Uncategorized
जातील, हेही दिवस जातील
जातील, हेही दिवस जातीलकोरोनामुळे ओस पडलेले रस्ते
लोकांच्या गर्दीने पुन्हा गजबजतील
घरी बसून आळसावलेली झालेली माणसे
रुटीन पुन्हा सुरू करतील
जातील, हेही दिवस जातीलबरेच महिने दुरावलेली मित्रमंडळी
लॉकडाउननंतर पुन्हा भेटतील
महासंकटाचा विसर पडून
पुन्हा गप्पांचे फड रंगतील
जातील, हेही दिवस जातीलएकदा चपराक बसल्याने माणसे
स्वतःबरोबर निसर्गाचीही काळजी घेतील
गरज आणि चैन यातला फरक कळल्याने
वायफळ खर्चही कमी करतील
जातील, हेही दिवस जातीलपुन्हा एकदा सोशल मीडियावर
मेक इन इंडिया चे कॅप्शन सजतील
स्वदेशीचा नारा लावून
कदाचित भारतीय आत्मनिर्भरही बनतील
जातील, हेही दिवस जातील© PRATILIKHIT
No Comment