
The Vaccine War Review
The Vaccine War Trailer Review
The Vaccine War Review | Movie Review in Marathi

जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत होतं, Covid -19 विषाणूवर Vaccine बनवण्यासाठी झगडत होतं तेव्हा जगातल्या कोणत्याही देशाने कल्पना केली नसेल असं कार्य भारताच्या शास्त्रज्ञांनी करून कोरोना विषाणूवर Covaxin Vaccine बनवून जगाला तोंडात बोटचं नाही तर अख्खाच्या अख्खा हात घालायला भाग पाडलं होतं. भारत vaccine बनवतोय ह्याची बातमी जगातल्या महासत्ता असलेल्या देशांना पोहोचताच त्यांनी त्यांचं vaccine कसं सर्वश्रेष्ठ आहे याची दवंडी जगभरात पिटायला सुरुवात केली, भारतीय बनावटीच्या Vaccine चं बरंच राजकारण करण्यात आलं पण ह्या सगळ्यावर मात करत भारताने सगळ्यांच्या नाकावर टिच्चून भारतीय Vaccine बाजारात आणलं आणि फक्त भरतीयांचाच नाही तर जगभरातील असंख्य लोकांचे प्राण वाचवले. हनुमंताप्रमाणे Vaccine ची संजीवनी घेऊन भारतीय विमानांनी जगभरात उड्डाण केली आणि भारत पुन्हा एकदा विश्वगुरु ठरला.
ह्याच भारतीय बनावटीच्या Covaxin ची गोष्ट घेऊन येतोय ‘The Vaccine War’ हा चित्रपट.
The Kashmir Files ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ह्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिषेक अगरवाल, पल्लवी जोशी चित्रपटाच्या प्रोड्युसर आहेत शिवाय पल्लवी जोशी ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांच्याशिवाय नाना पाटेकर, अनुपम खेर आणि सप्तमी गोवडा यांची यात मुख्य भूमिका आहे.
28 सप्टेंबर 2023 रोजी हा चित्रपट आपल्या भेटीसाठी येत आहे.
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/
No Comment