बघ….तुला माझी आठवण येते का…?
काश्मीरला भूकंपाचा धक्का बसला, चेन्नई मध्ये नर्गिस वादळाची चाहूल लागली
खेळणारा मुलगा बोअरवेलसाठी खणलेल्या खड्डयात पडला, तेव्हा मात्र तुला मिलिटरीची आठवण झाली
दुखः जेव्हा दाटते तेव्हा माझीच आठवण येते , पण आज तू आनंदात आहेस
तर बघ….तुला माझी आठवण येते का…?
हिमाचल, उत्तराखंडात पूर आला, चारधाम वाहून गेलं
देव सुद्धा देवुळ वाचवु नाही शकला, तुझा जिव वाचवण्यासाठी मीच तर धावलो
आता सगळं सुरळीत अन तु सुरक्षीत आहेस
तर बघ…. तुला माझी आठवण येते का…?
मुंबईवर दहशदवादी हल्ला झाला, शेकडो लोकांचा नाहक बळी गेला
पोलिसांना मदत म्हणून मिलिटरीला आदेश आला, जीवाची बाजी लावून आपला उन्नीकृष्णन गेला
तुझ्या रक्षणासाठी माझाच वर्दीवाला धावला
आता तुला सार सेफ सेफ वाटतयं
तर बघ….तुला माझी आठवण येते का…?
नेपाळला भूकंप झाला, भारताने शेजारधर्म पाळला
अफगाणिस्थान पूर्णपणे नव्याने उभारला, पाकिस्तानमधे घुसुन सर्जिकल स्ट्राईक केला
लष्करावरचा तुझा विश्वास अजून वाढला
मी अजून लढतोच आहे , मात्र तु घरात सुखरूप आहेस
तर बघ…. तुला माझी आठवण येते का…?
येमेनमध्ये सिविल वॉर झाले,५००० भारतीयांना सुखरूप सोडवले
भारतीयचं काय ४१ देशातील नागरिकांनी भारतीय लष्कराचे आभार मानले
पण चॅनेलवरची ब्रेकिंग न्युज जुनी झाली आणि मायदेशात येऊन मोकळा शवास घेतच आहेस
तर बघ….तुला माझी आठवण येते का…?
*कवी* प्रतिक प्रवीण म्हात्रे
( कोणत्याही परिस्थितीत कितीही कठीण प्रसंगाशी दोन हात करण्यास नेहमी सज्ज असलेल्या माझ्या भारतीय जवानांना समर्पित )
👌👌👌👋👋
thank you
👍कविमित्रा, खूप छान लिहू लागलास रे!
aapli krupa 🙂