लालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

लालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?च्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

लालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान? | Mumbaicha Raja in information in Marathi

 

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ आहे . या मंडळाची स्थापना सन १९२८ साली झाली. मंडळाने सन १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात संपुर्ण हिंदुस्थानातील पहिली २२ फुटी गणरायाची उंच उत्सव मुर्ती बनविली व लालबाग हे नाव जगविख्यात केले. त्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात भव्य व नेत्रदिपक अश्या सजावटीवर भर देऊन दक्षिण भारतामधील मदुराई येथील प्रसिद्ध अश्या मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती भविकांसमोर साकारली. अमृतमहोत्सवी वर्षानंतर २२ फुटी उंच गणराया सोबत आकर्षक सजावट हे मंडळाचे समिकरण बनून गेले. त्यामुळेच “लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ-गणेशगल्ली” म्हणजे “भव्यतेची परंपरा व संस्कृतीची जोपासना” हे समिकरण जनमानसात उमटले.

भारतातील विविध तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे काहींना वेळे अभावी व आर्थिक अडचणीमूळे पाहता येत नाहीत तेव्हा विविधतेने नटलेल्या भारतातील या स्थळांचा आनंद भक्तांना घेता यावा या विचाराने उत्सव मंडळाने भव्य-दिव्य देखावे उभारण्यास सुरवात केली. मदुराईचे मिनाक्षी मंदिर, राजस्थानचे हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, सुवर्णलंका, हिमालय-केदारनाथ मंदिर आणि म्हैसुरचे चामुंडेश्वरी मंदिर इ. देखावे सादर केले. भाविकांनी हे सर्व देखावे अक्षरश: डोक्यावर घेतले व विविध नामांकित संस्थांनी पारितोषिके देऊन मंडळास वेळोवेळी गौरविले.

सन २००४ साली मंडळाने आपल्या गणेशाची ख्याती जन मानसात तसेच भक्तांच्या मुखी सहज रहाण्यासाठी गणेशास “मुंबईचा राजा” असे प्रचलीत करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला व एक दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करून मंडळाचे वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक व प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत माजी अध्यक्षांच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले. मोठया दिमाखदार कार्यक्रमाने मंडळाने आपला गणेश ” मुंबईचा राजा “ म्हणुन सर्वोन्मुख केला.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गणेशगल्ली परिसरातून सकाळी ठीक ८:०० वाजता निघते. हया दिवसाचे आणि हया मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतून विसर्जना करिता निघण्याचा पहिला मान हा मुंबईच्या राजाचा असतो आणि त्या नंतर इतर मंडळे गणेश विसर्जनाकरिता मार्गस्थ होतात. ढोल – ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि लाखो भाविकांचा जनसमुदाय हे हया विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असते. विसर्जन मिरवणुक गणेशगल्ली परिसर, डॉ. एस.एस. राव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, आर्थर रोड, सात रस्ता, लॅमिंगटन रोड हया मार्गे गिरगाव चौपाटी पर्यंत उत्साहात व जल्लोषात चालु राहते.

 

 

जाणून घ्या लालबागच्या राजाचा इतिहास | History of Lalbaghcha Raja

 

बाँम्बे ह्या शहराला इंग्रजाच्या दृष्टीकोनातुन तेव्हा खुप अधिक महत्व दिले जात होते.देशातील इतर सर्व राज्यांच्या मध्ये जो व्यापार होत होता.त्यांच्यापेक्षा अधिकतम उद्योग व्यापार हा त्याकाळी बाँम्बे येथे होत असे. ह्यामुळे त्याकाळी बाँम्बे हे शहर देशाच्या राजधानी असलेल्या दिल्ली शहरापेक्षा अधिक वरचढ तेव्हा मानली जात होते.

बाँम्बे शहरात समुद्र किनारे देखील जवळच होते म्हणुन बाँम्बे ह्या शहरातुन एकेकाळी ब्रिटीशांना व्यापार उद्योग करण्यासाठी खुप नफा प्राप्त होत असे. ब्रिटीश काळामध्ये बाँम्बे मध्ये तेव्हा अनेक नवनवीन उद्योग व्यवसाय उदयास आले होते.मोठे मोठया कारखान्यांची देखील इथे तेव्हा बांधणी करण्यात आली. जागोजागी नवनवीन उद्योग व्यवसाय कारखाने सुरू झाल्याने बाँम्बे ह्या शहराचे पुर्ण स्वरूपच तेव्हा बदलून गेले होते. यातच बाँम्बे मध्ये तेव्हा अजुन एक नवीन उद्योग क्षेत्राचा उदय झाला म्हणजे टेक्सटाईल मिलचे कापड गिरणीचे देखील काम येथे इतर व्यवसायांसोबत सुरू करण्यात आले.

त्याकाळी लाल बाग परळ भागात अनेक कापड गिरण्या बांधण्यात आल्या होत्या.काम जोरात चालु झाल्याने ह्या गिरणीत कामासाठी अधिक मजुरांची आवश्यकता भासु लागले ज्यामुळे इथे कामगारांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ लागल्या. ह्या कापड गिरणीत जे मजदुर काम करीत असे ते इथेच लाल बाग परळ मध्ये राहु लागले.म्हणजे कायमचे स्थायिक झाले.ज्यामुळे लाल बाग परळ भागात लोकांच्या वस्त्यांचे चाळींचे प्रमाण वाढत गेले.

बाँम्बे मध्ये झपाटयाने होत असलेल्या ह्या विकासामुळे इथे लोकांना राहण्यासाठी हळुहळु जागेची कमतरता भासु लागली. म्हणुन त्या काळातील इंग्रज सरकारने लाल बाग परळ येथे असणारी पेरू चाळ व तेथील मार्केट हटवून त्याजागी नवीन कारखाना उभारायचे ठरवले.लाल बाग परळ येथील मार्केटमध्ये माशांची विक्री करणारया लोकांसमोर ह्यामुळे मासे विक्रीसाठी आता कुठे बसायचे असा जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा लोकमान्य टिळकांनी प्रारंभ केलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम पुण्याबरोबरच मुंबई मध्ये देखील पसरला होता ज्याने लोकांच्या मनात श्रदधा तसेच भक्तीची भावना निर्माण होऊ लागली.याचसोबत ह्या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे येथील सर्व लोकांना एकत्र जमता येत होते.संघटीत होता येत होते.

मुंबई मध्ये देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापणा होऊ लागली होती अशा परिस्थिति मध्ये जे लाल बाग परळ मधील मासे विक्री करणारे कोळी लोक होते त्यांनी त्यांचा मासेविक्री साठीचा जो जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे तो सुटावा म्हणुन सर्व मिळुन त्यांनी गणपतीस साकडे घेतले ज्यात त्यांनी गणपतीला अशी मागणी केली की गणपती बाप्पा आम्हाला आमच्या मासे विक्रीकरीता हक्काची जागा मिळु दे,प्राप्त करून दे हा लाल बाग परळ येथील मासे विक्री करणारया लोकांकडुन आपल्या इच्छापुर्तीसाठी गणपतीला केलेला पहिला नवस होता.

यानंतर गणपतीला नवस बोलल्यानंतर ह्या सर्व मासे विक्रेत्यांनी नवीन जागेचा शोध घेण्यास सुरूवात केली.ज्यात त्यांना यश प्राप्त झाले अनेक व्यापारींनी त्यांना ह्यासाठी मदत देखील करण्याचे आश्वासन अणि अवघ्या एक वर्षात त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ प्राप्त झाले. लाल बाग परळ मधील मार्केटमध्ये मासे विक्री करत असलेल्या ह्या सर्व मासे विक्रेत्यांना त्यांना विक्रीकरता स्वताच्या हक्काची जागा अखेरीस प्राप्त झाली. गणपतीला जो नवस ह्या मासे विक्रेत्यांनी केला होता तो पुर्ण झाला.गणपती बाप्पाच्या कृपेने हा चमत्कार घडुन आल्यामुळे येथील लोकांनी ज्या मार्केटमध्ये त्यांना मासे विक्रीसाठी जागा प्राप्त झाली.तिथेच एक गणपती बाप्पाची मुर्ती स्थापित केली. स्थापने च्या पहिल्या दिवसापासुन नवसाला पावणारा गणपती म्हणुन हा गणपती अख्ख्या लाल बाग परळ तसेच देशाच्या कानकोपर मध्ये प्रसिदध झाला होता. म्हणुन दुरवरचे बाहेरगावचे लोक देखील इथे गणपती बाप्पाला नवस बोलण्यासाठी येऊ लागले.तेव्हापासुन हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणुन जगभर ओळखला जाऊ लागला. ह्या गणपतीला केलेला आपला प्रत्येक नवस नक्कीच पुर्ण होतो अशी भाविकांची दृढ श्रदधा ह्या गणपतीबाबद निर्माण झाली.

स्वातंत्रपूर्व काळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. १९४६ साली `श्री’ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. इ.स. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात `श्री’ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. १९४८ महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आली

इ.स. १९४७ सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्रउभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिलकी निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले. इ.स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश’ आणि `कालियामर्दन’ हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म. ल. पाटील, ना. गणपतराव तपासे, ना. गोविंदराव आदिक, ना.मालोजी निंबाळकर, म्यु.कार्पोरेटर डॉ.नरवणे, नवाकाळचे सहसंपादक गोविंदराव महाशब्दे, प्रकाशचे वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे श्री. गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे यांची व्याख्याने झाली.

हळुहळु हा गणपती इतका विख्यात झाला की मुंबई येथील गणेशोत्सवाचा हा प्रमुख घटक बनला.हा गणपती लाल बाग परळ येथील मार्केटमध्ये स्थापित केला असल्यामुळे लोक ह्या लाल बागचा गणपती म्हणुन संबोधित करू लागले. हा गणपती लाल बाग येथील लोकांच्या मनावर राज्य करतो म्हणुन यास लाल बागचा राजा असे देखील म्हटले जाते. आधीपासुनच ही गणेशाची मुर्ती विविध स्वरूपात साकारली जाऊ लागली. हा गणपती कधी मासेमारी करणारया कोळी लोकांच्या होडीत बसलेला आहे तसेच श्रीकृष्णाप्रमाणे गणपती बाप्पा रथ चालवत आहे असे दृश्य असणारी अशी देखील गणपतीची मुर्ती येथे साकारण्यात आली होती. यामुळे लाल बागचा हा गणपतीचे स्वरुप अणि याच्या आजुबाजुला केला जाणारा देखावा रोशनाई लोकांच्या आकर्षणाची मुख्य बाब बनली. ह्या गणपतीच्या मुर्तीच्या उंचीत देखील आता वाढ करण्यात आलेली पाहावयास मिळते.इथे स्थापण केली जाणारी सध्याची गणपतीची मुर्ती किमान वीस ते पंचवीस फुट इतकी लांब असते. आज लाखो भाविक गणेशोत्सवात ह्या नवसाला पावणारया लाल बागच्या राजाचे दर्शन घ्यायला लांबुन लांबुन येतात.गणेशोत्सवाच्या काळात रोज किमान एक लाख भाविक हे रांगेत उभे राहुन ह्या लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात.

राजाची मुर्ती बनवायची सुरूवात ही गणपती बाप्पाच्या चरणांपासुन केली जाते.ह्या दिवशी पादय पुजन सोहळा देखील आयोजित करण्यात येत असतो. गणेशोत्सवाच्या ह्या काळात मोठमोठया सेलिब्रीटी अभिनेते,राजकीय कार्यकर्ते नेते मंडळी इथे खास लाल बागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात. गणेशोत्सवात ह्या मंदिरात येणारया सेलिब्रिटीच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलिस पथक तसेच सुरक्षा रक्षक येथे नेमण्यात येतात. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आपणास इथे दिसुन येते.नवसाच्या रांगेत तर लाखो भाविक दहा ते बारा तास नंबर लावून उभे राहत असतात.इतकी भयानक गर्दी गणेशोत्सवात येथे असते.

गणपतीच्या आरत्या | मराठी आरती संग्रह

Follow PRATILIKHIT

https://pratikpravinmhatre.com/

 

का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

43821cookie-checkलालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

Related Posts

का झालं इस्रायलचं आर्यन डोम फेल??

का झालं इस्रायलचं आर्यन डोम फेल??

Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

का करावी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती ?

का करावी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती ?

का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?

का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories