
Uncategorized
शिक्षक दिन
वर्षातल्या ह्या एका दिवसाची
आम्ही आतुरतेने वाट पाहायचो
आपल्यालाच शिक्षक बनायचं आहे
म्हणून खूप खुश असायचो
आवडत्या शिक्षकाची नक्कल करून
आम्ही विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायचो
कधीतरी स्वतःच्याच वर्गात जाऊन
क्रशवर इम्प्रेशनही मारायचो
काही जण ऐकून घ्यायची
काही सरळ फाट्यावर मारायची
आपलाच मित्र शिक्षक झालाय पाहून
उगाच बाकीच्यांसमोर शायनिंग मारायची
ह्या निमित्ताने का होईना
शिक्षकांना होणारा त्रास जाणवायचा
पण पुन्हा विद्यार्थी झाल्यावर
ह्या गोष्टीचा विसर पडायचा
आजही शिक्षकदिन नाव ऐकलं
की सर्व दृश्य समोर उभं राहतं
वास्तविकतेचा विसर पडून
पुन्हा मन शाळेकडे धाव घेतं
© PRATILIKHIT
👌👌🌹
Thank you