निर्णय…..

इशिका…तशी लहानपणापासूनच हुशार…अभ्यासात सुद्धा आणि इतर क्षेत्रात सुद्धा…शाळेत असताना चित्रकला, निबंध, वक्तृत्व, एकांकिका अशा अनेक स्पर्धांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता तिने..वादविवाद स्पर्धेमध्ये तर तिच्यासमोर बोलताना समोरच्याची बोबडीचं वळून जायची.वक्तृत्व तर असं असायचं की समोरच्याने ऐकतचं राहावं. पण कॉलेज सुरू झाल्यावर मात्र हे सगळं चित्र बदललं. 

       

तिचे आईवडील दोघेही डॉक्टर. त्यामुळे नेहमी चालत आलेल्या   अलिखित रुढीप्रमाणे आपल्या मुलीने सुद्धा डॉक्टरच व्हावं असं त्यांना वाटत होतं..आणि त्यात ही एकटी..त्यामूळे तिच्या आईवडिलांची इच्छा तिने पूर्ण केलीच पाहीजे असं सगळ्या नातेवाईकांच मत..सर्वांना दुखवायचं नाही म्हणून तिने सायन्सला ऍडमिशन घेतलं खरं…पण एखाद्या रोबोट प्रमाणे ती  घर ते कॉलेज, कॉलेज ते क्लास आणि क्लास ते घर हे रुटीन follow करायची..बायोलॉजीच्या प्रॅक्टिकलला कोणता प्राणी कापायला दिला तर तो न कापता एखाद्या वहित त्याच चित्र काढत बसायची. कॉलेजच्या फेस्टचे तीन दिवसचं काय ते ती एन्जॉय करायची..अभ्यास करताना जर एखादा विषय आवडला तर अभ्यास बाजूला ठेवून ती तासंतास त्याच विषयाबद्दल गुगलवर सर्च करत बसायची..

पेपरमध्ये तिच्या आवडीच्या विषयावरच्या प्रश्नांना तीे अगदी तो पेपर चेक करणारा सुद्धा वाचतच बसेल अशी उत्तरं लिहायची..पण जर प्रश्न १० मार्क्सचा असेल तर कितीही चांगलं उत्तर लिहिलं तरी १० च मार्क्स मिळणार ना..बाकीच्या उत्तरांचं काय…

झालं…दहावीला पहिल्या पाच मध्ये असणाऱ्या मुलीला बारावीला फर्स्ट क्लास सुद्धा मिळाला नाही..हा रिझल्ट सर्वांसाठी अनापेक्षितच होता. पण तरी सुद्धा तिच्या वडिलांनी काही समजून न घेता स्वतःच्या ओळखीवर एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन करवलं. पण तिथे सुद्धा परिस्थिती जैसे थे…

शेवटी जेव्हा तिच्या घरच्यांनी ‘तिला काय करायचं आहे ते करू दे’ असा विचार केला तेव्हा तिच्या लाईफमधली चार महत्वाची वर्षे निघून गेली होती. हाच विचार जर आधी केला असता तर कदाचित तिला जे हवंय, तिला ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रात नक्कीच काहीतरी करू शकली असती.

आपल्याबरोबर असणाऱ्या बऱ्याच जणांबरोबर हे असंच झालेलं असतं. आपण एखादा निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम समोर आल्यावरच त्या निर्णयाचा पुनः विचार करतो. पण हाच विचार आपण तो निर्णय घेण्याआधी केला तर त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं साध्य होऊ शकतं. घाईघाईने एखादा निर्णय घेऊन नंतर त्याचा विचार करत बसण्यात काय शहाणपणा….
© प्रतिक प्रवीण म्हात्रे

4370cookie-checkनिर्णय…..

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories