नियती…..(भाग १०)

ऑफिसमध्ये येताच तिने अविनाश आलाय का ते दुरून बघितलं. पण तो काही दिसला नाही. तिने डेस्क वर जाऊन बॅग ठेवली तेवढ्यात अविनाश आला.

” अवि….बाबांनी चक्क काहीही जास्ती न विचारता परमिशन दिली..”
” अरे वाह…पण काही विचारलं कसं नाही त्यांनी..??”
” अरे मी त्यांना सांगितलं ना…की शेगावला जायचंय…माझे बाबा तसे देवभोळे आहेत थोडे.. आणि मी त्यांना बाईकने जातोय हे नाही सांगितलं. ट्रेन ने जातोय असं सांगितलं.”
“अच्छा…पण रश्मी..तुला जमणार आहे का एवढ्या वेळ बाईकवर बसायला…कारण आम्हाला सगळ्यांना सवय आहे..आमच्या ग्रुप मध्ये आहेत तशा तीन मुली..पण त्यांना सुद्धा सवय आहे..तू कधी केला नाहीस ना एवढा प्रवास…”
” त्यात काय नाय रे…जमेल मला…एवढं काय त्यात….”
” बरं…ठीक आहे..शुक्रवारी पहाटे निघायचं आहे..तुझे बाबा सोडायला नाही येणार ना..नाहीतर ते तुला रेल्वे स्टेशन वर सोडायला यायचे….” अविनाश हसतच म्हणाला..
” तू उगाच नरपती लावू नकोस..त्यांना सांगेन मी ऑटो ने जाईन अस…”
” हं.. कॉफी ???”
” हो…चल… त्या शिवाय ऑफिस सुरू नाही होत माझं…”

त्या दिवशी रश्मी आणि अविनाशला फार काही काम नव्हतं. मागचा इव्हेंट यशस्वी झाल्यामुळे राजने त्यांना हा आठवडा कामातून सुट्टी दिली. त्यामुळे ते दोघे शेगावंच प्लॅंनिंग करण्यात व्यस्त होते. त्यांनी शेगावला गेल्यावर कोणत्या हॉटेल ला थांबायचं, कुठे कुठे फिरायचं हे सगळं ठरवून ठेवलं. कुठे जायचं म्हटलं की रश्मी नेहमीच उत्साहात असायची. शाळेची एक सुद्धा पिकनिक तिने सोडली नव्हती. तशी तिला घरून थोडी बंधनं असायची पण ती काही ना काही कारण सांगून तिची फिरायची हौस पूर्ण करून घ्यायची. आता सुद्धा कधी एकदा शेगावला जातो असं तिला झालं होतं. त्यातसुद्धा बाईकने जायचं म्हणून ती विशेष आनंदात होती.

जायच्या दोन दिवस आधीच रश्मीने पॅकिंग सुरू केली. पण पॅकिंग करताना सॅक फार जड होणार नाही याची काळजी तिने घेतली. शेगावला थोडं आध्यत्मिक वातावरण असल्याने तिने एक पंजाबी ड्रेस सुद्धा बरोबर घेतला. बाकी नेहमी लागणाऱ्या छोट्यामोठ्या गोष्टी तिने आठवणीने बॅगेत ठेवून दिल्या..सगळं आवरून ती झोपणार इतक्यात अविनाशचा फोन आला. आणि मग बोलता बोलता रात्रीचे दोन कधी वाजले त्यांना कळलंही नाही. झोपताना अविनाशने रश्मीला त्यांच्या व्हॅट्स अप ग्रुप मध्ये ऍड केलं. जायच्या आधी जे काही ठरेल ते तिलासुद्धा समजावं म्हणून..

त्यादिवशी रश्मी लवकरच जेवून झोपली.. झोपली म्हणजे नुसती बिछान्यावर पडून होती. कुठे जायच असलं तर आपल्याला कधी झोप येते का ?? एवढी एक्ससाईटमेंट असते की झोप पार उडून जाते..तिने अविनाशचं लास्ट सिन चेक केलं..थोड्या वेळापूर्वीचचं होतं.

” hi… झोपलास का ??? ” तिने अविला मेसेज टाकला आणि मग सकाळपासुन अनरीड असलेले मेसेज उघडून नुसती स्क्रोल करू लागली. ते मेसेज वाचायची खरं तर तिची इच्छा सुद्धा नव्हती.पण अविचा रिप्लाय येईपर्यंत काहीतरी टाईमपास असा विचार करून ती ग्रुप मधले मेसेज वाचत होती.

साधारण पंधरा मिनिटांनी अविचा रिप्लाय आला..

” hey.. बॅग भरत होतो..म्हणजे सकाळी घाई नको व्हायला…नाहीतर माझं नेहमी काही न काही तरी राहून जातं…तुझी झाली भरून…”
” हो मग..मी कालच भरून ठेवली..”
” वाह..जास्तीच फास्ट आहेस तू…”
” कुठे फिरायला जायचं असलं की मला जरा जास्तीच एक्ससाईटमेंट असते..”
” हो..कळलं ते..😅😅 मला वाटलं तू झोपली असशील…”
” विचार तोच होता..पण झोपच येत नाहीये…”
” का बरं…??🤔”
” नेहमीचंच आहे ते..कुठे जायचं असलं ना की मग माझ्या मनात सारखे तेच विचार येत असतात..अजिबात झोप येत नाही…”
” 😂😂😂😂 लहान मुलांना होतं असं…” अविनाश मुद्दाम रश्मीला चिडवण्यासाठी म्हणाला.
” असू दे हा…😏”
” हाहा..जस्ट किडींग….”
” बरं… पण तुला झोपावं लागेल आता.कारण तुला बाईक चालवायची आहे दिवसभर…”
” हो..पण मला बाईक चालवताना झोप नाही येत ग..आपण चिंता करू नये..आपल्याला सुखरूप घरी परत पार्सल केलं जाईल…”
अविनाशचा हा मेसेज बघून रश्मीला हसायलाच आलं.
” हो..ते माहितीये मला.पण तरी सुद्धा.. आराम कर तू..आणि तसही तुझं झोपायचं टाईम झालंच आहे..😊”
” हो ते ही आहेच म्हणा…”
” हो ना..मग झोपा राजे…भेटू उद्या ..😊”
” जो हुकूम मेरे आका…चलो गुड नाईट…टेक केअर..🤗😇”
” गुड नाईट.😇”

अवि ऑफलाईन गेल्यावर तिने सुद्धा मोबाईल चार्जिंगला लावला आणि थोड्यावेळाने निद्रादेवी तिच्यावर मेहेरबान झाली.

क्रमशः

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5780cookie-checkनियती…..(भाग १०)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories