December..🎉🎊

प्रिय डिसेंबर,

तुला काहीतरी सांगायचंय..
तसं तुला दरवर्षी मी काही ना काही सांगतोच..
तुला भेटण्यापूर्वी हातून घडलेल्या चुका आणि तुला भेटण्यानंतर पुन्हा तुझी भेट होईपर्यंत ठरवलेले मनसुबे..
सगळेच तुला त्यांच्या मनातलं सांगत असतील ना…तुला आणि स्वतःला किती आश्वासनं देत असतील…
पण सगळे खरच ती आश्वासनं पूर्ण करतात का रे….? की पाच सहा मिनिटांचा मोटिवेशन व्हिडिओ बघून नंतर तुला सांगतात आणि नंतर विसरून जातात….कारण मी स्वतः किती तरी वेळा असाच वागलोय….
कंटाळा नाही का रे येत तुला आम्हा सगळ्यांच्या अशा खोट्या वागण्याचा???
’11 months wasted, one more to go…’ असं मोठ्या तोऱ्यात पोस्ट करतो आम्ही…ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट अभिमानाने मिरवतो…जाणारं प्रत्येक वर्ष आपल्याला काही ना काही शिकवून जातं..आपल्या हातून त्याच चुका पुन्हा घडू नये इतकीच त्याची माफक अपेक्षा असते.

या वर्षात मी एक गोष्ट मात्र शिकलोय….एखादी गोष्ट आपली नसल्याची जाणीव आपल्याला सारखी होत राहिली तर उगाच तिला ठेवण्याचा अट्टाहास न करता तिचा त्याग करावा…निदान ज्याच्या नशिबात असते त्याला तरी ती मिळेल…बऱ्याच गोष्टी आपण ठरवतो पण प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसंच घडेल असं नाही ना…आपल्याला हवं तसं घडलं तर चांगलंच आहे पण दुर्दैवाने तसं नाही घडलं तर त्यातून खचून न जाता पुढे जाणं शिकायला हवं.

तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

© PRATILIKHIT

11360cookie-checkDecember..🎉🎊

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

2 Comments

  1. ही तू शिकलेली गोष्ट मी पण लक्षात ठेवेन😊 सर्वानीच लक्षात ठेवायला हव म्हणजे जगणं सोपं होईल.😁

Leave a Reply

Blog Stats

  • 116,893 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories