Nightlife 🌃

घरच्यांपासून सुटका हवी म्हणून
केला त्याने मित्राला कॉल
चल लिटिल लिटिल मारू
आता उघडे रात्रीचे पब आणि मॉल

चालू राहणार बस आणि टॅक्सी
मुंबईकरा आता तुला कसली धास्ती
विसरून रोजच्या प्रवासातले हाल
दिवसरात्र करायची मस्ती

वेळ मिळेल लोकांना फॅमिलीसोबत
ही तर वेडी आशा होती
नाईटलाईफचा सिनेमा पाहायला गेलो
तर तिथे हाऊसफुल्लची पाटी होती

लोकसंख्येचा वाढतंच चाललाय फुगा
त्याचा करताय का तुम्ही विचार
सगळे नियम पायदळी तुडवून
गुन्हे करून गुन्हेगार पसार

नाईटलाईफ सुरू करून
बनेल का मुंबईचं शांघाय
ट्रॅफिक, तुंबणारं पाणी,गर्दी आणि प्रदूषण
जनतेच्या या प्रश्नांना मिळेल का न्याय

© PRATILIKHIT

11640cookie-checkNightlife 🌃

Related Posts

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

ओळख

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 115,817 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories