Uncategorized
ISRO
इतर देश अवकाशात पोहोचले असताना
काही अवलीयांनी एक स्वप्न पाहिलं
स्वदेशी बनावटीचं रॉकेट बनवून
त्याला सायकलवरून लाँचपॅड पर्यंत नेलं
टॅलेंटची कमी नाहीये आमच्याकडे
यांनी अनेकदा दाखवून दिलंय
हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी बजेट मध्ये
यांनी मंगळयान बनवलंय
एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून
यांनी जगाला चकित करून सोडलंय
अनेक मोहीमा यशस्वी करून
भारताचं नाव जगात मोठं केलंय
एखाद्या मोहिमेचं गणित चुकलं
म्हणून त्याला अपयश कोणीही म्हणणार नाही
कारण चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठण्याचं धाडस
अजूनतरी दुसरं कुणीही केलेलं नाही
इतर कुणी काहीही बरळू देत
पण भारत मात्र तुमच्या कायम पाठीशी आहे
समस्त भारतीयांच्या वतीने के.शिवानांच्या पाठीवर
पंतप्रधान मोदींची थाप आहे
© PRATILIKHIT
No Comment