
Uncategorized
जगण्यात मौज आहे…
जगण्यात मौज आहे
फक्त जगता यायला हवं
दुनियादारी बाजूला सारून
स्वतःमध्ये गुंतायला हवं
आयुष्य आपले असूनही
मने सांभाळतो दुसऱ्यांची
त्यांचा साधला जातो स्वार्थ
अन फरफट आपल्या आयुष्याची
आजूबाजूचे लोक नेहमी
चांगल्यालाही ठेवतात नावे
करत राहावे कार्य आपुले
आणि त्यांच्याच वरचढ व्हावे
कधीतरी पडावे यातून बाहेर
अन दूर सारव्या चिंता
स्वतः साठी जगण्याचा
गिरवावा वरचेवर कित्ता
No Comment