कोंडी…
“अक्षय…माझा पण रिझल्ट तूच बघ ना…”
“तुझा रिझल्ट बघायची काय गरज आहे..नेहमी सारखा फर्स्ट क्लास असणार तुला..आमचेच पास व्हायचे वांदे असतात..”
“अरे नाही…तरी तूच बघ…”
“बरं…बघतो..मी येतो कॉलेज ला जाऊन..रिझल्ट बघून फोन करतो.. पार्टी रेडी ठेव कळलं ना….”
थोड्याच वेळात अक्षयचा फोन आला.परेशला जे अपेक्षित होतं तेच घडलं होत..नेहमी फर्स्ट क्लास मिळवणारा मुलगा चक्क नापास झाला होता. अक्षय त्याला समजावत होता पण परेशचं त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो त्याच्याच विचारात गढून गेला होता.
परेश रूम वर एकटाच आहे म्हणून अक्षय सुद्धा कॉलेज मधून लवकरच घरी आला..त्याने दरवाजा वाजवला..आतून काही प्रतिसाद आला नाही..त्याने थोडा वेळ प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही..शेवटी त्याने होस्टेलच्या security ला सांगून दरवाजा तोडायला लावला. आणि आतलं दृश्य पाहून तो थबकलाच…परेश खाली जमिनीवर पडला होता..त्याच्या तोंडातुन फेस येत होता. त्याने आणलेली विषाची बाटली बाजूलाच पडली होती…बिछान्यावर त्याच्या पाकिटातला आई बाबांचा फोटो पडला होता..
अक्षयने गडबडीने परेशच्या घरी फोन करून त्याला बरं नसल्याचं कळवलं..सर्वांनी मिळून त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं..डॉक्टरांनी परेशला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले ..पण शेवटी काहीच फायदा झाला नाही..विष संपूर्ण शरीरात पसरल्यामुळे परेशची प्राणज्योत विझली होती..ज्या कारणासाठी परेशवर हे पाऊल उचलण्याची पाळी आली होती ते कारण सुद्धा त्याच्यासोबतच निघून गेलं होतं..परेशच्या आई वडिलांसाठी तर सर्व जगचं जणू संपलं होतं.. उरला होता तो फक्त आक्रोश……
आपल्यावर असे किती तरी प्रसंग येतात..पण अशा अपयशाने खचून न जाता आपण पुन्हा जिद्दीने उभं राहायला हवं. Depression मध्ये येऊन काही वेडंवाकडं पाउल उचण्यापेक्षा कोणाला तरी विश्वासात घेऊन आपला प्रॉब्लेम सांगितला तर त्यावर नक्कीच मार्ग निघू शकेल..एकदा प्रयत्न तर करून बघा…
– प्रतिक प्रवीण म्हात्रे ©
तूझ्या सर्वच लेखातून शिकण्या सारखे आहे! 🙌
Mast