Don’t mix personal and professional life. 👔🕴

आलोक.. सॉफ्टवेअर डेव्हलपर.. म्हणजे दिवसातले किमान १२-१४ तास काम करणं आलंच.. आलोक आणि मृण्मयी कॉलेजपासूनचे मित्र..अगदी जवळचे..best friends च म्हणूया ना..पण डिग्री झाल्यावर मृण्मयीने MBA च्या तयारीसाठी गॅप घेतला आणि आलोक काही कारणास्तव एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनी मध्ये नोकरीला लागला..सुरुवातीचे काही दिवस जास्ती काही कामाचा भार नव्हता.. त्या मुळे सगळं काही पहिल्यासारखं सुरळीत चालू होतं. पण काही काळ गेल्यावर आलोकला कंपनीच्या कामासाठी परगावी जावं लागलं. आधीच नवीन जागा आणि त्यात कामाचं वाढतं प्रेशर यामुळे आलोकला नोकरी आणि स्वतः व्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टींना फारसा वेळ देता येत नव्हता..रात्री थकून घरी आल्यावर त्याला मोबाईल चेक करायला सुद्धा उसंत नव्हती.. कधी कधी तो तसाच उपाशीपोटी झोपून सकाळी नुसता कंपनीच्या बाहेर असलेल्या टपरीवरचा चहा पिऊन जॉबवर join व्हायचा..या दरम्यान त्याचं आणि मृण्मयीचं contact कमी झालं..ती रोज मेसेज करायची आणि हा दोन तीन दिवसांनी त्या मेसेजला रिप्लाय द्यायचा..अर्थात त्याच्या अशा वागण्याने तिला राग येणं साहजिकच आहे म्हणा..पण या कारणामुळे दोघांमध्ये असलेलं रिलेशन बिघडलं..तो परत येई पर्यत त्या दोघांमधली मैत्री जवळपास संपलीच होती..मृण्मयी निघून गेली पण ती का गेली हा प्रश्न मात्र आलोकसाठी अनुत्तरीतचं राहिला…

आपलं आयुष्य म्हणजे अगदी ट्रेन सारखं झालं आहे..कधी शताब्दीसारखं एकदम सुसाट..म्हणजे चांगल्या किंवा वाईट गोष्टी इतक्या पटकन घडतात की त्या गोष्टींचा विचार करायला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही..तर कधी ट्रॅक तुटल्यामुळे बराच वेळ एकाच जागी थांबून राहिलेल्या लोकलसारखं…आपण त्या गोष्टीचा विचार न करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपलं आयुष्य त्या एकाच क्षणावर थांबून राहतं.. आपण कितीही प्रयत्न केला तरी तेच तेच विचार आपल्याला मनात येत राहतात.

काही दिवस आधी एक विनोद आला होता..की दहावी पर्यंत अभ्यास करा..मग लाईफ एकदम मस्त आहे..कॉलेज पूर्ण करा मग लाईफ एकदम मस्त आहे…पण खरं स्ट्रगल तर कॉलेज संपल्यावरचं सुरू होतं. आणि त्यातचं आपलं आयुष्य आपल्याला मार्गी लावायचं असतं. कॉलेजमध्ये असताना आपण विचार करत असलेलं आयुष्य आणि कॉलेज संपल्यावर आपल्या समोर उभं ठाकलेलं आयुष्य यात खूप अंतर आहे.

सांगायचा मुद्दा असा की आयुष्याच्या ज्या वळणावर आपल्याला कोणाच्या तरी सपोर्टची, कोणाच्या तरी आधाराची गरज असते त्याच वेळी अगदी लहानसहान कारणास्तव जर आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर गेली तर संपूर्ण गणितंच बदलून जातं.  म्हणून कोणताही गैरसमज न करून घेता समोरच्याला समजून घेतलं तर दोघांचंही आयुष्य अगदी व्यवस्थित मार्गी लागू शकतं आणि मैत्रीही टिकून राहू शकते..

–                © प्रतिक प्रवीण म्हात्रे

4150cookie-checkDon’t mix personal and professional life. 👔🕴

Related Posts

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories