
Uncategorized
मैत्री
मैत्रीत नसे गरजेचे
रोजचे ते बोलणे
जुन्या नात्यास आपुल्या
मापात अंतराच्या तोलणे
आयुष्य भिन्न आपुले
अन वेगळ्या जबाबदाऱ्या
परी अढळ स्थान तुझे
माझ्या जीवनात साऱ्या
येता आठवण तुझी
ओढ भेटीची लागे
फेसबुकवरील पोस्ट
खबरबात तुझी सांगे
ओढण्या गाडा आयुष्याचा
जाहलो दिनक्रमात व्यस्त
परी तुटले नाही नाते
अन राहिली मैत्री तटस्थ
कधी येऊनि अंतर
टिकते तीच मैत्री
खताशिवाय संवादाच्या
जगते तीच मैत्री
© PRATILIKHIT
No Comment