म्हणजे पालन आणि शिव म्हणजे प्रलय अशी संरचना असल्याने भगवान महादेव ज्या अमोघ अस्त्राने जीवसृष्टीचा अंत करून एका नवीन पर्वाची सुरवात करतात ते हेच पाशुपतास्त्र. महाभारतात अर्जुन आज्ञातवासात असताना त्याने हे अस्त्र प्राप्त करण्यासाठी महादेवांची आराधना केली होती. अर्जुन हा असा एकमेव मानव आहे ज्याची सखोल परीक्षा घेऊन महादेवांनी त्याला अखेर पाशुपतास्त्र प्रदान केले. अन्यथा हे अस्त्र महादेव आणि अर्जुन यांच्याशिवाय आणखी कोणाकडेही नाही.

 

नारायणास्त्र

नारायणास्त्र

नारायणास्त्राचा प्रयोग प्रत्येक युद्धात एकदाच केला जावा असा नियम सत्ययुगात केला गेला आहे. या अस्त्राची मारक क्षमता इतकी प्रचंड असते की कोणीही त्याच्या पुढ्यात टिकाव धरू शकत नाही. कोणी याचा विरोध केला तर ते पाहून हे अस्त्र आणखी तेजःपुंज होऊन आपली ताकद दुप्पट करते. पराजित होणे वा मृत्यु याहून जास्त शेवट काहीच उरत नाही. जो कोणी आपली शस्त्रे टाकून हात जोडेल त्यावर हे शस्त्र वार करत नाही कारण त्याची रचनाच निशस्त्र माणसालाच अभयदान द्यावे अशी केली गेली आहे.

कुरुक्षेत्रावर युद्धात ज्यावेळी अश्वत्थाम्याने पांडवांच्या विरोधात नारायणास्त्राचा उपयोग केला होता त्यावेळी आकाशात पांडव सेनेचा समूळ विनाश करण्यासाठी अकरा रुद्र, अगणित चक्र, गदा, त्रिशूळ यांची निर्मिती झाली होती. ज्याने प्रतिवार केला ते सारे जिवाला मुकले. भगवान श्रीकृष्णाने पांडवसेनेला जोवर हे अस्त्र शांत होत नाही तोवर आपली शस्त्रे टाकून समर्पण करण्याची सूचना केली. सर्वांनी त्यानुसार कृती केल्यावरच नारायणास्त्र निष्प्रभ झाले. म्हणूनच कोणत्याही युध्दात गरज असल्यासच सरतेशेवटी हे अस्त्र वापरण्याचा सल्ला दिला जातो.

हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती

Follow PRATILIKHIT

weapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

47042cookie-checkहिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

Related Posts

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories