Uncategorized
गुरुपौर्णिमा
आज आहे गुरुपौर्णिमा
म्हटलं यावर काही तरी लिहावं
ज्यांनी लिहायला वाचायला शिकावलं
त्यांना थोडंसं गौरवावं
तसा त्यांच्या समोर मी पामरच
त्यांची महानता मी काय वर्णावी
देवाचा दर्जा ज्यांना दिला जातो
त्यांची कीर्ती शब्दांत कशी मांडावी
प्रत्येकाच्या आयुष्यात
गुरुच एक अढळ स्थान असतं
कोणताही मोठेपणा स्वतःकडे न घेता
त्याने त्याचं कर्तव्य बजावलेलं असतं
तशी गुरुशिष्य परंपरा
आपण प्राचीन काळापासून जपतो
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा म्हणताना
आपल्याला आरुणी, एकलव्य आणि श्रीकृष्ण आठवतो
स्वकर्तुत्वाचा कितीही गाजावाजा केला
तरी मार्गदर्शनाची गरज भासते
कठीण प्रसंगात गोंधळ उडालेला असताना
गुरुची भूमिकाच महत्वाची ठरते
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
*गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा 🙏🏻*
No Comment