​नियती……(भाग ४)

” अविनाश…..राज सरांनी मेल पाठवलंय बघ….”

” अच्छा….बघतो थांब…आणि हो…राज सर नाही….राज….म्हणाला ना तो…कॉल मी राज…” अविनाश नकळत राजची नक्कल करत म्हणाला.

” अरे वाह…नक्कल चांगली करतोस तू….”

” हो मग…कॉलेज मध्ये असताना एकांकिका करायचो मी…”

” ओहहह….मग इथे का आलास…. त्याच क्षेत्रात पुढे जायचंस ना….”

” अहो मॅडम….passion वेगळी आणि profession वेगळं…आणि इथे सुद्धा माझ्या आवडीचंच काम करतोय ना मी…इव्हेंट्स manage करायला खूप आवडतं मला….”

” मला सुद्धा….म्हणजे सुरुवातीला मी फक्त अटेंड करायचे… घरून रोज उपडाऊन करावं लागायचं ना…पण मग नंतर सेकंड इयर पासून हॉस्टेल वर राहायला लागले…मग कमिटी मध्ये काम केलं…तेव्हापासून हे काम आवडायला लागलं..आणि मग घरच्यांनीसुद्धा सपोर्ट केलं म्हणून मग याच profession मध्ये आले…”

” चांगलंय…चांगलंय..म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुला सांगाव्या लागणार नाही….” अविनाश हसतच म्हणाला.

” Excuse me… मला सुद्धा बऱ्यापैकी जमतं बरं का…म्हणजे तुझ्या इतके मोठे इव्हेंट्स नसतील केले मी पण जितके केलेत सगळे यशस्वी केलेत..” रश्मी थोड्या तोऱ्यातंच म्हणाली..

” हाहा…निदान या बाबतीत तरी चांगलं जमेल आपलं…भांडण नाही होणार…” अविनाश मिश्कीलपणे म्हणाला.

 ” अरे…तू अजूनसुद्धा तेच घेऊन बसलायस का…विसर ते…थोडी frustrated होते म्हणून झालं ते…”

” कळेलच ते हळू हळू…”

” हो कळेल….ए…. तू एकांकिका केल्यात म्हणजे बरीच पुस्तकं वगैरे वाचली असतील ना….”

” हो….वाचायला सुद्धा आवडतं मला….तशी बरीच पुस्तकं वाचलीयेत मी लहानपणापासून…शाळेत असताना तर अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये गोष्टीची पुस्तकं ठेवून वाचायचो मी… एकदा परीक्षा असताना असं करत होतो आणि आईने पकडलं…असं धोपटून काढलं ना…की विचारू नकोस….तुला आहे का आवड वाचनाची…”

” मी…आणि वाचन….दूर दूर पर्यंत संबंध नाही….” रश्मी हसतच म्हणाली… ” मी असं पुस्तक वगैरे वाचायला घेतलं की झोपच येते मला…त्यामुळे मी वाचतच नाही…पअन दुसऱ्याने एखाद पुस्तकं वाचलं आणि त्याने स्टोरी सांगितली तर ती ऐकायला आवडते मला…”

” चला….म्हणजे माझी बडबड ऐकायला आहे कोण तरी….”

” हो नक्कीच….मला आवडेल तू वाचलेल्या बुक्स च्या stories ऐकायला..”
” बरं… आता जरा काम करूया का आपण….नाही तर पहिल्याच दिवशी बॉसच बोलणं ऐकावं लागेल…”

” हो…करूया करूया…” असं म्हणून रश्मीने मेल ओपन केला..

” अवि…. सॉरी…अविनाश…अरे या कंपनीचा इव्हेंट मी केला आहे या आधी..”

“ओह….ग्रेट….म्हणजे त्यांच्या expectations माहिती असतील ना तुला…”

” हो…मी माझ्या आधीच्या इव्हेंट्स च्या डिटेल्स मेल करायला सांगते सुरभिला…आपल्याला मदत होईल त्या रेकॉर्ड्स ची…”

 ” कूल….चल आता कॉफी पिऊन येऊ आणि मगच कामाला सुरुवात करू…”

” हो चालेल चल…”

” रश्मी….” बोलता बोलता अविनाश अचानक थांबला..

” हा….काय झालं….”

” तू अविचं बोल…चालेल मला..”

” बरं…” रश्मीने एकदा हसून अविनाशकडे पाहिलं आणि ती क्युबिकलबाहेर पडली…
क्रमशः
– प्रतिक प्रवीण म्हात्रे

5460cookie-check​नियती……(भाग ४)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories