नियती…..पर्व दुसरे (भाग १९)

” काय मग….कशी झाली पिकनीक…” ऐश्वर्याने सकाळी सकाळीच बसच्या लाईन मध्ये उभ्या असलेल्या रश्मीला विचारलं.

” चांगली होती…तुमची….” रश्मीने एकदम फिक्या चेहऱ्याने विचारलं.

” आमची तर एकदम मस्त…निखिल आणि विराजसने सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली होती. त्यांचं प्लॅंनिंग इतकं मस्त असतं म्हणून सांगू….” आणि मग ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत ऐश्वर्याने रश्मीला त्याच्या ट्रीपचा इति वृत्तांत कथन केला. मध्येच हिमांशी सुद्धा त्यात सामील व्हायची.

” मस्त गं…सही झाली तुमची ट्रिप..आम्ही एवढे जण जातो ना की मॅनेजचं नाही होत सगळं…काही ना काही गडबड होतेच.. पहिल्या दोन्ही ट्रीपला पाहिजे तसं एन्जॉय करता आलंच नाही…”
” अच्छा…म्हणून आम्ही मोजकेच जण जातो. मस्त एन्जॉय करायला मिळतं….”
” चांगलंय..”
” हं… बरं..चल..मी आणि हिमांशी कॅन्टीनमध्ये जातोय..येतेय तू ??? ”
” नाही नको…मी आपल्या हॉस्टेलखालीच नाश्ता केला…तुम्ही या जाऊन…भेटूया LR मध्ये….”

” ठीक आहे…सिया…” एवढं बोलून ऐश्वर्या आणि हिमांशी खाली कॅन्टीन मध्ये गेल्या आणि रश्मी दुसऱ्या मजल्यावरच्या त्यांच्या क्लास मध्ये…

” अरे ही बघ आली….” रश्मीला आत शिरताना पाहून अक्षय जवळजवळ ओरडलाच.
” काय झालं…एवढ्या जोरात का ओरडलास…” रश्मीने एकदम चमकून विचारलं.
” काही नाही ग असच…आम्ही तुझ्याच विषयी बोलत होतो आणि तितक्यात तू आलीस ना..म्हणून…” मिथिला म्हणाली

” माझ्याविषयी…. अच्छा म्हणजे मी चर्चेचा विषय सुद्धा होऊ शकते तर…” रश्मी हसत म्हणाली.
” बॉस… तू आधीपासूनच चर्चेचा विषय आहेस आपल्या पूर्ण LG मध्ये….”
” असं काहीही नाहीये बरं….”
” कळेल तुला थोडेच दिवसात..”
” हं…आता जरा आपण कामाला लागायचं का…की दिवसभर टाईमपासच करत बसणार आहोत.

” या आल्या शाळेतल्या बाई…” अक्षय एकदम टर उडवत म्हणाला.

” whatever…” एवढं म्हणून रश्मी तिच्या जागेवर जाऊन बसली आणि तेवढ्यात बिना मॅम आल्याने सगळ्यांचीच पांगापांग झाली.

” त्या ऐश्वर्याच्या ग्रुपची ट्रिप मस्त झाली ग….” दुपारी गप्पा मारता मारता रश्मी मिथिलाला म्हणाली.
” म्हणजे…???”
” आज सकाळी की ऐश्वर्या आणि हिमांशी सोबत आले ना…तर त्या सांगत होत्या सगळं…”
” फेकत असतील…” मिथिलाने सहज म्हटलं.
” नाही ग…त्यांनी मला फोटो दाखवले सगळे. आपण कोवलमला जाऊन काहीच केलं नाही…आपण काय केलं..फक्त बीच आणि लाईटहाऊस… त्यांनी किती मस्त बोट रायडिंग वगैरे केलं..”
” तिथे बोट रायडिंगसुद्धा होतं…” मिथिलाने डोळे विस्फारून विचारलं.
” मग काय….हा आपला अक्षय नुसतंच काही माहिती न काढता प्लॅन करतो..”
” तो निदान करतो तरी प्लॅन…दुसरं कोण करतं तरी का….?”
” हो तेही आहेच म्हणा…पुढचा विकेंड कुठे जातोय आपण ??”
” काही माहीत नाही…बघू काय सांगतायेत सगळे. तुझा त्यांच्या बरोबर जायचा विचार चालू आहे की काय…”
” नाही ग…तसं काही नाही…”
” हं…बघू काय ठरवतात सगळे….”

रात्री त्यांच्या LG च्या व्हॅट्स अँप ग्रुपवर अशीच मस्ती चालू होती..ट्रेनिंग मधली सर्वात प्रसिद्ध मुलगी अशी टॅगलाईन नुकतीच त्याच्या CR ने रश्मीला दिली होती.. त्यावरूनच सगळ्यांचं चॅट चालू होतं… असंच चालू असताना रश्मीला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला..

‘ फक्त ILP मध्ये नाही तर मुंबई मध्ये प्रसिद्ध आहेस तू….’

तिने उत्सुकतेने DP पाहिला..विराजसचा मेसेज होता तो…

” तुला काय माहीत….??” तिने सरळसोट भाषेत त्याला विचारलं.

कारण असे मेसेज तिला नवीन नव्हते. दिसायला तशी ती नाकोडोळी नीटच होती. जिम करून तिने स्वतःच सौंदर्य व्यवस्थित जपलं होतं. तिच्याशी बोलण्यासाठी मुलं काही न काही कारण काढून मेसेज करायचीच.

” mutual friends खूप आहेत आपले…” विराजसने सुद्धा तिला तिच्याच शैलीत उत्तर दिलं.

” हो पण आपण फ्रेंड्स नाही आहोत ना …”

” मान्य….पण मैत्रीने केल्याने होते..जर आपण केलीच नाही तर मग या जगात एकटं राहू आपण…”

” अहो लेखक….शब्दांचे खेळ माझ्यासोबत नाही हा खेळायचे….”

सुरुवातीला झालेल्या ओळख परिषदेत आपल्याला साहित्याची आवड आहे आणि आपण मध्ये मध्ये काहीतरी लिहत असतो असं विराजसने आधीच सांगितलं असल्यामुळे एव्हाना सगळ्या LG ला ते माहीत झालं होतं.

” लेखक असल्याचा एवढा तरी फायदा असायलाच हवा ना.. ??” विराजसने हसण्याचा चेहरा पाठवत विचारलं.
” हो…म्हणून आधीच सांगितलं..की मला शब्दांत नाही पकडायचं…”
” बरं बाई…ठीक आहे…”
” हं….तसं छान लिहितोस तू….”
” आणि हे तुला न वाचताच कळलं…आश्चर्यच आहे..”

” का?? जर तुम्ही मुलं आमची माहिती ठेवू शकता तर आम्ही तुमची माहिती ठेवू शकत नाही का ??” रश्मीने मिश्कीलपणे हसत विचारलं.

” अच्छा…म्हणजे गुप्तहेरी चालू आहे वाटत…”

” ए… गुप्तहेरी वगैरे नाही…असंच कुतुहल वाटलं म्हणून तुझं फेसबुक पाहिलं होत. त्यातला एक लेख वाचला…छान वाटला म्हणून बोलले..”

” ओह…thank you thank you…म्हणजे मला अजून एक वाचक मिळाला तर…”

“तसं मी फार मराठी वाचत नाही….चांगलं वाटलं तर वाचेन…”

“बरं..ठीक आहे..चला आता झोपतो..भेटू उद्या…बाय…”

” बाय…”

रश्मीने मग त्याच फेसबुक उघडलं आणि त्याची आलेली मैत्रीची विनंती मान्य करून आणि त्याने लिहिलेल्या काही कविता वाचायला सुरुवात केली.

क्रमशः

6660cookie-checkनियती…..पर्व दुसरे (भाग १९)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories