हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – ३

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – ३

 

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे ( वायव्यास्त्र,आग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र )

 

आपल्या हिंदू पुराणग्रंथांमध्ये म्हणजेच रामायण, महाभारत, विष्णुपुराण , गरुडपुराण यांत असंख्य दिव्य शस्त्रांस्त्रांचा उल्लेख आढळतो. तेव्हाची ही हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे आताच्या अणुबॉम्बपेक्षाही प्रचंड विनाशकारी होती. एका शस्त्राच्या उपयोगाने असंख्य सैनिकांचा संहार होत असे. ही सर्व शस्त्रांस्त्रे मिळवण्यासाठी त्या इष्ट देवतेची आराधना करावी लागत असे. भक्ताच्या तपश्चर्येने प्रसन्न झाल्यावर देवता आपले शस्त्र त्या भक्ताला प्रदान करत असे. अशाच काही दिव्य शश्त्रात्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

वायव्यास्त्र

वायव्यास्त्र

 

निसर्गातील एक प्रचंड ताकदवान आणि तितकीच विध्वंसक शक्ति म्हणजे वेगाने वाहणारा वारा. युद्धभूमीवर मंत्र सामर्थ्याने अत्यन्त बलशाली वादळ आणि सोसाट्याचा वारा निर्माण करून प्रतिपक्षाच्या सैन्याची पुरेवाट लावण्यासाठी जी अस्त्रे वापरली जात त्यात

एक प्रमुख अस्त्र मानले गेले आहे. या अस्त्राची स्वामी देवता वायुदेव असल्याने याचे आवाहन करताच रणभूमीवर प्रचंड वेगाने अंधार दाटून जोरदार वादळ निर्माण होत असे. प्रतिपक्षाचे सैनिक त्या तीव्र वार्‍याचा सामना करता न आल्याने मागे हटून जात.
रामायण काळात महर्षि विश्वामित्र यांनी प्रभु श्री राम यांना त्यांच्या बाल्यावस्थेत वायव्यास्त्र प्रदान केल्याची नोंद आहे. महाभारतात अंतिम युद्धात क्रोधित अर्जुनाने समोरील त्रिगर्त सेनेवर वायव्यास्त्राचा प्रयोग केलेला ज्यामुळे आकाशाला विक्षुब्ध करणारे वादळ निर्माण झाले ज्यामुळे समोरील सेना आणि त्या मर्यादेत येणार्‍या सार्‍याच गोष्टी कस्पटासमान उडू लागल्या अशी नोंद केलेली आहे.

वायव्यास्त्राचा प्रकोप शांत करण्यासाठी भार्गवास्त्राचा प्रयोग करावा लागतो असा दाखला आपल्याला पुराणात लिहलेला आढळतो.

 

आग्नेयास्त्र

आग्नेयास्त्र

 

प्रचंड ताकदवान आणि तितकीच अतिविध्वंसक शक्ति म्हणजे आग. युद्धभूमीवर मंत्र सामर्थ्याने आकाशातून अग्निवर्षा करून सहज आटोक्यात न येणारी आग प्रज्वलित करून त्याद्वारे भयानक संहार करण्यासाठी जी अस्त्रे वापरली जात त्यात आग्नेयास्त्र एक प्रमुख अस्त्र मानले गेले आहे. या अस्त्राची स्वामी देवता अग्निदेव असल्याने याचे आवाहन करताच रणभूमीवर आकाशातून कित्येक प्रज्वलित झालेल्या स्फोटक बाणांची प्रचंड वेगाने वर्षा होत असे. जमिनीवर आल्यावर त्यामुळे मोठे वणवे लागून प्रचंड विनाश घडून येत असे.

पुराणात या अस्त्राच्या प्रयोगाचे कित्येक दाखले आढळून येत असले तरी महाभारत युद्धात द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने प्रयोग केलेल्या आग्नेयास्त्राची दाहकता वर्णित केलेली आहे. अश्वत्थाम्याने याचा प्रयोग केल्यावर आकाशातून पांडव सेनेवर प्रचंड वेगात उल्कापात आरंभ झाला. गरम हवा वाहू लागली, दग्ध झालेल्या जमिनीमुळे नद्या सरोवरांचे पाणी उकळून जलचरांचा समूळ विनाश झाला आणि या अस्त्राच्या एका वापराने तब्बल एक अक्षौहिणी पांडव सेना (सामान्यपणे १,१०,००० पायदळ, ६५,००० घोडदळ, २१,८७० हत्तीदल आणि २१,८७० रथदल) इतका प्रचंड विनाश झाला असे नमूद करण्यात आले आहे.

आग्नेयास्त्राचा प्रकोप शांत करण्यासाठी पर्जन्यास्त्राचा प्रयोग करावा लागतो असा दाखला आपल्याला पुराणात लिहलेला आढळतो.

 

पर्जन्यास्त्र

पर्जन्यास्त्र

 

विध्वंस करणे आणि विध्वंस थोपवून धरणे अश्या दोन्ही गोष्टींची पूर्तता पाण्यामुळे होते. युद्धभूमीवर मंत्र सामर्थ्याने अत्यन्त वेगवान पर्जन्यवृष्टीची स्थिती निर्माण करून प्रतिपक्षाच्या सैन्याची धूळधाण उडवून देण्यासाठी जी अस्त्रे वापरली जात त्यात पर्जन्यास्त्र एक प्रमुख अस्त्र मानले गेले आहे. या अस्त्राची स्वामी देवता वरूणदेव असल्याने याचे आवाहन करताच रणभूमीवर सूर्यप्रकाश बाजूला सारून सर्वत्र अंधारून येते. आकाशात अचानक ढगांची दाटी होते आणि त्यानंतर प्रचंड वेगाने जोरदार पाऊस पडतो. प्रतिपक्षाचे सैनिक वाहणारे वारे, कडकडाट करणार्‍या विजा आणि मुसळधार पावसाचा प्रतिकार करता न आल्याने मागे सरकतात.

पर्जन्यास्त्र हे पाऊस पाडणारे अस्त्र असल्याने ते सहसा प्राथमिक अस्त्र म्हणून वापरले जात नाही. समोरील पक्षाने आपल्या सेनेवर आग्नेयास्त्राचा प्रयोग केल्यास त्याचे निवारण करण्यासाठी म्हणून हे अस्त्र प्रतिघात करणारे द्वितीय अस्त्र म्हणून वापरले जाते. असे असले तरीही पर्जन्यास्त्राने होणारी हानी सुद्धा काही कमी नाही. सतत आणि अल्पावधीत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे ते ज्या भागात प्रक्षेपित केलेय तिथे ढगफुटी सारखा पाऊस होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. महाभारत आणि रामायण काळात कित्येक प्रसंगात याचे उल्लेख निवारक अस्त्र म्हणून केले गेले आहेत.

पर्जन्यास्त्राचा प्रकोप शांत करण्यासाठी भार्गवास्त्र वा पर्वतास्त्राचा प्रयोग करावा लागतो असा दाखला आपल्याला पुराणात लिहलेला आढळतो.

 

Also Read

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – १

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २

हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?

गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??

अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती

Follow PRATILIKHIT

weapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, trishul, sudarshan, bramhadand , हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

57800cookie-checkहिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – ३

Related Posts

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,656 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories