
Uncategorized
Mothers Day
मिटले डोळे किलकिले करत उघडल्यावर
पहिल्यांदा तीच डोळ्यांसमोर असते
बाप नावाच्या वृक्षाच्या सावलीत पिलांना
वाढवणारी ती आईच असते
महिन्यांची संख्या जरी वेगळी असली
तरी जबाबदारी मात्र तीच असते
प्रसवकळांनंतरही समाधानाने
हसणारी ती आईच असते
जन्म देऊन विसरत नाही ती कर्तव्य
कायम कुटुंबासाठीच झटत असते
पिल्लासाठी कोणत्याही संकटासमोर खंबीरपणे
उभी राहणारी ती आईच असते
रूप कोणतंही असलं तिचं
तरी माया मात्र सारखीच असते
आपल्या पिल्लाला अडचणीत पाहून
तळमळणारी ती आईच असते
@प्रतिलिखित
No Comment