
Uncategorized
Friendship Day
आठवतोय का तुम्हाला
शाळेतला आपला फ्रेंडशिप डे
रविवारी सुट्टी असायची
म्हणून दोस्तीत रंगणारा तो सॅटर डे
रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँडने
हात पूर्ण भरून जायचे
शिक्षकांच्या नजरेस पडू नये म्हणून
सगळे गुपचूप वर्गातच बसायचे
होळी आणि फ्रेंडशिप डे
जुना शर्ट ठरलेला असायचा
होळीत रंग आणि फ्रेंडशिप डेला नावं
ह्यांनीच संपूर्ण शर्ट माखायचा
तेव्हा मैत्री दर्शवण्यासाठी
स्टेटस वगैरेची गरज नसायची
छोटीशी बांधलेली कपड्याची चिंधीही
मैत्रीची व्याख्या सांगून जायची
हळूहळू काळ बदलला
तसे फॅन्सी फ्रेंडशिप बँडही आले
पण सोशल मीडियाच्या फॅडमूळे
वास्तवातले मित्र काहीसे दूर झाले
© PRATILIKHIT
No Comment