Uncategorized
कला आणि कलाकार
आयुष्य फार व्यस्त आहे
सर्वांनाच वाटतं
दिवसभराच्या ताणतणावाने
आभाळ मनात दाटतं
थकून येतो वैतागून येतो
कुठेतरी बरसावसं वाटतं
कुणाचातरी हात हाती घेऊन
मनमोकळं बोलावसं वाटतं
अन नकळत येऊन हात धरतो
तोच जुना कुंचला किंवा लेखणी
म्हणतात हो व्यक्त तू आमच्यामार्फत
लिही खुशाल अन चितार चित्र देखणी
हात त्यांचा धरताक्षणी
विश्व माझे बदलते
काही क्षण मरगळ झटकून
मन चंदेरी दुनियेत रमून जाते
कलेच्या सानिध्यात विसर पडतो अडचणींचा
कशाला हवा मग तो एकच प्याला
आपल्या आनंदासाठी तरी जपावी प्रत्येकाने
एकतरी आवडती कला
© PRATILIKHIT
No Comment