Uncategorized
सोशल मीडियाची जादू
काय जादू म्हणावी या सोशल मीडियाची
इथे जणू अप्सरांचा दरबारचं भरतो
ज्यांना कधी प्रत्यक्षात पाहिलंही नाही
त्यांच्यात जीव पार गुरफटून जातो
सुरू होतं द्वंद्व मग
आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी
केल्या जातात लाईक्स आणि कंमेंट्स
त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी
कधीतरी मग घेतली जाते दखल
आणि आमच्या हाती जणू स्वर्गच लागतो
सर्व कामधंदे सोडून
आम्ही रिप्लाय ची वाट पाहत बसतो
थोडीफार उपेक्षा झाली
की मग उगाच आमचा स्वाभिमान जागा होतो
त्यांना बराच वेळ ऑनलाइन बघून
पुन्हा यातनेचा डोंगर कोसळतो
आता मेसेज वगैरे काही नाही
आम्हीही मग मनाशी ठरवतो
पण उशिरा का होईना समोरून रिप्लाय आलेला पाहून
आमचा पुन्हा एकदा विश्वामित्र होतो
© PRATILIKHIT
No Comment