Necessary Changes To Make Indian Education System Better

Necessary Changes To Make Indian Education System Better

आपल्या फार पूर्वीपासून चालत आलेल्या शिक्षण पध्दतीमध्ये बदल व्हावा असं सर्वच म्हणतात पण काय बदल हवे हे कुणी बोलताना दिसत नाही. अनुभवातून आणि समोर दिसणाऱ्या घटनांमधून काही गोष्टी मला जाणवल्या त्याच आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.

आपल्या देशातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात कमी काय असतं तर तो असतो प्रत्यक्ष व्यवहारातील अनुभव. म्हणजे आजही आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रॅक्टिकल गोष्टींपेक्षा थिअरीवर जास्त लक्ष दिलं जातं कारण घोकंपट्टी केली तरच गुण मिळतात ना. यात विद्यार्थ्यांचा काहीच दोष नाही कारण शाळेत असताना घोकंपट्टी करून जास्तीत जास्त गुण मिळवायचे हेच त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. जास्त गुण मिळालेला विद्यार्थी हुशार आणि कमी गुण मिळालेला विद्यार्थी ढ असा शेरा अगदी सहज लावला जातो.

वास्तविक पाहता शाळेमध्ये शिकवले जाणारे विषय हे विद्यार्थ्यांच्या मनात एखाद्या गोष्टीचं कुतूहल, एखाद्या गोष्टीची आवड निर्माण करून त्या क्षेत्रात त्याचं करिअर बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. पण ते विषय आता केवळ नावपूरतेच राहिल्यामुळे त्यांचं महत्वच विद्यार्थ्यांना कळत नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनाचा विचार करता शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. पण आपल्याकडे मात्र शारीरिक शिक्षण हा विषय अजूनही गणिताच्या शिक्षकांसाठी असलेला जास्तीचा तास मानला जातो. पर्यावरण हा तितकाच महत्वाचा विषय असूनही फक्त जास्त गुण मिळवण्याचा विषय म्हणून त्याकडे पाहिलं जातं. व्यक्तिमत्व विकास हा विषय फक्त स्वाध्याय वहीपुरताच मर्यादित असतो. ह्यांसारखे अनेक विषय जे खरं तर प्रॅक्टिकली शिकवायला हवेत ते थिअरीमध्ये शिकवले जातात.

सध्याचा विचार करता पर्यावरण ह्या विषयाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या निसर्गाबद्दलची ओढ निर्माण करायला हवी. त्याचा सांभाळ करणं, त्याला जपणं हे आपली नैतिक जबाबदारी आहे विद्यार्थ्यांच्या मनात शालेय जीवनातच बिंबवायला हवं. थिअरी सोबतच विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन झाडे लावा उपक्रम, बीच क्लीन ड्राईव्ह यांसारखे उपक्रम राबवायला हवेत. तरच विद्यार्थ्यांना त्याचं महत्व पटेल. शारीरिक शिक्षणामध्ये बाकी कोणत्या विषयाचा तास न घेता, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पूर्णपणे मोकळं न सोडता त्यांना व्यायामचं महत्व पटवून देऊन, त्यांना खेळाचं महत्व पटवून देऊन क्रीडा क्षेत्रात असलेल्या विविध करिअरच्या संधीबद्दल जर मार्गदर्शन केलं तर भारताला ऑलिम्पिक मध्ये मिळत असलेल्या पदकांची संख्या का बरं वाढणार नाही.

एकदा शाळा पार पडली की कॉलेज मध्येही विद्यार्थी थिअरीमध्येच अडकून पडतात आणि मग कॉलेज संपवून नोकरीसाठी बाहेर पडल्यावर गाठीशी काहीच अनुभव नसल्याने सध्याच्या स्पर्धेच्या युगात त्यांचा निभाव लागणं कठीण होऊन बसतं. त्यासाठी ज्या क्षेत्रात ते विद्यार्थी आहेत त्या क्षेत्रातच कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्येच एक दोन महिन्यासाठी इंप्लान्ट ट्रेनिंग, इंटर्नशिपवगैरे सारख्या गोष्टी समाविष्ट करायला हव्यात. जेणेकरून आपण जे काही शिकतोय त्याचा खऱ्या आयुष्यात, औद्योगिक क्षेत्रात कसा आणि काय उपयोग होतो हे त्यांना समजेल आणि त्याचा त्यांना पुढे जाऊन नक्कीच फायदा होईल.

आता तो काळ राहिला नाही जेव्हा विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर, इंजिनिअर, कॉमर्स, सायन्स आणि आयटीआय एवढेच पर्याय होते. आता करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांना त्याबाबत नीटसं मार्गदर्शन केलं जातं नाही त्यामुळे त्यांना त्याबाबत फार काही माहीत नसतं. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांना योग्य वयात योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांसोबतच देशालासुद्धा होईल.

©प्रतिलिखित

31662cookie-checkNecessary Changes To Make Indian Education System Better

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories