
Uncategorized
स्मार्ट फोन
केवळ संपर्काचं साधन म्हणून
मोबाईल फोनचा शोध लागला
स्वतःला काळानुसार अपग्रेड करून
गुलामच मालकाला डोईजड झाला
भिंतीवरचं कॅलेंडरसुद्धा
याने स्वतःत सामावून घेतलं
सगळे नंबर पोटात घेऊन
डायरीलाही अडगळीत धाडलं
कर्कश गजराऐवजी हा
भूपाळी म्हणून उठवू लागला
वेळ स्वतःच्या स्क्रिनवर दाखवून
याने घड्याळाचाही काटा काढला
सोशल सोशल म्हणता म्हणता
याने आप्तेष्टांपासूनच दूर केलं
बोलणं हळूहळू कमी होऊन
मेसेज पाठवायचंच प्रमाण वाढलं
सुखसोयींच्या नावाखाली
तंत्रज्ञानाचा अतिवापर वाढला
माणसाला परावलंबी बनवून
फोन मात्र स्मार्ट झाला
©PRATILIKHIT
No Comment