गणपती Marathi Kavita

गणपती Marathi Kavita

गणपती Marathi Kavita

येता समीप गणेशोत्सव
उत्साहित झाले सर्व जण
आता अकरा दिवस नुसती धमाल मस्ती
हेच काय ते मुख्य कारण

एरवी धुळीने माखणारे रस्तेही सजले
रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्यांनी
दुमदुमून गेला आसमंत
ढोलताशा पथकाच्या वाद्यांनी
नवीन मंडळं स्थापन झाली तशी
प्रतिष्ठेच्या नावाखाली स्पर्धा वाढली
भक्तीभाव कमी झाला पण
मूर्तींची उंची मात्र वाढली
पारंपरिक गणेशोत्सव अस्ताला जाऊन
देवाच्या नावाखाली व्यवहार सुरू झाला
भक्तांची भेट घेण्यासाठी
देवालाच परवाना घ्यावा लागला
अकरा दिवस देव भक्तांमध्ये मिसळला
आपल्यावरील श्रद्धा पाहून मनोमन सुखावला
झटपट दर्शनाच्या नावाखाली चाललेली लूट पाहून मात्र
थोडासा आपल्याच कार्यकर्त्यांवर खट्टू झाला
विसर्जन मिरवणुकीतील गाणी ऐकून
त्यालाही थोडं आश्चर्य वाटलं
नवीन सिनेमा येऊन गेलाय वाटतं
त्यानेही गाणं पाठ करून टाकलं
भरल्या डोळ्यांनी निरोप देणाऱ्या भक्तांना पाहून
त्यालाही थोडं वाईट वाटलं
पुढच्या वर्षी आपणलवकर यायचं
त्यानेही मनोमन ठरवून टाकलं

Follow PRATILIKHIT

https://pratikpravinmhatre.com/

42240cookie-checkगणपती Marathi Kavita

Related Posts

159

159

150

150

145

145

141

141

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 238,538 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories