Uncategorized
आरे
वितळत चालले हिमनग
निसर्गानेही दिली आहे वॉर्निंग
आम्ही मात्र करणार वृक्षतोड
असेना मग ग्लोबल वॉर्मिंग
झालाय ओझोनचा थर विरळ
जंगलं आगीच्या भक्ष्यस्थानी पडतायेत
स्वतःपुरता विचार करून माणसे
उरलेली जंगलेसुद्धा तोडतायेत
लहानपणी ऐकलं होतं आम्ही
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
पण पार पायदळी तुडवली आम्ही
पहिले खारफुटी आणि आता आरे
विस्ताराला विरोध नाही पण
वृक्षतोडीला नक्कीच आहे
निसर्गाच्या उरावर पाय देऊन केलेली सुधारणा
कुणालाच नको आहे
© PRATILIKHIT
No Comment