नियती…पर्व दुसरे… (भाग १८)

रश्मीच्या ग्रुपची आठवड्याची सुरुवात झाली तीच मुळी पुढच्या पिकनिकच्या प्लॅंनिंगने. पुढचा शनिवार रविवार सुट्टी असल्याचं त्यांच्या लीडने त्यांना आधीच सांगून टाकलं. मग अक्षय का कोणासाठी थांबणार आहे…त्यांनी सगळ्यांना विचारून पुढल्या आठवड्यात कायकिंग आणि पोवर बीचला जायचा प्लान केला. गेल्याच आठवड्यात बीचवर गेलो आता परत काय बीचवर जायचं….सगळ्यांनी पहिल्यांदा जरा नापसंतीच दर्शवली. पण आधी जवळ जवळ फिरून घेऊ नंतर मस्त लांबच्या ट्रिप शुक्रवारी रात्री निघून करू अशी अक्षयने सगळ्यांची समजूत काढल्याने सगळेजण तयार झाले. अक्षयने विराजसच्या ग्रुपला मात्र याबाबत अजिबात सांगितलं नाही. आपल्या बरोबर नाही येत मग कशाला यांना उगाच भाव देऊन विचारायचं…असा विचार त्याने बहुदा केला असावा. रश्मीने मी विचारले असं म्हटलं तर त्याने तिलाच दम भरला. मग तीनेसुद्धा ते फार ताणून धरलं नाही.

इकडे विराजसच्या ग्रुपने या विकेंडला कोवलम बीचला जायचं ठरवलं. त्यांनी सुद्धा मागच्या वेळेसारखं ग्रुप मधल्या कोणाला विचारलं नाही. जेवढे जण कमी तेवढं मॅनेज करायला चांगलं असं निखिलचं मत असल्याने ते मोजकेच जण जायचे आणि खूप मज्जा करून यायचे. आणि रश्मीच्या ग्रुपचं व्हायचं असं की विराजसचा ग्रुप सोडला तर बॅचमधले जवळपास सगळेच जण असायचे त्यामुळे त्यांना कुठेही जायला किंवा निघायला उशीरच व्हायचा. अक्षयची तर प्रचंड चिडचिड व्हायची. त्याला एक तर सकाळी लवकर उठायची सवय त्यामुळे बाकी सगळे उठे पर्यंत त्याच्या निदान दोन तीन तरी सिगारेट मारून व्हायच्या.

हॉस्टेल वर राहत असल्याने त्यांचं सोमवार ते शुक्रवार हे रुटीन ठरलेलंच होतं. कधी तरी ते ऑफिस सुटल्यावर कोणत्या तरी कॅफेमध्ये किंवा मॉलमध्ये जाऊन बसायचे. आणि मग केरळला आल्यापासून दुसऱ्याच आठवड्यात रश्मीचं अविनाशशी बोलणं कमी झालं. अर्थात ती काही मुद्दाम करायची अशातला भाग नाही पण घरट्यापासून लांब गेलेल्या पिल्लाला दुसरी सोबत ही शोधावीच लागते..आणि अविनाशलासुद्धा ते माहीत होतं. त्यामुळे त्यानेसुद्धा या गोष्टीचा कधी विचार केला नाही किंवा तिला कधी तसं बोलूनही दाखवलं नाही. मध्येच एक दोन दिवसातून त्यांच बोलणं व्हायचं. कदाचित अविनाशच्या जागी रश्मी असती तर तिने वेळ देत नाही म्हणून अविनाशशी भांडण सुद्धा केलं असतं. पण तो मात्र सगळं समजुतीने घेत होता.

रात्री उशिरा आल्याने सकाळचे दहा वाजले तरी अविनाश उठला नव्हता. त्याच्या आईने येऊन पाहिलं तर अविनाशला अजून झोपलेलं पाहून तिला आश्चर्यचं वाटलं. तिने त्याच्या कपाळाला हात लावून पहिला तर तिला चटकाचं बसला.

” अवि…ए अवि…” तिने अविनाशला बळेच उठवलं.

” हा…काय झालं काय….कधी आलास रात्री….बघ किती ताप भरलाय तुला.. काल परत पावसात भिजला असशील…किती वेळा सांगितलं….”
“आई…..अगं कुठे आहे ताप…थोडीशी कणकण आहे पण आराम केला की ती सुद्धा कमी होईल.”
” तू कधी माझं काही ऐकलं आहेस का जे आता ऐकणार… झोप मग शांतपणे..आज कुठेही बाहेर जायचं नाही आहेस…”

” हो….” असं म्हणून अविनाश पुन्हा पांघरुण घेऊन झोपी गेला.

इथे अक्षय आणि त्याचा ग्रुप शनिवारी ठरल्याप्रमाणे पोवरला जायला निघाले. अक्षयने यावेळी सगळ्यांच्या फ्लॅटवर जाऊन त्यांना सकाळी जबरदस्तीने उठवून तयार केलं होतं. इतकंच नाही तर त्याने रश्मीला सतरा वेळा फोन करून इतकं भंडावून सोडलं की शेवटी रश्मीने सुद्धा सगळ्यांना लवकर उठवलं. निघाले खरे सगळे लवकर पण रस्त्यातच त्यांची बस पंक्चर झाली..

” अंकल.. क्या हुआ…” अक्षयने खाली उतरून सिगारेट पेटवत विचारलं.

“पंक्चर हुआ है… सबको उतारनेको बोलो…दस मिनिट मैं हो जायेगी…” ड्रायव्हर ने केरळी टोन च्या मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये म्हटलं.

‘ आईच्या गावात….’ अक्षय वैतागून म्हणाला आणि तसाच बस मध्ये चढला.

” सुजित….बाहेर या सगळ्यांनी…पंक्चर झालीये बस…”
” क्या क्या क्या….” त्या बस मध्ये असलेल्या अमराठी मुलांनी एकाच सुरात विचारलं.

” अरे वो बस के टायर मैं कूछ तो गया हैं…सबको उतारनेको बोला ड्रायव्हर…चलो जलदी उतरो….नही तो पोहोचनेमे लेट हो जायेगा..”
असं म्हणून त्याने जवळपास सर्वानाच घाईघाईने बसच्या बाहेर काढलं.

सुदैवाने बस ज्या ठिकाणी पंक्चर झाली होती त्याच्या बाजूलाच चहाची टपरी होती. आणि आजूबाजूला निसर्ग सुद्धा तसा चांगला होता. फोटो काढायला चांगलं लोकेशन मिळालं म्हणून मुलींनी लगेच ओठांचा चंबू करायला सुरुवात केली.

“च्या आयला…या पोऱ्यांना काय काम नाही काय दुसरी…कुठे पण काय फोटो काढायला चालू होतात…”
” मग काय त्यांनी तुझ्या बरोबर सिगारेट आणि चहा प्यायला यायचं का.. ” रश्मीने थेट प्रश्न केला.
” तसं नाही गं… पण…”
” काय पण काय ??” रश्मीने आक्रमक पवित्रा घेत विचारलं.
” नाही काही नाही..जाऊदे…” रश्मीला तसं बघून अक्षयने सरळ माघार घेतली आणि मिथिलासकट सगळे हसायला लागले.
“काय झालं…??” रश्मीने विचारलं.
” अक्षयला तोडीस तोड भेटलंय कोणीतरी…..”
” म्हणजे ????”
” आज अक्षय चक्क तू विचारलेल्या प्रश्नावर उत्तर न देता गप्प बसला….गप्प बसेल तो अक्षय कसला…आणि जर कोणी बोललो असतो ना असं तर एव्हाना आमचं जगणं असह्य करून टाकलं असतं त्याने.. ”
” ओह….कदाचित मी नवीन आहे म्हणून तो काही बोलला नसेल…”
” नवीन…अनोळखी माणसाला भंडावून सोडतो तू…तू तर आता ओळखीची आहेस…”

रश्मी यावर काही बोलणार तोच अक्षयचा आवाज आला.

“ए चलो सब लोग… हो गया बस ठीक…”
मेंढरं चढवीत तसे सगळे एका लाईन मध्ये चढून बसले.

सगळे पोवर ला पोचले खरे पण अक्षयने हॉटेल बुक केलं नसल्याने त्यांना एवढ्या जणांसाठी हॉटेल मिळेच ना..बरंच शोधल्यावर त्यांना एक हॉटेल मिळालं.. बीच पासून थोडं लांब..सगळ्यांनी बॅगा टाकल्या आणि बिचकडे धाव घेतली.
अक्षयला शांतपणे त्या हॉटेल मालकाशी बोलताना पाहून सगळ्यांच्या आश्चर्याचा पारावरच उरला नाही. तो परत येताच मिथिलाने त्याला विचारलं.

” काय रे..तू बीचवर न जाता चक्क त्या हॉटेल वाल्याशी बोलत बसलास…”
” अगं रात्रीची सोय करत होतो गं…”
” काय….” मिथिलाचे एकदम ओरडून विचारलं.
” अगं सोय म्हणजे बाटलीची सोय…”
” अच्छा.. पण चालतं का इथं.. ”
” हो ..चालत..इथून जवळच आहे दुकान..पण बिअर मिळणार फक्त.. आपल्या सारख कुठेही हार्ड ड्रिंक नाही मिळत…सरकारी दुकान असतं तिथेच मिळत…”
” हे काय आता नवीन….”
” ह इथे असंच आहे…सो आज बीअरच घ्यावी लागणार….”
” हं….आणू थोड्या वेळाने जाऊन…”
” चालेल..सुजीत एकदम आनंदात म्हणाला.
” हा बघ…नुसत्या नावानेच याला आनंदाच्या उकळ्या फुटायला सुरुवात झाली.”
” तसं नाही गं पण…”
” जाऊदे…” सुजितला मध्येच अडवत अक्षय म्हणाला.
” पण घेणार कोण कोण आहे…”
” सगळेच..” सुजित खांदे उडवत म्हणाला.
” आपलं ठीक आहे रे…रश्मीचं काय.???”
” अरे हा…मिथिला.. ”
” ती पण….” अक्षय काही बोलायच्या आतच मिथिलाचे सांगून टाकलं.
” तुला कसं माहीत…”
” रूममेट आहे माझी ती..माहितीये मला.. ”
” बरं ठीक आहे…आम्ही नंतर जाऊन आणू.. आता थोडं फिरून येऊ…”
” हो…चला..” सुजित लगेच उठत म्हणाला.
” हा…ती पूर्वी गेलीये ना…म्हणून जायचं असेल याला…” अक्षय उगाच सुजितला चिडवलं.
” काय संबंध… मला तर…” सुजित सारवासारव करण्याचा प्रयत्न करू लागला.
” राहू दे हा राहू दे.. कळेल थोड्याच दिवसात काय संबंध ते…चला आता…” अक्षय बाहेर पडत म्हणाला.

नंतर सगळे एक एक करून हॉटेल वर परतत होते. अक्षय आणि सुजित बिअरशॉप मध्ये गेले आणि बघतो तर काय…त्यांच्या बस मधल्यांचे जवळपास सगळ्यांचेच प्रतिनिधी तिथे हजर..

” आयला..अख्खी बस च आलीये वाटते इथे…” अक्षय हसत म्हणाला.
“आपल्याला वाटलं की आपणंच असू तर हे तर आपल्यापेक्षा चार पावलं पुढे.”

अक्षयने मग सगळ्यांसाठी हवा तो स्टॉक घेतला आणि मग सगळ्यांबरोबर चालतच हॉटेलकडे निघाला.

आता मोठा प्रोग्रॅम आहे म्हटल्यावर अक्षयने हॉटेल वाल्याला विनंती करून खाली मोकळी जागा वापरायची परवानगी मिळवली. आणि मग सगळ्यांनी टेबल खुर्च्या मांडून तिथेच बैठक मांडली.

जवळपास दोन तीन वाजले पर्यंत सगळे जागेच होते. नंतर हळू हळू सगळे आपापल्या रूम मध्ये गेले. सकाळी रश्मी उठून पाहते तर साडे दहा वाजले होते. सूर्य चांगलच डोक्यावर आला होता. अक्षय अजून उठवायला कसा आला नाही म्हणून तिने अक्षयच्या रुममध्ये जाऊन पाहिलं तर अक्षय एक पाय आणि हात बाहेर काढून बिछान्यावर पालथा पडलेला. तिने त्याला हाक मारली तरी तो उठला नाही. मग रश्मीने त्याला गदागदा हलवलं.

” काय झालं…” अक्षय एकदम दचकून उठत म्हणाला.
” अरे…वाजले बघ किती…”
” किती…”
” साडेदहा…”
” काय….” अक्षयने चमकून मनगटावरचं घड्याळ पाहिल.
” चला चला निघुया… ” अक्षय एकदम आवराआवर करत म्हणाला.
” चला काय…कोणीही उठलं नाहीये…मला सहज जाग आली म्हणून तुला उठवायला आले.”
” लागली….चल लवकर बाकीच्यांना उठवू….ए सुज्या ऊठ…” अक्षय बाजूला झोपलेल्या सुजितला लाथ घालत म्हणाला.

अक्षय बाहेर येई पर्यंत रश्मीने सगळ्या मुलींना उठवलं होतं. घाईघाईत सर्व आवरून सगळ्यांनी हॉटेल सोडलं पण त्यांना निघायला दीड वाजला. आणि एवढ्या उशिरा कायकिंगला जाऊन काय फायदा..नुसतं दर्शन घेऊन यावं लागेल..त्या पेक्षा नकोच ते असा विचार करून आणि सर्वांचं मत घेऊन अक्षयने ड्रायव्हरला गाडी सरळ हॉस्टेलकडे घ्यायला सांगितली.

क्रमशः

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

6390cookie-checkनियती…पर्व दुसरे… (भाग १८)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

6 Comments

 1. Interesting twist ghetlay story ne.. avadala mala

  On Sat, 21 Jul 2018, 18:59 Pratik Pravin Mhatre, wrote:

  > pratikpravinmhatre posted: “रश्मीच्या ग्रुपची आठवड्याची सुरुवात झाली तीच
  > मुळी पुढच्या पिकनिकच्या प्लॅंनिंगने. पुढचा शनिवार रविवार सुट्टी असल्याचं
  > त्यांच्या लीडने त्यांना आधीच सांगून टाकलं. मग अक्षय का कोणासाठी थांबणार
  > आहे…त्यांनी सगळ्यांना विचारून पुढल्या आठवड्यात कायकिंग आणि पोवर”
  >

Leave a Reply

Blog Stats

 • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories