
Uncategorized
Engineer
Engineer आजकाल
विनोदाचा विषय झालाय
शिकून सुद्धा नोकरी नाही म्हणून
बेरोजगार म्हणून प्रसिद्ध झालाय
सामान्यांच्या कल्पनाशक्तीपलीकडचे
शोध लावतो तो Engineer
किचकट गोष्टी सोप्या करून
जगाला देतो तो Engineer
शिक्षणपद्धतीने आपल्या
त्याचा वाजवलाय बँडबाजा
पण तंत्रज्ञानाच्या पटावरचा
शेवटी तोच एकटा राजा
कितीही विनोद केले तरीही
इंजिनिअरचं महत्व कमी होत नाही
त्याच्याशिवाय तंत्रज्ञानाचं
साधं पानही हलत नाही
No Comment