
Uncategorized
International Men’s Day
उपमा मिळते फणसाची त्याला
समजणं त्याला आहे जरा अवघड
कितीही प्रेमळ असता तो
तरी इतरांना मात्र नेहमी वाटतो दगड
वेळप्रसंगी तो ही खचतो
पण जाणवू देत नाही कधी
वाईट त्यालाही वाटतंच
पण आसवं गाळत नाही कधी
पडला जरी तो एकाकी
करतो संकटांशी दोन हात
असेनात अनंत अडचणी सामोऱ्या
तो जिद्दीने त्यावर करतो मात
स्त्री पुरुष रथाची चाकं दोन
त्यावरच टिकतो संसार सारा
जगतजननी शक्तीसुद्धा महादेवासवेच
सांभाळते सृष्टीचा पसारा
©PRATILIKHIT
No Comment