नियती…..( भाग ३)

तो आला आणि लगेचच राजने त्या दोघांना त्याच्या कॅबिन मध्ये बोलावलं…तो केबिन मध्ये गेला तेव्हा ती आधीच येऊन बसली होती.

” May I come in sir ??”

” yes..please come.. आणि हा..हे असं सर वगैरे नको बोलूस.एकदम पन्नास वर्षाचा झाल्यासारखं वाटतं… call me राज…इथे आपण सगळे एकाच वयाचे आहोत त्यामुळे नावाने हाक मारली तर मग नंतर फॉर्मलिटी ची गरज पडत नाही..”

” हो…बरोबर आहे….” ‘राज..’ एक मोठा श्वास घेऊन त्याने नाव दोनदा तीनदा तोंडात घोळवलं..
” बरं….आधी तुमची ओळख करून देतो..” राजच्या तोंडून हे ऐकताच नकळतपणे तिचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे एकवटलं.. जणू काही बऱ्याच दिवसांपासून अनुत्तरित असलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला आज मिळणार होतं.. 

” अविनाश…. ही रश्मी…. ही सुद्धा आजपासूनच जॉईन झाली आहे….आणि तुमच्या दोघांचंही डोमेन same आहे सो मला वाटतं की तुम्ही दोघांनी एकत्र काम करावं…त्यामुळे काय होईल की काही doubt असला तर तुम्ही दोघे मिळून तो सोडवू शकतात कारण तुम्हा दोघांनाही या कामाचा अनुभव आहे..सो तुम्ही एक टीम म्हणून काम करा..अर्थात तुम्ही दोघे तयार असाल तर…”

” चालेल राज…” रश्मी एकदम उत्साहात म्हणाली पण दुसऱ्याच क्षणी तीने स्वतःला सावरलं..

” म्हणजे मला मॅनेजमेंट करायला आवडतं.. आधीच्या कंपनी मध्ये सुद्धा मी इव्हेंट मॅनेज करायचे…म्हणून म्हणाले चालेल..”

” अच्छा…आणि अविनाश खूप चांगला आणि experienced इव्हेंट मॅनेजर आहे..मी त्याने मॅनेज केलेल्या इव्हेंट्स बद्दल ऐकलंय…खूप छान असतं त्याच मॅनेजमेंट…तुम्ही दोघं एकत्र आलात आणि पहिला इव्हेंट successful करून दाखवला तर आपल्याला खूप ऑफर्स येऊ शकतात..”
” मलाही एकत्र काम करायला काही प्रॉब्लेम नाहीये…उलट इव्हेंट मॅनेजमेंट मधलंच कोणतरी टीममेट आहे या पेक्षा चांगली गोष्ट ती कोणती….”

” मस्तच… कालच माझ्याकडे एका इव्हेंट चे डिटेल्स आलेत..मी तुम्हा दोघांनाही फॉरवर्ड करतो..रामसिंग तुम्हाला तुमचं क्यूबिकल दाखवेल..आणि तुमच्या सिस्टिमचा id आणि पासवर्ड सुद्धा सांगेल..लागा कामाला… wish you all the very best.. आणि काहीही अडचण आली तर बिनधास्त मला येऊन सांगा…”

” yeah sure… thanks राज..” अविनाश खुर्चीवरून उठत म्हणाला आणि त्याने रश्मीकडे पाहिलं..तशी रश्मी सुद्धा उठली आणि राजला थँक्स म्हणून केबिनबाहेर पडली..
‘अविनाश……’ राजच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर त्यांच्या क्युबिकलमध्ये जाईपर्यंत रश्मीच्या ओठांवर फक्त त्याचंच नाव होतं..जणूकाही त्या नावाशी तिचं काहीतरी नातं होतं.. एक attachment होती..ती त्याच्याबद्दल एवढा विचार का करत होती तिचं तिलाही समजत नव्हतं..क्युबिकल मध्ये जाऊन बसले तरी सुद्धा त्याच्याशी काय बोलावं तिला कळत नव्हतं..बराच वेळ झाला तरी सुद्धा दोघं एकमेकांशी काही बोलत नव्हते…शेवटी तिलाच ती शांतता असह्य झाली आणि तिने अविनाशला विचारलं..

” तू फक्त समोरच्याशी भांडायचं असेल तेव्हाच बोलतोस का?? ”

रश्मीच्या बोलण्यावर अविनाश एकदम हसायला लागला..

” हसायला काय झालं?? ”

” अग काही नाही…मी वाट बघत होतो की तू स्वतःहून कधी बोलतेय…”

” का….तू कधी समोरच्याशी स्वतःहून बोलत नाहीस का??? एवढा इगो…”

” ए प्लीज… इगो वगैरे काही नाही… तसा मी खूप फ्रेंडली आहे…मला फक्त समोरच्याशी ऍडजस्ट व्ह्यायला जरा वेळ लागतो..आणि त्यात काल आपण फक्त भांडलो आहोत…काल मी तुला लिफ्ट दिली पण तेव्हा सुद्धा तू फार काही बोलली नाहीस..मग म्हंटल की हिलाच स्वतःहून बोलू दे…”

” अच्छा…म्हणजे तू मी बोलायची वाट पाहत होतास..पहिल्यांदाच असा मुलगा बघतेय जो मुलगी स्वतःहून बोलायची वाट बघतोय…”

” हाहा…चक इट… काल तुला नाव विचारायला सुद्धा विसरलो… पाऊस होता सो मला सुचलच नाही काही..”

” हम्म….असो….आता आपण एकाच प्रोजेक्ट वर आहोत तर  बोलणं होतच राहील…”
क्रमशः
– प्रतिक प्रवीण म्हात्रे

5430cookie-checkनियती…..( भाग ३)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

3 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories