
Uncategorized
किनारा
वाटे कधीतरी एकटे
कुणी नसे सोबती
रमेना मन कशातच
अन बोलू लागतात भिंती
का गरज पडे कुणाची
मन हलके करावे वाटे
आपुलेच असते गुलाब
अन आपुलेच असतात काटे
पडतात असंख्य गोष्टी दृष्टीस
अन संयम सुटत जातो
विचारांचा भुंगा मग
मन पोखरत जातो
मनातल्या त्या वादळाला
हवाच असतो किनारा
नैराश्याच्या त्या भावनांनी
झाकोळतो आसमंत सारा
© PRATILIKHIT
No Comment