Uncategorized
बहावा
आगमन होता ग्रीष्माचे
लागे फुलू हा बहावा
उधळण होते हळदीची
रस्ता न्हाऊन निघावा
तप्त झालेल्या भूमीवर
जणू शालू पांघरावा
स्वागत करण्या वर्षाचे
पिवळा पितांबर नेसावा
लागती घड सोनियाचे
त्यात झळाळे बहावा
गर्द छायेखाली याच्या
वाटे मायेचा विसावा
निसर्गाचा चमत्कार
डोळे भरून पाहावा
चाहूल देण्या पर्जन्याची
सुंदर फुले हा बहावा
©PRATILIKHIT
No Comment