
का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?
का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?
का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?
या वर्षी जून महिन्यात हरदीपची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावरुन भारत आणि कॅनाडामध्ये वाद सुरू झालाय. खलिस्थानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना केला होता. भारताने हे आरोप फेटाळत कॅनडा खलिस्तानी दहशदवादी आणि गॅंगस्टर्सना आश्रय देत असल्याचं म्हंटले जात आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
हरदीप हा खलिस्तान या फुटीरतावादी विचारसरणीचा समर्थक होता. पंजाब राज्याला भारतापासून वेगळे करण्याची मागणीसाठी तो आग्रही होता.
खलिस्थानी दहशदवाद्यांच्या हत्येनंतर भारत-कॅनडा मध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहे. यांनतर मोदी सरकारने मोठा निर्णय या संदर्भात घेतला आहे. कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणं अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आले आहे. याबाबत अधिकृत घोषणा जरी झाली नसली, तरी कॅनडामध्ये व्हिसा केंद्राचं संचालन करणाऱ्या बीएलएस इंटरनॅशनल वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या वादचा परिणाम मात्र सामान्य जनतेवर होतांना दिसत आहे. दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या होत्या. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय उपस्थित आहेत. तसंच भारतात देखील कॅनडातील बरेच पर्यटक आणि विद्यार्थी येत असतात. यामुळे दोन्ही देशांमधील तणावाचा फटका या विद्यार्थी, कर्मचारी आणि पर्यटकांना बसताना दिसत आहे.
कॅनडा भारताशी नाहक घेतलेला पंगा महागात पडू शकतो. भारतामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठी मदत होते. एका दहशतवाद्याच्या हत्येचे भांडवल करणे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांना महागात पडू शकते. भारत सरकारचा हा एक निर्णय या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका देऊ शकतो.
काय आहे फाईव्ह आय अलायन्स?? | What is Five Eyes Alliance in Marathi
फाईव्ह आय अलायन्स पाच देशांची आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटना आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या पाच देशांचा समावेश आहे.
या संघटनेची सुरवात १९४३ मध्ये यूके-यूसए यांच्या कराराने झाली. ज्याला ब्रुसा करार म्हणून ओळखल जातं.
पुढे १९४७ मध्ये कॅनडा आणि त्यानंतर १९५६ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा त्यात समावेश झाला.
जेव्हा दुसरं महायुध्द झालं तेव्हाच खऱ्या अर्थाने या संघटनेची औपचारीक सुरवात झाली होती. त्यानंतर शीत युध्द सुरू झालं या महायुध्दापासून एकमेकांना मदत करण्यासाठी, देशांना सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. दहशतवाद, सायबर हल्ले, आणि इतर समस्यांबद्दल हे देश चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतात.
फाईव्ह आय अलायन्स ही जगातील सर्वात तकादीची सिग्नल इंटेलिजन्स आहे. माहीती गोळा करणं हा महत्वाचा अजेंडा या संघटनेचा आहे. विशेष म्हणजे सायबर हल्ले शोधण्यासाठी आणि करण्यासाठीही ओळखली जाणारी ही संघटना आहे. या संघटनेतल्या देशांकडे जगातील सर्वात प्रगत असं तंत्रज्ञान, साधणं आणि काम करणारे लोक आहेत. तसेच त्यांचे माहीती गोळा करणारे उपकरनही अनेक ठीकाणी विस्तारलेले आहेत. ज्यामुळे त्यांना माहीती गोळा करणे सहजपणे शक्य होतं.
ज्याचा फायदा ते अधिक प्रमाणात घेत असतात. तसेच एक विशेष म्हणजे पाचही देश वेगवेगळ्या पध्दतीने गुप्त माहीती गोळा करण्यात माहीर आसल्याचं त्यांच्या कामातून दिसुन येतं. मिळालेली माहीती योग्य आणि सोप्या पध्दतीने शेअर आणि सादर केली जाते. ज्यामुळे पुढील आमंलबजावणी करण्यासाठी त्यांना सोयीचं होतं. त्याच बरोबर पाचही देश सातत्याने माहीतीच्या संदर्भातले आपडेट एकमेकांना पुरवत असतात आणि त्यावर तोडगा काढत असतात. त्यामुळे त्यांच्या एकत्रीत येत काम करण्याच्या पध्दतीमुळे जगातील सर्वात लवकर आणि खरी माहीती गोळा करणारी संघटना म्हणून उदयास आली आहे. जे की, या संघटनेची ताकद आहे.
आता सध्या सुरू असलेल्या भारत आणि कॅनडा वादातही, फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्समधील आपले सहकारी असलेल्या कॅनडाची मदत करण्यास मैदानात उतरली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भारत व कॅनडा वादाचा इतिहास ? | India vs Canada issue history in Marathi
भारत व कॅनडा वादाचा इतिहास मराठीमध्ये बघायला गेलं तर 1980 च्या दशकात शीखबहुल पंजाब राज्यात हिंसक बंडखोरी करून खलिस्तान चळवळीने शिखर गाठले.
कॅनडातील खलिस्तान चळवळीचा इतिहास, 40 वर्षांहून अधिक जूना आहे
1980 च्या दशकाच्या सुरुवातीला पंजाबमध्ये उदयास आलेल्या दहशतवादाचे परिणाम कॅनडामध्येही झाले.
1982 मध्ये, तत्कालीन पंतप्रधान पियरे ट्रूडो Pierre Trudeau (Father of Justin Trudeau) यांनी पंजाबमधील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या तलविंदर सिंग परमारला भारताकडे सुपूर्त करण्यास नकार दिला.
कॅनेडियन पत्रकार टेरी मिलेव्स्की (Terry Milewski) यांनी त्यांच्या “ब्लड फॉर ब्लड” (Blood for Blood) या पुस्तकात असे लिहिलेले आहे की खलिस्तानी आव्हानाला कॅनडाच्या सरकाराच्या प्रतिसादावर 1982 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह भारतीय राजकारण्यांनी टीका केली होती.
जून 1984 मध्ये सुवर्ण मंदिरात अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशन ब्लूस्टारच्या (Operation Bluestar) नंतर आणि अकाली तख्त, शिखांचे सर्वात पवित्र शीख आसनास झालेल्या नुकसानीमुळे या चळवळीला चालना मिळाली. त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशभरात सुरू झालेल्या दंगलीत शिखांच्या हत्या होऊ लागल्या त्यामुळे शिखांचे कॅनडामध्ये स्थलांतर वाढले.
त्यानंतर, इंटरनॅशनल शीख युथ फेडरेश (International Sikh Youth Federation) ISYF बब्बर खालसा ब्रिटनमध्ये उदयास आले, तर जागतिक शीख संघटनेचा उगम कॅनडा (CANADA) आणि यूएस (US) मध्ये झाला.
जून 1985 मध्ये बब्बर खालसाने एअर इंडियाच्या (AIR INDIA ) कनिष्क (KANISHK) विमानात बॉम्बस्फोट घडवून आणला तेव्हा कॅनडाला दहशतवादाच्या सर्वात मोठ्या व भयानक कृत्यांचा सामना करावा लागला, परिणामी 80 मुलांसह 331 नागरिकांचा यात मृत्यू झाला.
पंजाबमधील बब्बर खालसाचा प्रमुख असलेल्या तलविंदर सिंग परमार हा या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड असल्याचे या तपासात समोर आले.
हा तणाव निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1998 मध्ये, अणुचाचण्यांनंतर ओटावाने भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले होते. 1948 मध्ये कॅनडाने काश्मीरमधील जनमत चाचणीला पाठिंबा दिला तेव्हा दोन्ही राष्ट्रांमधील मतभेद स्पष्ट झाले.
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/
No Comment