नियती…..(भाग १)

“अरे यार….ह्या पावसाला सुद्धा आत्ताच यायचं होतं.. कल रात्री इतका पडला तरी ह्याच मन नाही भरलं अजून…आधीच मी interview साठी लेट झालीये आणि त्यात हा……”
“ऑटो……..” तिने समोरून येणाऱ्या रिक्षाकडे बघून जोरात हाक मारली..पण तो सुद्धा मोठ्या तोऱ्यात तिच्या समोरून वेगाने निघून गेला. मनामध्ये शिव्या देत असतानाच तिला समोरच्या रस्त्यावर एक ऑटो थांबलेली दिसली..ती घाईघाईतच आजूबाजूला न बघता  रस्ता ओलांडू लागली आणि अचानक समोरून वेगाने येणाऱ्या बाईकच्या एकदम पुढ्यातच जाऊन उभी राहिली. तिला पाहून प्रसंगावधान राखून त्या बाईकवाल्याने करकचून ब्रेक मारला..
“ओह हॅलो…..दिसत नाही का ?? हा काय रेसिंग करायचा रस्ता आहे का???” ती अक्षरशः किंचाळलीचं…
” एक मिनिट….एक तर तू आजूबाजूला न बघता रस्ता क्रॉस करतेस आणि वर मलाच दोष देतेय…नशीब समज मी वेळेवर  ब्रेक मारला नाही तर …..”

“नाही तर काय….बाईक हातात आली म्हणजे तुम्हाला वाटतं की जसं काय विमानच चालवतोय आम्ही….”

” हे बघ…आधीच मला उशीर झालाय.. आणि मला एवढ्या पावसात थांबून तुझ्याशी भांडण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये…”

“मलातरी कुठे इंटरेस्ट आहे….फालतू गोष्टींसाठी वेळ नाहीये माझ्याकडे…”

“नाहीये ना….मग जा ना…कशाला उगाच…….”

त्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच ती तिथून निघून गेली.

थोडा प्रयत्न केल्यावर तिला रिक्षा मिळाली खरी पण तोपर्यंत ती पावसात पूर्णपणे भिजली होती. रिक्षेतून उतरल्यावर घाईघाईतच ती गेटमधून आत शिरली आणि वॉचमनला विचारून पळतच interview जिथे होता त्या त्या बिल्डिंग मध्ये गेली.  समोरच्याला आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवण्याच्या तिच्या सवयीमुळे साहजिकच तिला तो जॉब मिळाला आणि ओरिएंटशन साठी auditorium  मध्ये जाणार एवढ्यात दरवाज्यात पुन्हा एकदा तिची गाठ त्या बाईकवाल्याशी पडली..
” तू…..तू इथे काय करतोय ????”

” काय करतोय म्हणजे…मी इथे नाही येऊ शकत का???”

” नाही तस नाही पण सकाळी भांडून मन नाही भरलं म्हणून इथे माझा पाठलाग करत आलास वाटतं…”

” हो….मला तेवढंच काम आहे ना…..काय बोलतेय…जाऊ दे..तुम्हा मुलींच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही…..आता जरा जॉब लागल्यामुळे माझा मूड चांगला आहे…आणि  मला तो अजिबात बिघडवायचा नाहीये..सो बाय…”

पहिला दिवस असल्यामुळे सगळ्या फॉर्मलिटीमध्ये वेळ कसा निघून गेला तिचं तिला सुद्धा कळलं नाही..तसा थोडा उशीरच झाला होता. पावसाने सुद्धा थोडी विश्रांती घेतली होती म्हणून ती बसची वाट पाहत उभी होती..तो बाईकवाला पुन्हा एकदा तिच्या समोरून गेला. 

‘ शी…उगाच भांडले याच्याशी..सकाळी माझीच चूक होती..मीच जरा घाईत होते…त्याला सॉरी बोलायला हवं..पण तो माफ करेल का मला??? ‘

 

एवढ्यात पुढे गेलेला तो बाईकवाला पुन्हा तिला तिच्या दिशेने येताना दिसला.. तिने बघून न बघितल्यासारखं केलं आणि दुसरीकडे पाहत उभी राहिली. तो तिच्या बाजूला येऊन थांबला .

” Excuse me..”

” हा…”

” खूप उशीर झाला आहे..जर भांडणार नसशील तर मी लिफ्ट देऊ शकतो तुला…आणि मी बाईक नीटच चालवतो..”

त्याच बोलणं ऐकून ती एकदम हसायलाच लागली..

” हसायला काय झालं…???”

” अरे काही नाही….सकाळचं भांडण आठवून हसू आलं मला..actually I am Sorry…सकाळी ते…..”

“सकाळ बद्दल आपण न बोललेलंच बरं….”

” हो हो…झालं ते झालं..पुन्हा नव्याने सुरुवात करूया….”

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5370cookie-checkनियती…..(भाग १)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,226 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories